आ. संजय गायकवाड

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती बुलढाण्याच्या अध्यक्षपदी आ. संजय गायकवाड!

MLA Sanjay Gaikwad: छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती बुलढाणाच्या अध्यक्षपदी धर्मवीर आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली निवड करण्यात आली..

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती बुलढाण्याच्या अध्यक्षपदी आ. संजय गायकवाड!

MLA Sanjay Gaikwad

 

सचिवपदी अनिल म्हस्के तर कोषाध्यक्षपदी डॉ. विकास बाहेकर कायम..

बुलडाणा (MLA Sanjay Gaikwad) : छत्रपती श्री शिवाजी महाराज स्मारक समिती बुलढाणाच्या अध्यक्षपदी धर्मवीर आमदार संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली निवड करण्यात आली आहे, तर विद्यमान सचिव अनिल म्हस्के व कोषाध्यक्ष डॉ. विकास बाहेकर यांना त्या पदावर कायम ठेवण्यात आले आहे. तर नव्या समिती सदस्यांची घोषणा लवकरच करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती बुलढाणाची बैठक आज सोमवार २६ ऑक्टोबर रोजी विश्रामगृहात आयोजित करण्यात आली होती, यावेळी जालिंधर बुधवत, राजेश हेलगे, सचिव अनिल म्हस्के, इंजि. सुरेश चौधरी, ज्ञानदेव काटकर, कोषाध्यक्ष डॉ. विकास बाहेकर, सुनील उदयकर, सहसचिव उमेश शर्मा, भारत शेळके, रणजित राजपूत, तमीज मिर्झा,.मिलिंद देशपांडे, मंगेश बिडवे, हरीश निर्मल यांच्यासह नगरपरिषद उपाध्यक्ष गजेंद्र दांदडे, नगरसेवक मोहन पऱ्हाड, नगरसेवक अशोक इंगळे, शिवसेना शहरप्रमुख आशिष जाधव, युवासेना शहरप्रमुख श्रीकांत गायकवाड, प्रा. अनिल रिंढे, जीवन उबरहंडे, गोपाल निळकंठ, सरपंच देवानंद दांडगे तसेच स्मारक समितीचे पदाधिकारी आणि शिवप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या स्मारकाशी निगडित उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि स्मारक समितीच्या कार्याला संघटित स्वरूप देण्यासाठी नव्या कार्यकारिणीची स्थापना महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आ. संजय गायकवाड (MLA Sanjay Gaikwad) यांनी सांगून, लवकरच गठीत होणाऱ्या नव्या समितीच्या माध्यमातून आगामी उपक्रमांना दिशा मिळणार असल्याचे सांगितले.

टैग्स: mla sanjay gaikwad

संबंधित सामग्री

संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे संकेत; एकनाथ शिंदे संतप्त, शिंदे गटातून हकालपट्टीची शक्यता?

संजय गायकवाड यांच्यावर कारवाईचे संकेत; एकनाथ शिंदे संतप्त, शिंदे गटातून हकालपट्टीची शक्यता?

शेतकऱ्यांवरील वादग्रस्त विधानामुळे संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढल्या. एकनाथ शिंदे नाराज असल्याची माहिती; हकालपट्टीचीही मागणी.

Oct 30, 2026
आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी: आ. संजय गायकवाड

आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी: आ. संजय गायकवाड

MLA Sanjay Gaikwad: आम्ही सत्तेसाठी नसून जनतेच्या सेवेसाठी आहोत. सत्तेपेक्षा जनतेचा विश्वास आमच्यासाठी मोठा आहे. जनतेच्या सुख-दुःखात सहभागी होणे, विकासकामे करणे आणि सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी...

Aug 17, 2026
धर्मरक्षणासाठी संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा...

धर्मरक्षणासाठी संभाजी महाराजांच्या बलिदानाची प्रेरणा...

हिंदू धर्मरक्षक, पराक्रमी आणि अद्वितीय शौर्याचे प्रतीक असलेल्या छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदानाची प्रेरणा घेऊन येत्या गुढीपाडव्याला प्रत्येक घरावर स्वराज्याचा भगवा ध्वज फडकवावा.

Mar 18, 2026