Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

कावड यात्रा

कावड यात्रेमुळेच युवा धर्माच्या मार्गावर: खा. श्रीकांत शिंदे

Kavad Yatra: देशातील युवा वर्ग संस्कृती पासून दूर जात असल्याच्या तक्रारी होत असताना हिंगोली कळमनुरीत मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले. कावड यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या या युवकांची श्रद्धा व जल्लोष


कावड यात्रेमुळेच युवा धर्माच्या मार्गावर खा श्रीकांत शिंदे

Kavad Yatra |

 

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी केले संतोष बांगर यांचे कौतुक

हिंगोली (Kavad Yatra) : देशातील युवा वर्ग संस्कृती पासून दूर जात असल्याच्या तक्रारी होत असताना हिंगोली कळमनुरीत मात्र वेगळेच चित्र पहायला मिळाले. (Kavad Yatra) कावड यात्रेमध्ये सहभागी होणार्‍या या युवकांची श्रद्धा व जल्लोष पाहून हा संतोष बांगर व त्यांच्या सहकार्‍यांनी संस्कृती व धर्म टिकवून ठेवल्याचा आनंद होत आहे अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी संतोष बांगर यांचे कौतुक केले. 

महात्मा गांधी चौकामध्ये कावड यात्रेनिमित्त (Kavad Yatra) आयोजित केलेल्या सभेत व्यासपिठावर संसदरत्न खासदार डॉ. श्रीकांत शिंदे,  आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर, शिवसेनेचे सचिव भाऊसाहेब चौधरी, जिल्हा संपर्क प्रमुख आनंदराव जाधव, खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सईद खान, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार बालाजी कल्याणकर, माजी आमदार भाऊराव पाटील गोरेगावकर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.  यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते महापुरूषांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले. त्यानंतर आमदार संतोष बांगर यांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह मान्यवरांचा सत्कार केला. 

सभेच्या प्रारंभी मनोगत व्यक्त करताना आमदार संतोष बांगर यांनी सांगितले की एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री असताना त्यांनी केवळ अडीच वर्षाच्या काळात कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी ३६५० कोटी रुपयांचा निधी दिला. आता काही दिवसांपूर्वी डॉक्टर श्रीकांत शिंदे  यांच्याकडे रस्त्या करिता ४०० कोटींची मागणी केली तेव्हा त्यांनी एका क्षणाचा विलंब न लावता ४०० कोटी रुपये देऊ केले. शिंदे पिता पुत्र म्हणजे देना बँक आहे असे सांगतानाच या पूर्वीची बँक मात्र लेना बँक होती असा टोलाही आ संतोष बांगर यांनी लगावला. कावड यात्रेच्या निमित्ताने महादेवाच कडे साकडे घालताना संतोष बांगर यांनी एकनाथ शिंदे यांना पुन्हा राज्याचे मुख्यमंत्रीपद मिळावे अशी भावना व्यक्त केली. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी संतोष बांगर हे सर्व सामान्यांचे नेते असल्यामुळे पक्षाने त्यांना एकदा मंत्रिपद देऊन टाकावे अशी मागणी केली. नागेश पाटील यांनी मंत्रीपदाची मागणी करताच जमलेल्या हजारो युवकांनी मोठ्याने घोषणा देऊन त्यांच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. 

राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबीटकर यांनी आमदार संतोष बांगर यांच्या सतत सोळा वर्षांपासून सुरू असलेल्या कावड यात्रेच्या आयोजनाचे कौतुक करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  यांचा आवर्जून उल्लेख केला. एकनाथ शिंदे म्हणजे आम्हा शिवसैनिकांसाठी दुसरा भोळा महादेव आहे आम्ही जे जे मागतो तेथे आम्हाला मिळते,अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

 खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे  यांनी आपण आयुष्यात अशी कावड यात्रा कुठेच पाहिली नाही अशा शब्दांत कौतुक करून संतोष बांगर हे खर्‍या अर्थाने सर्वसामान्य कार्यकर्त्यांचे नेते आहेत अशी भावना व्यक्त केली. ज्याप्रमाणे एकनाथ शिंदे यांनी कधीच प्रोटोकॉल पाळला नाही त्याचप्रमाणे संतोष बांगर ही सतत सर्वसामान्य कार्यकर्त्यांमध्ये जनतेमध्ये वावरत असतात म्हणूनच त्यांना जनतेचा कैवारी असे म्हटले जाते असे सांगून संतोष बांगर यांना आमदार करण्याची हिंगोलीकरांची मागणी एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी यावेळी डॉक्टर श्रीकांत शिंदे  यांनी घेतली.

 हिंगोलीच्या नगराध्यक्षा सौ. रेखाताई श्रीराम बांगर, कळमनुरीच्या नगराध्यक्षा आश्लेषा पाटील, युवासेना जिल्हा प्रमुख राम कदम, रत्नाकर बांगर, अ‍ॅड. मनिष साकळे, हिंगोली नगर परिषदेचे शिवसेना गटनेते श्रीराम बांगर, नगर परिषदेचे अब्दुल माबुद बागवान, नगरसेवक गणेश बांगर, सुभाष बांगर, रामकिसन बांगर, खली बांगर, सुमित कांबळे, कपिल खंडेलवाल, नाना नायक, विशाल गोटरे, अक्षय लव्हाळे, साद अहेमद, भरत चौधरी, शाम कदम, रविंद्र वाढे, गुड्डू बांगर, नितीन बांगर, निश्चल यंबल, संतोष आर. बांगर, राजेंद्र शिखरे, अनिल नैनवाणी, अ‍ॅड. अविनाश बांगर यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती होती.या सभेमध्ये हजारोंच्या संख्येने शिवभक्तांची उपस्थिती होती.

आ. संतोष बांगर यांच्या मंत्री पदाबाबत शिवभक्तांच्या घोषणा

वर्षातील ३६५ दिवस काम करणारे आमदार संतोष बांगर यांना मंत्रिपद मिळावे या मागणीकरीता उपस्थित हजारो शिवभक्तांनी घोषणा दिल्या. खा. श्रीकांत शिंदे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच या घोषणा अधिकच वाढल्या. त्यामुळे आपल्या सर्वांच्या भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापर्यंत पोहचविण्याची ग्वाही खा. शिंदे यांनी शिवभक्तांना दिली.

Related to this topic: