आमदार श्वेताताई महाले पाटील

खरीप पिकांचे नुकसान अन् पाणीटंचाईचा प्रश्न; आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

MLA Shwetatai Mahale Patil: पुरा पाऊस, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि आगामी काळात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक सुरू

खरीप पिकांचे नुकसान अन् पाणीटंचाईचा प्रश्न; आ. श्वेताताई महाले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

MLA Shwetatai Mahale Patil

चिखली (MLA Shwetatai Mahale Patil) : अपुरा पाऊस, खरीप हंगामातील पिकांचे नुकसान आणि आगामी काळात निर्माण होऊ शकणारी पाणीटंचाई लक्षात घेता दुष्काळजन्य परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज, मंगळवार, ३ नोव्हेंबर रोजी चिखली येथील तालुका क्रीडा संकुलात महत्त्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. आमदार श्वेताताई महाले पाटील (MLA Shwetatai Mahale Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.

या बैठकीला तहसीलदार विजय सवडे, गटविकास अधिकारी समाधान वाघ, नगरपरिषदेचे मुख्याधिकारी डॉ. प्रशांत बिडकर यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, महायुतीचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी तसेच आजी-माजी सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. बैठकीमध्ये चिखली तालुक्यातील दुष्काळजन्य परिस्थितीचा सविस्तर आढावा घेण्यात येत आहे. यामध्ये खरीप पिकांची सद्यस्थिती, पावसाची कमतरता, शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसान, सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता आणि पेनटाकळी प्रकल्पातील पाणीवाटप या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होत आहे.

विशेषतः तालुक्यातील प्रत्येक गावात पिण्याच्या पाण्याची नेमकी काय परिस्थिती आहे, उपलब्ध जलस्रोत किती काळ पुरतील, विहिरींची पाणीपातळी, संभाव्य टंचाईग्रस्त गावे आणि भविष्यात कराव्या लागणाऱ्या उपाययोजना यांचाही आढावा घेण्यात येत आहे. याशिवाय आगामी काळातील संभाव्य अल निनोच्या प्रभावामुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता गृहीत धरून प्रशासनाने आतापासूनच पाणीटंचाई निवारणासाठी सज्ज राहावे, अशा दृष्टीने नियोजनावरही चर्चा होत आहे.

संबंधित सामग्री

पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी उपोषण; आमदार श्वेताताई महाले पाटील यांची भेट

पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या न्याय्य वाटपासाठी उपोषण; आमदार श्वेताताई महाले पाटील यांची भेट

MLA Shwetatai Mahale Patil: नटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या समान व न्याय्य वाटपाच्या मागणीसाठी मौजे पेनसावंगी येथे पंचक्रोशीतील प्रकल्पग्रस्त शेतकरी बांधवांचे गेल्या दोन दिवसांपासून बेमुदत उपोषण सुरू ..

Nov 04, 2026
आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

MLA Shwetatai Mahale Patil: गावातील महिला व नागरिकांनी चिखली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार श्वेताताई महाले पाटील यांच्याकडे नादुरुस्त ट्रान्सफॉर्मरची समस्या सोडविण्याची मागणी केली होती. रहिवासी भागातील

Sep 11, 2026