Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

साखर महागाई शुल्क

सणासुदीच्या तोंडावर साखर होणार आणखी महाग?

Sugar Price Hike: साखरेच्या दरवाढीमुळे बाजारात घबराट पसरली असून सर्वसामान्य आणि दुकानदार या दोघांची चिंता वाढली आहे. सणासुदीच्या तोंडावर या दरवाढीमुळे काळाबाजार वाढण्याची भीती निर्माण झाल्यामुळे


सणासुदीच्या तोंडावर साखर होणार आणखी महाग

Sugar Price Hike |

 

निर्यात बंदी, स्टॉक लिमिटनंतर आता 100 टक्के शुल्क माफीचा विचार

मुंबई (Sugar Price Hike) : श्रावण महिन्याच्या सुरुवातीसह देशभरात सणासुदीचे दिवस सुरू होणार आहेत, पण त्याआधीच महागाईचा राक्षस मानगुटीवर येऊन बसला आहे. कालपर्यंत लोक सहज एक-दोन किलो घरी आणू शकत असलेल्या (Sugar Price Hike) साखरेच्या किमतीने अचानक स्वयंपाकघराचे बजेट विस्कळीत केले आहे. गेल्या 15 दिवसांत साखरेची किंमत सुमारे 17 रुपये किलोनी महागली आहे.

अशाप्रकारे, साखरेच्या दरवाढीमुळे (Sugar Price Hike) बाजारात घबराट पसरली असून सर्वसामान्य आणि दुकानदार या दोघांची चिंता वाढली आहे. सणासुदीच्या तोंडावर या दरवाढीमुळे काळाबाजार वाढण्याची भीती निर्माण झाल्यामुळे काही व्यापाऱ्यांनी सरकारला सारखेची किंमत तातडीने नियंत्रण आणण्याची गरज आहे, अन्यथा दिवाळीपर्यंत परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते, असे आवाहन केले आहे.

वाढत्या किमतीवर सरकार स्ट्राईक करणार

अशा परिस्थितीत, बाजारातील सद्यस्थितीची दखल घेऊन सरकार साखरेच्या वाढत्या किमतींना आळा घालण्यासाठी आयातीवरील 100 टक्के शुल्क कमी केले जाऊ शकते किंवा पूर्णपणे रद्द करण्यासारखे मोठे पाऊल उचलू शकते, असा दावा ब्लूमबर्ग अहवालातून समोर आला आहे. देशांतर्गत बाजारात साखरेचा पुरवठा वाढवून भाव खाली आणण्याचा या पावलाचा उद्देश आहे.

अजूनही साशंकता
दरम्यान आता सध्या हा प्रस्ताव फक्त विचाराधीन असून आयात शुल्क कमी करणे किंवा पूर्णपणे हटवण्याचा सरकारने अद्याप अंतिम निर्णय घेतलेला नाही, त्यामुळे शुल्क किती कमी केले जाईल? कोणत्या प्रकारच्या साखरेला सवलत मिळेल आणि आयातीवर काही मर्यादा घातल्या जातील का? याबाबत अजूनही साशंकता आहे.

साखरेवर 100 टक्के शुल्क
सरकारने फेब्रुवारी 2018 पासून साखरेवरील आयात शुल्क 50% वरून 100% पर्यंत वाढवलेले जेणेकरून देशांतर्गत बाजारातील किंमतींना लगाम आणि शेतकऱ्यांना स्वस्त परदेशी साखरेपासून वाचवले जाऊ शकेल. अशा स्थितीत, (Sugar Price Hike) साखरेवरील 100 टक्के शुल्क अजूनही लागू आहे.

बाजारात पुरवठा सुधारेल
वरील स्थिती सोप्या भाषेत समजायची तर, परदेशातून 100 रुपयांची साखर आयात केल्यास वाहतूक आणि इतर खर्चांसह 100 रुपये आयात शुल्क आकारले जाते. यामुळे परदेशातून साखर आयात करणे महाग होते. अशा स्थितीत, शुल्क कमी केले किंवा काढून टाकले तर परदेशी साखर भारतात स्वस्त होऊ शकते. आयात वाढल्याने देशांतर्गत बाजारात पुरवठा सुधारेल आणि किमतींवरील दबाव कमी होईल.

Related to this topic: