Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

रोड खड्डे अपघाती मृत्यू

महाराष्ट्रात खड्ड्याचा आणखी एक बळी; पुण्यात वडिलांसमोरच 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Road Potholes Accidental Death: नाशिक, पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांव्यतिरिक्त राज्यातील अनेक शहरांमध्ये खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमलाला लागला आहे.


महाराष्ट्रात खड्ड्याचा आणखी एक बळी पुण्यात वडिलांसमोरच 11 वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

Road Potholes Accidental Death |

पुणे (Road Potholes Accidental Death) : राज्यात सध्या रस्ते आणि रस्त्यांवरील खड्डे याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. नाशिक, पुणे, मुंबई, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी या शहरांव्यतिरिक्त राज्यातील अनेक शहरांमध्ये खड्ड्यांमुळे निष्पाप नागरिकांना आपला जीव गमलाला लागला आहे. याच खड्ड्यांविरोधात आणि खड्ड्यांमुळे नागरिकांनी जीव गमावल्याविरोधात नाशिकमध्ये शिवसेना ठाकरे गटाने मोर्चा काढला होता. तर, याच पक्षाचे युवानेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी चाकण एमआयडीसीच्या रस्त्यांची खड्ड्यांमुळे झालेली चाळण याची पाहणी सुद्धा केली होती.

दुपारी आदित्य ठाकरे यांनी रस्त्याची पाहणी केल्यानंतर त्याच दिवशी सायंकाळी शहराच्या दुसऱ्या भागात म्हणजेच बालेवाडी येथील महाळुंगे येथील ग्रीन कोट सोसायटीसमोरील दुर्गा कॅफेजवळ रस्त्यावरील खड्ड्यात दुचाकी घसरल्याने एका 11 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या (Road Potholes Accidental Death) चिमुकल्याचा त्याच्या वडिलांच्या डोळ्यादेखत जीव गेल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी 7 वाजता 11 वर्षीय मुलगा त्याच्या वडिल आणि बहिणीसोबत दुचाकीवरून ट्युशनला जात होता. मात्र दुर्गा कॅफेजवळ आल्यानंतर रस्त्यातील खड्ड्यामुळे दुचाकी घसरली आणि तिघेही रस्त्यावर पडले. याचवेळी खाली पडलेला मुलगा मागून येणाऱ्या आयशर ट्रकच्या चाकाखाली आला. ट्रकचे चाक अंगावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या (Road Potholes Accidental Death) अपघाताचे दृश्य परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्याची दृश्ये सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. निष्पाप चिमुकल्याचा वडिलांसमोरच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, नागरिकांमध्ये प्रशासनाविरोधात संतापाची लाट उसळली आहे.