LPG आधार बायोमेट्रिक

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric: ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले: पेट्रोलियम- नैसर्गिक वायू मंत्रालय

LPG बाबत नवे नियम; अनुदानासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण अनिवार्य!

LPG Aadhaar Biometric

प्रमाणीकरण न केल्यास सिलिंडर मिळेल, मात्र अनुदानाचा लाभ मिळणार नाही

नवी दिल्ली/ मुंबई (LPG Aadhaar Biometric) : घरगुती एलपीजी सिलिंडरवर अनुदानाचा लाभ घेणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. 1 ऑक्टोबर 2026 पासून अनुदानासह नियंत्रित दरात एलपीजी रिफिल मिळवण्यासाठी आधार बायोमेट्रिक प्रमाणीकरण (BAA) पूर्ण करणे अनिवार्य करण्यात आले आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे. 19 सप्टेंबरपर्यंत देशातील 27.43 कोटी सक्रिय घरगुती एलपीजी ग्राहकांपैकी सुमारे 89.9 टक्के ग्राहकांनी आधार प्रमाणीकरण पूर्ण केले आहे. त्यामुळे या ग्राहकांना पुन्हा प्रमाणीकरण करण्याची आवश्यकता नाही. मात्र, (LPG Aadhaar Biometric) अद्याप प्रमाणीकरण न केलेल्या ग्राहकांना अनुदानाचा लाभ मिळवण्यासाठी ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

कुठे करता येणार प्रमाणीकरण?

एलपीजी ग्राहकांना (LPG Aadhaar Biometric) आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया सिलिंडरच्या घरपोच वितरणावेळी, गॅस वितरकाच्या कार्यालयात किंवा संबंधित तेल विपणन कंपनीच्या मोबाइल ॲपद्वारे पूर्ण करता येईल. इंडेन ग्राहकांसाठी ‘इंडियनऑइल वन’, भारतगॅस ग्राहकांसाठी ‘हॅलोबीपीसीएल’, तर एचपी गॅस ग्राहकांसाठी ‘एचपी पे’ या ॲपचा पर्याय उपलब्ध आहे.

सिलिंडर मिळणे बंद होणार नाही

आधार बायोमेट्रिक (LPG Aadhaar Biometric) प्रमाणीकरण न केल्यास ग्राहकांना एलपीजी सिलिंडर मिळणे बंद होणार नाही. मात्र, अनुदानाचा लाभ मिळणार नसून सिलिंडर बाजारभावाने खरेदी करावा लागेल. सरकारच्या म्हणण्यानुसार, अनुदानाचा लाभ केवळ पात्र ग्राहकांपर्यंत पोहोचवणे तसेच दुबार आणि अपात्र एलपीजी जोडण्या रोखणे, हा या निर्णयामागील प्रमुख उद्देश आहे.

संबंधित सामग्री

CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल

CJP नेत्यांच्या अटकेवरून राहुल गांधी आक्रमक; शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारावरून केंद्रावर हल्लाबोल

Rahul Gandhi: दिल्लीतील जंतर-मंतर येथे झालेल्या आंदोलनावरून सुरू झालेला वाद आता राजकीयदृष्ट्या अधिक तीव्र झाला आहे. कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या दोन नेत्यांना अटक करून तिहार तुरुंगात पाठवण्यात आले..

Oct 14, 2026
दिल्लीतील आंदोलनांचे ठिकाण बदलले! जंतर-मंतरच्या जागी आता कुठे करता येणार निदर्शने?

दिल्लीतील आंदोलनांचे ठिकाण बदलले! जंतर-मंतरच्या जागी आता कुठे करता येणार निदर्शने?

दिल्लीतील जंतर-मंतरबाबत गृह मंत्रालयाचा मोठा निर्णय. आंदोलनांसाठी रामलीला मैदान, बुराडी मैदान आणि CBD ग्राउंड ही तीन पर्यायी ठिकाणे निश्चित.

Oct 12, 2026
सरन्यायाधीशांच्या नवीन टिप्पणीनंतर आता नवा पक्ष चर्चेत; ‘मख्खी जनता पार्टी’च्या पोस्टवर मीम्सचा पाऊस

सरन्यायाधीशांच्या नवीन टिप्पणीनंतर आता नवा पक्ष चर्चेत; ‘मख्खी जनता पार्टी’च्या पोस्टवर मीम्सचा पाऊस

दिल्लीतील CJP आंदोलनादरम्यान नेत्यांसह 1,000 हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेतल्याचा दावा. सरन्यायाधीशांच्या कथित टिप्पणीशी जोडलेल्या ‘मख्खी जनता पार्टी’ची चर्चा.

Oct 10, 2026
CJP आंदोलनात अभिजीत दीपके यांच्यासोबत ध्रुव राठींची एन्ट्री!

CJP आंदोलनात अभिजीत दीपके यांच्यासोबत ध्रुव राठींची एन्ट्री!

Cockroach Janata Party Andolan: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेविरोधात बंगळुरूत आंदोलन

Oct 08, 2026
“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

“हनुमान चालिसेने मला धैर्य दिलं”; कॅप्टन स्मित माछर यांनी PM मोदींना सांगितला विमानातील थरारक प्रसंग

फ्लाय-दुबई पायलट स्मित माछर यांनी PM मोदींशी संवादात विमानातील संकटाचा अनुभव सांगितला. हनुमान चालिसेमुळे धैर्य मिळाल्याचे त्यांनी म्हटले.

Oct 02, 2026