आमदार श्वेता महाले पाटील

दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

MLA Shweta Mahale Patil: दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये..

दिवाळीपूर्वी चिखली विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना मिळणार ६४  कोटींची अग्रीम मदत

MLA Shweta Mahale Patil

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारचा शेतकरीहिताचा निर्णय
आमदार श्वेता महाले पाटील यांच्याकडून निर्णयाचे स्वागत

चिखली (MLA Shweta Mahale Patil) : दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी आर्थिक मदत मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने शेतकऱ्यांना प्रत्येकी ५ हजार रुपये अग्रीम मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे चिखली विधानसभा मतदारसंघातील चिखली व बुलढाणा या तालुक्याला सुमारे ६४ कोटी रुपये मिळणार असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी गोड होईल त्यामुळे  या निर्णयाचे चिखली विधानसभा मतदारसंघाच्या (MLA Shweta Mahale Patil) आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वागत केले आहे.

दुष्काळ पंचनामे व प्रपत्र ड नुसार चिखली तालुक्यात ८३ हजार ८१४, तर बुलढाणा तालुक्यात ४३ हजार ७१४ शेतकऱ्यांची नोंद आहे. दोन्ही तालुक्यांतील एकूण शेतकरी संख्या १ लाख २७ हजार ५२८ आहे. या संख्येतील प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येकी ५ हजार रुपये मदत मिळाल्यास एकूण रक्कम ६३ कोटी ७६ लाख ४० हजार रुपये होते. यामध्ये चिखली तालुक्यासाठी ४१ कोटी ९० लाख ७० हजार रुपये, तर बुलढाणा तालुक्यासाठी २१ कोटी ८५ लाख ७० हजार रुपये इतकी रक्कम होते. मात्र, प्रत्यक्ष मदतीची रक्कम शासनाच्या निकषांनुसार पात्र ठरणाऱ्या शेतकऱ्यांच्या संख्येवर अवलंबून असेल.

दुष्काळामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना सणासुदीच्या काळात आर्थिक आधार मिळावा, या दृष्टीने राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे. नियमित दुष्काळी मदतीच्या प्रक्रियेसोबतच शेतकऱ्यांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याच्या शासनाच्या भूमिकेचे (MLA Shweta Mahale Patil) आमदार श्वेता महाले पाटील यांनी स्वागत केले.

शेतकऱ्यांच्या अडचणींची जाणीव ठेवून त्यांच्या गरजेच्या वेळी मदतीचा हात देणे, ही (MLA Shweta Mahale Patil) शासनाची महत्त्वाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिवाळीपूर्वी अग्रीम आर्थिक मदत देण्याचा निर्णय घेतल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची शासनाची भूमिका अधोरेखित झाली आहे. आमदार श्वेता महाले पाटील यांनीही या निर्णयाचे स्वागत करत शेतकरीहिताच्या भूमिकेला समर्थन दिले आहे.

शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर पीक नुकसानीच्या भरपाईपासून पाणी, वीज आणि इतर कृषिविषयक प्रश्नांपर्यंत आवश्यक सहकार्य मिळणे गरजेचे आहे. ते आमचे संवेदनशील सरकार शेतकऱ्यांना नियमितपणे देत आहे आणि यापुढेही देत राहील. शासनाच्या योजनांचा लाभ पात्र शेतकऱ्यांपर्यंत वेळेत पोहोचवणे आणि दुष्काळी परिस्थितीत त्यांना आवश्यक आधार देणे, याला आमचे प्राधान्य असेल, असे (MLA Shweta Mahale Patil) आमदार श्वेता महाले पाटील म्हणाल्या.

टैग्स: MLA Shweta Mahale Patil

संबंधित सामग्री

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८ लाख ६२ हजार ३०० रुपयांची मदत!

आमदार श्वेता महाले पाटील यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ८ लाख ६२ हजार ३०० रुपयांची मदत!

MLA Shweta Mahale Patil: सामाजिक बांधिलकी आणि सेवाभाव जपत चिखली विधानसभा मतदारसंघासह बुलढाणा विधानसभा मतदारसंघातील नागरिक, सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधी

Nov 18, 2026
दुष्काळी परिस्थितीत ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सरपंचांना प्रशासकीय अधिकार द्या: आ. श्वेता महाले पाटील

दुष्काळी परिस्थितीत ग्रामपंचायतींचा कारभार सुरळीत चालण्यासाठी सरपंचांना प्रशासकीय अधिकार द्या: आ. श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील विकासकामे आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांची कामे रखडू नयेत, यासाठी ग्रामपंचायतींचा कारभार पाहणाऱ्या सरपंच..

Nov 17, 2026
बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला आढावा

बुलढाणा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या नियोजनाचा आमदार श्वेता महाले पाटील यांनी घेतला आढावा

MLA Shweta Mahale Patil: संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी बुलढाणा तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणांच्या तयारीचा आढावा घेणारी विशेष समन्वय बैठक धाड येथे आ. श्वेता महाले पाटील...

Nov 04, 2026
कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर खपवून घेणार नाही: आमदार श्वेता महाले पाटील

कर्जवसुलीच्या नावाखाली महिलांच्या सन्मानाशी खेळाल तर खपवून घेणार नाही: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: ग्रामीण भागातील महिलांना कर्जाच्या नावाखाली आर्थिक व्यवहारात अडकवून वसुलीसाठी त्यांचा मानसिक छळ करण्याचे प्रकार आता खपवून घेतले जाणार नाहीत, अशी ठाम भूमिका...

Nov 02, 2026
पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा: आमदार श्वेता महाले पाटील

पेनटाकळीच्या पाण्याचे समन्यायी वाटप करा: आमदार श्वेता महाले पाटील

MLA Shweta Mahale Patil: पेनटाकळी प्रकल्पातील पाण्याच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार श्वेता महाले पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना पाणी...

Nov 01, 2026