लातूर मुख्यालय पोलीस स्मृतीदिन

देशभरातील कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या १५२ पोलीस अधिकारी व अंमलदारांना भावपूर्ण श्रद्धांजली

Latur Police Commemoration Day: देशाची अंतर्गत सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखताना तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदार

देशभरातील कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या १५२ पोलीस अधिकारी व अंमलदारांना भावपूर्ण श्रद्धांजली

Latur Police Commemoration Day

 

लातूरच्या मुख्यालयात पोलीस स्मृतीदिन साजरा
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांची उपस्थिती

लातूर (Latur Police Commemoration Day) : देशाची अंतर्गत सुरक्षा, कायदा व सुव्यवस्था राखताना तसेच नागरिकांच्या संरक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना आपल्या प्राणांचे सर्वोच्च बलिदान देणाऱ्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या स्मृतीप्रित्यर्थ पोलीस मुख्यालय, बाभळगाव, लातूर येथे बुधवारी सकाळी ८ वाजता पोलीस स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी देशभरातील कर्तव्य बजावताना हुतात्मा झालेल्या १५२ पोलीस अधिकारी व अंमलदारांना पुष्पचक्र अर्पण करून भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश  संजय भारुका उपस्थित होते.

१ सप्टेंबर २०२५ ते १ ऑगस्ट २०२६ या कालावधीत देशाच्या सुरक्षेसाठी आणि जनतेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावताना वीरमरण प्राप्त झालेल्या १५२ पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या बलिदानाचे यावेळी स्मरण करण्यात आले. या (Latur Police Commemoration Day) हुतात्म्यांमध्ये महाराष्ट्रातील पोलीस अंमलदार दीपक चिन्ना मडावी आणि नवलसिंग हवेल्या वसावे यांचाही समावेश आहे. यावेळी पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी प्रास्ताविकात हुतात्मा पोलिसांचे बलिदान हे संपूर्ण पोलीस दलासाठी सदैव प्रेरणादायी असल्याचे अधोरेखित केले.  

त्यानंतर पोलीस गार्डच्या वतीने हुतात्मा पोलिसांना शोक सलामी देण्यात आली. कर्तव्य बजावताना प्राणार्पण केलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांच्या नावांचे वाचन करून हुतात्मा स्मारकास पुष्पचक्र अर्पण करण्यात आले. यावेळी शस्त्र सलामी देण्यात आली, हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून मानवंदना देण्यात आली तसेच अंतिम सलामी अर्पण करून हुतात्म्यांना आदरांजली वाहण्यात आली. (Latur Police Commemoration Day) पोलीस गार्डचे नेतृत्व आरपीआय राठोड यांनी केले.

या कार्यक्रमास अपर पोलीस अधीक्षक मंगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस अधीक्षक श्रीमती मेघना आय. एन., जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, लातूर शहरातील सर्व पोलीस निरीक्षक तसेच जिल्ह्यातील अन्य पोलीस अधिकारी व अंमलदार उपस्थित होते.

हुतात्मा पोलिसांच्या बलिदानाप्रती सदैव कृतज्ञ

यावेळी (Latur Police Commemoration Day) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय भारुका यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कर्तव्य बजावताना देशासाठी बलिदान दिलेल्या पोलीस अधिकारी व अंमलदारांचे योगदान अत्यंत मोलाचे असल्याचे सांगितले. त्यांच्या सर्वोच्च त्यागामुळे देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दलाची भूमिका किती महत्त्वपूर्ण आहे, याची जाणीव होते. हुतात्मा पोलिसांच्या कुटुंबीयांवर आलेले दुःख शब्दांत व्यक्त करणे कठीण असून, त्यांच्या बलिदानाप्रती आपण सदैव कृतज्ञ राहिले पाहिजे, असे त्यांनी नमूद केले.