Manoj Jarange Hunger Strike: संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या अंतरावली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ पाठिंबा
मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या अंतरावली सराटी येथील आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ
आ. बाळापूर/सेनगाव/ जवळा बाजार (Manoj Jarange Hunger Strike) : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली मराठा योध्दा मनोज जरांगे यांच्या अंतरावली सराटी येथे सुरू असलेल्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ पाठिंबा देण्यासाठी गुरुवार ३ सप्टेंबर रोजी आखाडा बाळापूर, सेनगाव जवळा बाजार बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर आखाडा बाळापूर, जवळा बाजार व सेनगाव शहरातील सर्व व्यापारी, दुकानदार, व्यावसायिक, संस्था तसेच नागरिकांनी बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
बंद दरम्यान दुकाने व व्यवसाय बंद ठेवण्याबरोबरच वाहतूक तसेच शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ‘जरांगे पाटील (Manoj Jarange Hunger Strike) यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी हा बंद असून, मराठा बांधवांसह सर्व शहरवासीयांनी एकजुटीने सहभागी व्हावे,’ असे आवाहन सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले आहे.
दरम्यान, बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील बाजारपेठ व दैनंदिन व्यवहारांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन शांततेत बंदमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन सकल मराठा समाज आयोजकांकडून करण्यात आले आहे. बंदनिमित्त कोठेही अनुचित घटना घडू नये, यासाठी पोलिस प्रशासना तर्फे देखील चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.