मंत्री अतुल सावे

मंत्र्यांनी अधिवेशनात दिलेली आश्वासने हवेतच विरली 

Minister Atul Save: सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शाळांमध्ये आर्थिक गैरव्यवहार निष्पन्न झाले होते. यावर कडक कारवाईचे आश्वासन मंत्री अतुल सावे

मंत्र्यांनी अधिवेशनात दिलेली आश्वासने हवेतच विरली 

Minister Atul Save

 

गैरव्यवहार सिध्द झालेल्या विद्याशक्ती शिक्षण संस्थेविरूध्द कारवाई शून्य

हिंगोली (Minister Atul Save) : सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेच्या शाळांमध्ये आर्थिक गैरव्यवहार निष्पन्न झाले होते. यावर कडक कारवाईचे आश्वासन मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी अधिवेशना दरम्यान दिले होते. चार महिने उलटूनही कारवाई न झाल्याने आमदार तान्हाजी मुटकुळे हे राज्याच्या आश्वासन समितीकडे तक्रार करणार आहेत.  सेनगाव तालुक्यातील कोळसा येथील विद्याशक्ती शिक्षण प्रसारक मंडळ या संस्थेची निवड शासनाच्या विशेष योजनेत झाली होती.

या योजनेतंर्गत संस्थेला २०२१ - २२ ते २०२५ - २६ दरम्यान ५ कोटी रुपयांचे अनुदान मिळाले होते. संस्थेच्या कारभाराबाबत सतत तक्रारी येत असल्याने आमदार तान्हाजी मुटकुळे यांनी याबाबत वरिष्ठ स्तरावर तक्रारही केली होती. या तक्रारीनंतर शासनातर्फे नियुक्त करण्यात आलेल्या अधिकार्‍यांनी याबाबत सखोल तपासणी केली. या तपासणीत योजनेचा लाभ मिळण्यासाठी सदर संस्थेने बनावट कागदपत्रांचा आधार घेतल्याचे स्पष्ट झाल्याने तत्कालिन सहाय्यक आयुक्त यांनी कामकाजात कुचराई पणा केल्याचा विषयही चौकशीतून समोर आला होता.  ग्रामस्थांनी केलेल्या अनेक तक्रारी व राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी तक्रार करून देखील संस्थे विरोधात कारवाई होत नसल्याने आ.तान्हाजी मुटकुळे यांनी जून २०२६ मध्ये झालेल्या राज्यशासनाच्या पावसाळी अधिवेशनात  लक्षवेधी सूचना मांडली होती. 

आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री अतुल सावे (Minister Atul Save) यांनी सदर संस्थेवर व संस्था चालकास मदत करणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाईचे आश्वासन दिले होते. याबाबत इतर मागास बहूजन कल्याण विभागाच्या संचालक सोनाली मुळे यांनी तीन महिन्यात संस्थेकडून रकमेची वसूली न झाल्यास फौजदारी कारवाईचे आदेश दिले होते. चार महिने उलटूनही कोणतीच कारवाई झाली नसल्याने शासन गैरकारभार करणार्‍यांना अभय देत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे आ.तान्हाजी मुटकुळे यांनी बाबत शासनाच्या आश्वासन समितीकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले आहे.

टैग्स: Minister Atul Save