भारतीय चक्रीवादळ

इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

Indian Cyclone: ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तीन तीव्र चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या अभ्यासातून समोर आले आहे. इस्रोच्या संशोधकांनी मागील सुमारे चार दशकांतील समुद्र..

इस्रोचा इशारा...चक्रीवादळाचा धोका उंबरठ्यावर

Indian Cyclone

 

ऑक्टोबर ते डिसेंबरदरम्यान तीन तीव्र वादळांची शक्यता

मुंबई/ वर्धा (Indian Cyclone) : मान्सूनच्या परतीनंतर उत्तर हिंद महासागरात चक्रीवादळांची सक्रियता वाढण्याची शक्यता असून, याबाबत भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO)ने सावधतेचा इशारा दिला आहे. ऑक्टोबर ते डिसेंबर या कालावधीत तीन तीव्र चक्रीवादळे निर्माण होण्याची शक्यता असल्याचे इस्रोच्या अभ्यासातून समोर आले आहे. इस्रोच्या संशोधकांनी मागील सुमारे चार दशकांतील समुद्र आणि वातावरणाशी संबंधित माहितीचा अभ्यास केला आहे. या अभ्यासानुसार, यंदाच्या मान्सूननंतर समुद्रातील वातावरण असामान्यपणे अस्थिर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे उत्तर हिंद महासागरात चक्रीवादळांची निर्मिती (Indian Cyclone) होण्यास पोषक परिस्थिती निर्माण होऊ शकते.

संशोधनानुसार, यंदा निर्माण होणाऱ्या संभाव्य तीन वादळांची तीव्रता ऐतिहासिक सरासरीच्या तुलनेत अधिक असू शकते. (Indian Cyclone) समुद्रातील चक्रीवादळांच्या तीव्रतेचा अंदाज घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पॉवर डिसिपेशन इंडेक्स (PDI) मध्येही वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मागील 44 वर्षांच्या तुलनेत या कालावधीतील वादळांची ऊर्जा अधिक तीव्र राहण्याची शक्यता असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.

मान्सूननंतर वाढणार समुद्री अस्थिरता

मान्सूनच्या माघारीनंतर समुद्रातील वातावरणातील बदलांमुळे वादळी परिस्थिती निर्माण (Indian Cyclone) होण्याची शक्यता आहे. जागतिक हवामान घटकांचाही इस्रोच्या शास्त्रज्ञांनी अभ्यास केला आहे. मात्र, संभाव्य चक्रीवादळे नेमकी कोणत्या दिवशी आणि कुठे धडकतील, याबाबत अद्याप स्पष्ट अंदाज देण्यात आलेला नाही. यंदा एल-निनोच्या प्रभावामुळे पावसाच्या वितरणावर परिणाम झाल्याचेही नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे काही भागांमध्ये पावसाची तूट निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर मान्सूननंतरच्या काळातील हवामानातील बदलांकडे विशेष लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपत्कालीन यंत्रणांना तयारीची संधी

इस्रोच्या या अभ्यासामुळे संभाव्य चक्रीवादळांचा धोका लक्षात घेऊन प्रशासनाला आधीपासून तयारी करण्यास वेळ मिळू शकतो. किनारी भागातील नागरिकांचे संरक्षण, मालमत्तेची सुरक्षा, आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवणे तसेच गरज भासल्यास समुद्रातील मासेमारीसारख्या उपक्रमांवर निर्बंध घालण्याच्या उपाययोजना करता येऊ शकतात. संभाव्य वादळांची नेमकी ठिकाणे आणि वेळ अद्याप निश्चित नसली, तरी वर्षाच्या अखेरीस उत्तर हिंद महासागरातील चक्रीवादळांची सक्रियता वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रशासन आणि नागरिकांनी सतर्क राहणे आवश्यक ठरणार आहे.

संबंधित सामग्री

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गातील शाळांच्या वेळा बदलण्याची मागणी; वाढत्या उन्हामुळे वैभव नाईकांचे शिक्षणमंत्र्यांना पत्र

सिंधुदुर्गात वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी माजी आमदार वैभव नाईक यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

Oct 07, 2026
16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

16 ऑक्टोबरपासून सर्व नागरी संस्थांमध्ये 10% पाणीकपात; गिरीश महाजनांचा मोठा निर्णय

अलनिनोच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात जलसंकटाची शक्यता; 16 ऑक्टोबरपासून 10% पाणीकपात आणि धरणांमध्ये 10% आपत्कालीन बफर साठा.

Oct 05, 2026
पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

पावसाने घेतली विश्रांती, आता ‘ऑक्टोबर हीट’चा कहर; राज्यात तापमानाचा पारा चढला

महाराष्ट्रात मान्सूनच्या परतीनंतर ऑक्टोबर हीटचा तडाखा वाढला आहे. मुंबई-कोकणात दमट उकाडा, पुण्यात बदलते हवामान आणि नागपुरात ३५ अंश तापमान आहे.

Oct 05, 2026
शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

शेती संकटात, सरकारची तयारी कागदावर - निशांत अशोक पोहरे 

महाराष्ट्रातील मान्सून संकट आणि पंजाब-हरियाणातील खतटंचाईच्या पार्श्वभूमीवर भारतीय शेतीसमोरील धोके आणि सरकारी कृषी धोरणांचा आढावा.

Oct 05, 2026
महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात; पुढील २ ते ३ दिवसांत संपूर्ण राज्यातून माघार घेण्याची शक्यता

महाराष्ट्रातून मान्सूनच्या परतीला सुरुवात झाली आहे. मुंबईसह काही भागांतून माघार; पुढील २-३ दिवसांत संपूर्ण राज्यातून मान्सून परतण्याची शक्यता.

Oct 03, 2026