Soybean Oil Import Record : कापसाच्या गाठींवर शून्य टक्के आयात कर लावल्यामुळे कापसाच्या विक्रमी आयातीनंतर आता सणासुदीचे महत्त्व सांगून सोयातेलाचीही विक्रमी आयात होणार असल्याचेही संकेत
मुंबई/ वर्धा (Soybean Oil Import Record ) : कापसाच्या गाठींवर शून्य टक्के आयात कर लावल्यामुळे कापसाच्या विक्रमी आयातीनंतर आता सणासुदीचे महत्त्व सांगून सोयातेलाचीही विक्रमी आयात होणार असल्याचेही संकेत मिळाले आहेत.ऑगस्ट महिन्यातच सोयातेलाची आयात ६.२० लाख टनांवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आयात कापसावरील शुल्क केंद्र सरकारने तात्पुरते माफ केल्याने ऑगस्ट २५ ते जुलै २६, या कालावधीत भारतात विक्रमी ४८ लाख कापूस गाठींची आयात केली गेली होती.
या विपणन वर्षात ऑगस्ट २६ ते जुलै २७पर्यंत पुन्हा ३० लाख कापूस गाठींची आयात होण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानेही ऑगस्टमधील जागतिक कापूस अहवालात या (Soybean Oil Import Record) अंदाजावर शिक्कामोर्तब केले आहे. यातून भारतातील कापड गिरण्यांना स्वस्तात कापूस मिळाल्याने त्याचा थेट फटका भारतातील कापूस उत्पादक शेतकर्यांना बाजारपेठेतील भाव पडत बसणार आहे. वस्त्रोद्योगाला स्वस्त कच्चा माल उपलब्ध करून देण्याच्या नावाखाली ही कापसाची विनाशुल्क कापूस आयात करण्यात आली.
यापाठोपाठ ऑगस्ट तसेच सप्टेबरमधील सणांसुदींचे निमित्त सांगून सोयातेलाची विक्रमी आयात केली जाणार असल्याचे दिसते. ही (Soybean Oil Import Record) आयात मासिक सरासरी आयातीपेक्षा ४६ टक्क्यांनी अधिक राहील,असे सांगितले जात आहे. या कालावधीतील मासिक आयात ४ लाख २४ हजार ५४९ टन होती. ती ६.२० लाख टनांवर पोहोचेल, असे बाजार निरिक्षकांचे मत आहे. सूर्यफूल तेलाच्या आयातील अडथळे निर्माण झाल्याने सोयातेलाला पसंती दिली गेली आहे, असे वनस्पती तेल ब्रोकरेज कंपनी सनविन ग्रुपचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप बाजोरिया यांचे म्हणणे आहे.