MLA Shweta Mahale Patil: खरं तर खूप कमी लोक एवढे भाग्यवान असतात, ज्यांना असे मित्र मिळतात.अशा मित्रमंडळींना मी मनापासून आभार व्यक्त करते, त्यांना खूप खूप अभिनंदन करते.
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त १० ते १५ हजारांचा जनसागर ‘बुलढाण्याच्या सेवेचे व्रत आम्ही आजपासून स्वीकारतो’
चिखली (MLA Shweta Mahale Patil) : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे खाजगी सचिव तथा राज्य सरकारच्या मंत्रालयातील सहसचिव दर्जाचे वरिष्ठ अधिकारी विद्याधर महाले यांच्या ५०व्या वर्षात पदार्पणानिमित्त त्यांच्या मित्रमंडळींच्या वतीने बुलढाण्यात भव्य सत्कार समारंभ व रॅलीचे आयोजन करण्यात आले. धाड नाका ते संगम चौक मार्गे जयस्तंभ चौकापर्यंत काढण्यात आलेल्या या रॅलीला तब्बल १० ते १५ हजार नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. यावेळी उपस्थितांना संबोधित करताना आ. श्वेताताई महाले पाटील (MLA Shweta Mahale Patil) यांनी विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत बुलढाण्यातील राजकीय परिस्थितीवरही स्पष्ट शब्दांत थेट भूमिका मांडली.
‘वयाच्या ५०व्या वर्षात पदार्पण करणाऱ्या मित्राचा आपण सत्कार केला पाहिजे’, ही महाले (MLA Shweta Mahale Patil) साहेबांच्या मित्रमंडळीची भावनिक अपेक्षा होती त्यामुळे असे मित्र सगळ्यांनाच मिळाले पाहिजेत असे सांगत आ. महाले म्हणाल्या की, “खरं तर खूप कमी लोक एवढे भाग्यवान असतात, ज्यांना असे मित्र मिळतात.अशा मित्रमंडळींना मी मनापासून आभार व्यक्त करते, त्यांना खूप खूप अभिनंदन करते.”

‘बुलढाण्यात खूप कचरा झाला, तो उडत उडत चिखलीत आला’
आपल्या भाषणात बोलताना आ. श्वेताताई महाले (MLA Shweta Mahale Patil) यांनी “भाईजींनी सांगितलं बुलढाण्यात खूप कचरा झाला” या वाक्याचा आधार घेतला. आणि “बुलढाण्यातील हा कचरा उडत- उडत चिखलीमध्ये आला”, असे आ. श्वेता महाले पाटील यांनी आपल्या भाषणादरम्यान सांगितले . या वक्तव्याच्या माध्यमातून बुलढाण्यातील एकमेकांच्या मतदारसंघात घुसून उगाच राजकारण करू पाहणाऱ्या नेते व राजकीय परिस्थितीवर त्यांनी अप्रत्यक्षपणे भाष्य केले.
‘संस्काराची शिदोरी घेऊन समाजकारणात आलो’
मंचावर उपस्थित असलेले माजी आमदार ध्रुपदरावजी सावळे यांचा विशेष उल्लेख करताना आ.श्वेता महाले म्हणाल्या, “ बुलढाण्यातील ध्रुपदरावजी सावळे यांच्यासारख्या सुसंस्कृत वडीलधाऱ्यांनी दिलेल्या संस्काराची शिदोरी घेऊन आम्ही समाजकारणात आलो. राजकारण हे दुय्यम आहे.राजकारणामध्ये शांत राहून काम करणे ही परिस्थितीची मागणी असते आणि तो आपला स्वभाव आहे,असे स्पष्ट करत त्या म्हणाल्या, “बुलढाण्यामध्ये जो शांत राहतो त्याला कमजोर समजले जाते.” बुलढाण्यात येताना “संस्काराचे जोडे काही काळ बाहेर ठेवूनच आम्हालाही बुलढाण्यामध्ये प्रवेश करावा लागला,” अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

‘सहकारात आपल्या लोकांना निवडून आणण्यासाठी बुलढाण्यातून बरेच फोन आले’ असे सांगताना आमदार श्वेता ताई महाले म्हणाल्या की, "जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेवर अविरोध निवड व्हावी म्हणून आणि विजयराज शिंदे यांच्या पत्नीचा फॉर्म परत घेण्यात यावा म्हणून माजी आमदार ध्रुपदरावजी सावळे साहेब व विजयराज शिंदे यांच्याशी बोलणे करावे यासाठी बुलढाण्यातून निवडणूक काळात रोज आठ दहा फोन आले. आम्ही युतीचा धर्म पळून आवश्यक त्या सर्व गोष्टी केल्या व यांना व यांच्या नातेवाईकांना अविरोध निवडून आणले.आणि दुसऱ्या दिवशी हे चिखली मध्ये येऊन उगाच आमच्या विरोधात दंड थोपटू लागले हे चालणार नाही" या वक्तव्यामुळे त्यांच्या भाषणातील सहकार क्षेत्राशी संबंधित राजकीय संदर्भाचीही चर्चा झाली.
‘अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्याचे काम करू’
आपल्या भूमिकेवर भाष्य करताना आ.श्वेता महाले (MLA Shweta Mahale Patil) म्हणाल्या, “संयम हा गुण आहे; परंतु कोणत्याही प्रकारच्या अन्यायाची भावना बुलढाण्यात तयार होत असेल, तर त्या अन्यायाला वाचा फोडून न्याय देण्याचे काम बुलढाण्यातदेखील आम्ही करू.”यावेळी त्यांनी बुलढाण्यातील राजकीय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर स्पष्ट भूमिका मांडली.

‘चिखलीतील देवीच्या वहनाच्या यात्रेची अनुभूती आली’
विद्याधर महाले यांच्या वाढदिवसानिमित्त धाड नाक्यापासून संगम चौक मार्गे जयस्तंभ चौकापर्यंत निघालेल्या रॅलीला मिळालेल्या प्रतिसादाचा उल्लेख करताना आ.श्वेता महाले म्हणाल्या, “दहा ते पंधरा हजार लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला. ते पाहून चिखलीतील देवीच्या वहनाच्या यात्रेला जी गर्दी असते, तीच अनुभूती आली.”रॅलीतील मोठ्या जनसमुदायामुळे बुलढाणा शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर आ.श्वेता महाले (MLA Shweta Mahale Patil) आक्रमक वाढदिवसाच्या निमित्ताने काढण्यात आलेली रॅली जयस्तंभ चौकात पोहोचल्यानंतर महापुरुषांना पुष्पांजली अर्पण करण्यासाठी आ. श्वेताताई महाले पाटील आणि त्यांचे पती विद्याधर महाले तेथे पोहोचले. त्याचवेळी अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याने आ. महाले यांनी संताप व्यक्त केला.यावेळी त्यांनी “दम असेल तर मैदानात येऊन लढा,” असे खुले आव्हान दिले. तसेच, “बुलढाण्यात दडपशाही कराल तर बुलढाणा शहर आता ते मान्य करणार नाही, हेच आजच्या रॅलीतील गर्दीने दाखवून दिले,” असे त्या म्हणाल्या.याचवेळी त्यांनी “ठोशानेच ठोशाचे उत्तर या ठिकाणी आता दिले जाईल,” असा इशाराही दिला.

‘बुलढाण्याच्या सेवेचे व्रत आजपासून स्वीकारत आहोत’
चिखलीतील आपल्या राजकीय वाटचालीचा उल्लेख करताना आ. महाले यांनी धृपदराव सावळे, अंकुशराव पाटील तसेच अन्य ज्येष्ठांच्या आशीर्वादाचा उल्लेख केला. त्या म्हणाल्या, “धृपदराव सावळे, अंकुशराव पाटील आणि बऱ्याच अदृश्य शक्तींच्या आशीर्वादामुळे चिखलीमध्ये आमदार म्हणून दुसऱ्यांना जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे बुलढाण्याच्या सेवेचे व्रत आम्ही आजपासून स्वीकारत आहोत आणि त्याला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही.”
विद्याधर महाले यांच्या ५०व्या वर्षातील पदार्पणानिमित्त आयोजित सत्कार समारंभ आणि भव्य रॅलीच्या निमित्ताने आ. श्वेताताई महाले पाटील यांच्या भाषणातील राजकीय आणि सामाजिक वक्तव्यांची बुलढाणा जिल्ह्यात चर्चा रंगली आहे...
प्रसंगी राधेश्याम चांडक , आ.श्वेताताई महाले पाटील ,धुपतरावजी सावळे , आ.धीरज लिंगाडे यांनी आपले विचार व्यक्त केले तर विद्याधरजी महाले यांनी सत्काराला उत्तर देताना विदर्भाचे सुपुत्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या विकासामुळे कामासाठी आपण रात्रंदिवस मेहनत करू आणि जनतेच्या कामासाठी सदैव तत्पर राहू असा शब्द यावेळी दिला.
या कार्यक्रमाच्याध्यक्षस्थानी बुलढाणा अर्बन परिवाराचे जनक राधेश्यामजी चांडक तर यावेळी मंचकावर माजी आमदार धुरपतराव सावळे ,आमदार धीरज लिंगाडे ,अंकुशराव पडघान, जालिंदर बुधवत , ह भ प प्रकाशबुवा जवंजाळ, माजी आमदार विजयराज शिंदे यांच्यासह महाले साहेब मित्र मंडळाचे सदस्य मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. वाढदिवसानिमित्त आधार बहुउद्देशीय संस्थेमार्फत आरोग्यसेवेला बळ मिळण्यासाठी आमदार श्वेता महाले (MLA Shweta Mahale Patil) यांच्या हस्ते चिखली-बुलढाणा मतदारसंघांसाठी अत्याधुनिक ॲम्बुलन्सचे लोकार्पण यावेळी करण्यात आले तसेच दहा गरजूंना मित्र मंडळाच्या वतीने मोफत सायकल वाटप करण्यात आल्या.