Junnar Minor Girl Murder: जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली
पुणे/ जुन्नर (Junnar Minor Girl Murder) : जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी येथे साडेनऊ वर्षांच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या एका तरुणाने मुलीच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिला गावाबाहेर नेल्याचा आरोप आहे. त्यानंतर उसाच्या शेताजवळ तिच्यावर अत्याचार (Junnar Minor Girl Murder) करून तिची हत्या करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
मुलगी बेपत्ता; कुटुंबीयांची पोलिसांत तक्रार
बराच वेळ होऊनही मुलगी घरी परतली नाही, त्यामुळे कुटुंबीयांनी तिचा शोध सुरू केला. मात्र ती सापडत नसल्याने पोलिसांत बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीद्वारे तपास सुरू केला. या (Junnar Minor Girl Murder) तपासादरम्यान पोलिसांनी संशयित आरोपीला काही तासांतच ताब्यात घेतल्याची माहिती आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप गिल यांनी फॉरेन्सिक पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. घटनास्थळी पंचनामा आणि अन्य तपासाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
पिंपळवंडीत रास्ता रोको आंदोलन
या (Junnar Minor Girl Murder) घटनेच्या निषेधार्थ पिंपळवंडी परिसरातील ग्रामस्थ आक्रमक झाले असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि पीडितेला न्याय मिळावा, या मागणीसाठी पुणे-नाशिक महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिस आणि प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू असून, तपासातील निष्कर्षानुसार पुढील कारवाई केली जाणार आहे.