Sakal Maratha Samaj: उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडच्या विमानतळावर आगमन होण्यापूर्वी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात ३० ऑगस्ट रोजी घोषणाबाजी केली.
नांदेड (Sakal Maratha Samaj) : मराठा आरक्षणा संदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंतरवाली सराटी येथे उपोषणास पुन्हा सुरुवात केली. त्यातच उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नांदेडच्या विमानतळावर आगमन होण्यापूर्वी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या विरोधात ३० ऑगस्ट रोजी घोषणाबाजी केली. यावेळी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलिस मुख्यालयात रवानगी केली.
संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हे मराठा समाजाला (Sakal Maratha Samaj) कुणबीचे दाखले मिळावेत व ओबीसी संवर्गात समावेश व्हावा, या मागणीसाठी वेळोवळी आंदोलन करत असतांना सरकार समाजाला फसवत आहे. जरांगे पाटील हे आंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसले आहेत. एकीकडे सामाजिक हिताचे आंदोलन चालु असताना मंत्र्यांनी दौरे करणे ही बाब अत्यंत निंदनीय आहे, तसेच जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा परभणी येथील कार्यक्रम होवु देणार नाही शिंदेंनी येवु नये असे आवाहन केले होते.
दरम्यान नांदेडच्या विमानतळावरुन राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना परभणीकडे जाऊ देणार नाही, (Sakal Maratha Samaj) सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते यांचा जत्था थेट विमानतळावर जात असताना पोलिसांनी त्यांना रोखले. दशरथ कपाटे, सुभाष कोल्हे, राज सरकार, सुभाष शिंदे, गणेश कपाटे, अंकुश कोल्हे, पवन सुर्यवंशी, अक्षय माने, राजेश मोरे व ईतरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. यावेळी कार्यकर्त्यांकडुन मराठा समाजाला कुणबीचे प्रमाणपत्र मिळाले पाहिजे, एकनाथ शिंदे परत जा, जय जिजाऊ जय शिवराय, जरांगे पाटील तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या.
आंदोलन करताना ताब्यात घेवून पोलिस व्हॅनद्वारे आंदोलनकर्त्यांची पोलिस मुख्यालयात रवानगी केली असून या प्रकरणी विमानतळ पोलिस ठाण्यात प्रकरणाची नोंद करण्यात आली.