जयपूर सरपंचपद निवडणुक

सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स, निवडणुकीत मिळाली फक्त 33 मते!

Jaipur Sarpanch Election: प्रत्यय राजस्थानमधील एका ज्योतिषाला आला आहे. सोशल मीडियावर तब्बल 21 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या ओमप्रकाश बिश्नोई यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत अवघी 33 मते मिळाली.

सोशल मीडियावर 21 लाख फॉलोअर्स, निवडणुकीत मिळाली फक्त 33 मते!

Jaipur Sarpanch Election

 

राजस्थानच्या ज्योतिषाची अजब कहाणी

जयपूर (Jaipur Sarpanch Election) : सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स असले म्हणजे प्रत्यक्ष आयुष्यातही तितकीच लोकप्रियता मिळते, असे नाही. याचा प्रत्यय राजस्थानमधील एका ज्योतिषाला आला आहे. सोशल मीडियावर तब्बल 21 लाखांहून अधिक फॉलोअर्स असलेल्या ओमप्रकाश बिश्नोई यांना सरपंचपदाच्या निवडणुकीत अवघी 33 मते मिळाली. विशेष म्हणजे, गावातील सुमारे 1,600 मतांपैकी त्यांना मिळालेल्या अत्यल्प मतांमुळे त्यांच्या पराभवाची चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग

ओमप्रकाश बिश्नोई हे राजस्थानमधील (Jaipur Sarpanch Election) जोधपूर जिल्ह्यातील ओशियान परिसरात राहतात. चेहरा पाहून तसेच कुंडलीच्या आधारे भविष्य सांगण्यासाठी ते प्रसिद्ध आहेत. ते ज्योतिषी असण्यासोबतच यूट्यूबर आणि सोशल मीडिया इन्फ्ल्युएन्सर म्हणूनही ओळखले जातात. त्यांचे इन्स्टाग्रामवर तब्बल 14 लाख, फेसबुकवर 2 लाखांहून अधिक फॉलोअर्स, तर यूट्यूबवर सुमारे 5.5 लाख सबस्क्रायबर्स आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या भविष्यवाणीचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. एवढा मोठा चाहता वर्ग असूनही प्रत्यक्ष निवडणुकीत मात्र त्यांना मतदारांचा अपेक्षित पाठिंबा मिळाला नाही.

1600 मतांपैकी मिळाली फक्त 33 मते

ओमप्रकाश बिश्नोई यांनी राजस्थानमधील (Jaipur Sarpanch Election) जोधपूर जिल्ह्यातील ओशियान परिसरातील इंदो की धानी-2 या गावातील सरपंचपदाची निवडणूक लढवली होती. मात्र, (Jaipur Sarpanch Election) निवडणुकीचा निकाल त्यांच्या विरोधात लागला. गावातील सुमारे 1600 मतांपैकी त्यांना केवळ 33 मतांवर समाधान मानावे लागले. सोशल मीडियावर लाखो लोकांचे भविष्य सांगणाऱ्या ज्योतिषाला स्वतःच्या राजकीय भविष्याचा अंदाज का आला नाही, अशा मिश्किल प्रतिक्रिया या निकालानंतर उमटत आहेत.

पराभवानंतर मतदारांचे मानले आभार

निवडणुकीत (Jaipur Sarpanch Election) पराभव स्वीकारल्यानंतर ओमप्रकाश बिश्नोई यांनी त्यांना मतदान करणाऱ्या मतदारांचे आभार मानले. निवडणूक लढवताना मतदारांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी दारू किंवा इतर कोणत्याही प्रकारचे आमिष दाखवले नाही, याचे आपल्याला समाधान असल्याचे त्यांनी सांगितले. या निवडणुकीच्या निकालामुळे सोशल मीडियावरील लोकप्रियता आणि प्रत्यक्ष जमिनीवरील जनसंपर्क यातील फरक पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. इंटरनेटवर लाखो लोकांचे लक्ष वेधून घेणे आणि स्थानिक पातळीवर मतदारांचा विश्वास संपादन करणे या दोन वेगळ्या गोष्टी असल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे.

संबंधित सामग्री

नागपुरातील भाजपच्या पराभवाने महायुतीत खळबळ; फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

नागपुरातील भाजपच्या पराभवाने महायुतीत खळबळ; फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

Maharashtra Legislative Council Election: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेसने विजय मिळवल्याने महायुतीमधील राजकीय..

Oct 29, 2026
“भाजपसोबत कधीच जाणार नाही”; नितेश कराळेंचा ठाम पवित्रा, म्हणाले, “मी किंगमेकर बनलो!”

“भाजपसोबत कधीच जाणार नाही”; नितेश कराळेंचा ठाम पवित्रा, म्हणाले, “मी किंगमेकर बनलो!”

नागपूर पदवीधर निवडणुकीतील यशानंतर नितेश कराळेंची प्रतिक्रिया; भाजपमध्ये जाण्यास स्पष्ट नकार, शरद पवारांबद्दल आदर आणि पुढील निवडणुकांवर लक्ष.

Oct 29, 2026
नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत १५ हजारांहून अधिक मते बाद; मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत १५ हजारांहून अधिक मते बाद; मतदान प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह

नागपूर विभाग पदवीधर निवडणुकीत १५ हजार ३२ मते बाद; एकूण मतदानाच्या ९.०६ टक्के मतांमुळे राजकीय वर्तुळात चर्चा.

Oct 28, 2026
तुरुंगातून बाहेर येताच सौरभ दासच्या अडचणी वाढल्या; आशुतोष रांकाही अडचणीत!

तुरुंगातून बाहेर येताच सौरभ दासच्या अडचणी वाढल्या; आशुतोष रांकाही अडचणीत!

Cockroach Janata Party Protest: तुरुंगातून बाहेर आल्यानंतरही कॉकरोच जनता पार्टी (CJP)चे सहसंयोजक सौरभ दास आणि आशुतोष रांका यांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. दिल्ली पोलिसांनी चौकशीसाठी बोलावून

Oct 23, 2026
काइली जेनरच्या  Victoria’s Secret  शोमध्ये धमाकेदार डेब्यू; ४,४१० हिऱ्यांच्या ५० मिलियन डॉलरच्या ब्राने वेधले लक्ष

काइली जेनरच्या Victoria’s Secret शोमध्ये धमाकेदार डेब्यू; ४,४१० हिऱ्यांच्या ५० मिलियन डॉलरच्या ब्राने वेधले लक्ष

काइली जेनरचा Victoria’s Secret शोमध्ये डेब्यू! ४,४१० हिऱ्यांनी सजलेल्या ५० मिलियन डॉलरच्या Fantasy Bra मुळे फॅशनविश्वात चर्चा आणि वाद.

Oct 21, 2026