Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

Maharashtra Weather

Maharashtra Weather Update: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार; पुणे-सातारा घाटमाथ्यासह 'या' जिल्ह्यांना येलो अलर्ट

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेग तुलनेने कमी झालेला असला, तरी आता पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे.


maharashtra weather update राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार पुणे-सातारा घाटमाथ्यासह या जिल्ह्यांना येलो अलर्ट

Maharashtra Weather |

मराठवाडा आणि पूर्व विदर्भात विजांसह वादळी पावसाची शक्यता; उत्तर भारतातील अनेक राज्यांनाही पावसाचा इशारा

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाचा वेग तुलनेने कमी झालेला असला, तरी आता पुन्हा पावसासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आगामी काळात राज्यातील काही भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. आज पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर जोरदार सरींची शक्यता असून, मराठवाडा आणि पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांसाठी विजांच्या कडकडाटासह पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

पुणे आणि सातारा जिल्ह्यांच्या घाटमाथ्यावर आज मुसळधार ते जोरदार पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. त्याचवेळी मराठवाड्यातील परभणी, हिंगोली आणि नांदेड या जिल्ह्यांमध्ये तसेच पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली येथे मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पाऊस सुरू असताना अनावश्यकपणे बाहेर न पडता सुरक्षित ठिकाणी राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

उत्तर महाराष्ट्रातही पावसाचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील इतर भागांमध्ये बहुतांश वेळ ढगाळ वातावरण राहू शकते. काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडण्याचा अंदाज आहे.

दरम्यान, महाराष्ट्राबरोबरच देशाच्या विविध भागांमध्येही पावसासाठी पोषक हवामान तयार झाले आहे. उत्तर भारत, पश्चिम भारत आणि ईशान्य भारतात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने सोमवारी देशातील किमान १५ राज्यांमध्ये पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याचा इशारा दिला आहे. काही ठिकाणी वाऱ्याचा वेग ताशी ५० ते ६० किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता आहे.

राजधानी दिल्लीमध्ये मेघगर्जनेसह मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सध्या जाणवत असलेल्या उकाडा आणि दमट हवामानापासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक जिल्ह्यांत हलक्या सरींपासून मुसळधार पावसापर्यंतची स्थिती निर्माण होऊ शकते. या भागात जोरदार वारेही वाहण्याची शक्यता आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशातील काही भागांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

याशिवाय उत्तराखंड आणि हिमाचल प्रदेशातील अनेक जिल्ह्यांत जोरदार पावसासह अतिवृष्टीची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. जम्मू-काश्मीरच्या उंचावरील भागांमध्ये देखील पाऊस पडण्याचा अंदाज आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी हवामान विभागाकडून जारी करण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related to this topic: