‘ईडी, सीबीआय लावा, आम्ही घाबरणार नाही’; खड़गेंचा केंद्र सरकारला इशारा!
मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी
नवी दिल्ली (INDIA Ramlila Maidan Rally) : मतदार यादीतील कथित अनियमितता आणि विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेसप्रणीत INDIA आघाडीने आज रविवारी (1 नोव्हेंबर) दिल्लीत शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे. दिल्लीतील रामलीला मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या (INDIA Bloc Rally) महारॅलीपूर्वी विरोधी पक्षांच्या नेत्यांनी ‘व्होट बचाओ, देश बचाओ’चा नारा देत भव्य मोर्चा काढला. या आंदोलनातून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधत, ‘ईडी, सीबीआय लावा, आम्ही घाबरणार नाही,’ असा इशारा दिला.
या (INDIA Bloc Rally) महारॅलीमध्ये लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी (Rahul Gandhi) , काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, जम्मू-काश्मीर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्ला, आरजेडी नेते तेजस्वी यादव, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह विविध विरोधी पक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले.
#WATCH | INDIA bloc mega rally | Delhi: Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "Anyone can join Shiv ki Baraat. Every living being can join it. Can anyone be stopped from participating in that? No. We want that kind of India. If a farmer works hard, he should reap the rewards. If a student studies for 18 hours, they should get employment. We do not want a country that belongs only to two or three people... The first step to get the country back on the right track is to remove Gyanesh Kumar." (Source: ANI/Congress)
— ANI (@ANI) November 1, 2026
‘ईडी-सीबीआयच्या कारवाईला घाबरणार नाही’
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी रामलीला मैदानावरील सभेत केंद्रातील मोदी सरकारवर गंभीर आरोप केले. विरोधकांना केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून दबावाखाली आणण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला. मात्र, अशा कारवायांना विरोधक घाबरणार नसून आपला संघर्ष सुरूच राहील, असे खर्गे यांनी स्पष्ट केले.
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा देईपर्यंत INDIA आघाडीचा लढा सुरूच राहणार असल्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुख्य निवडणूक आयुक्तांना संरक्षण देत असल्याचा आरोपही खर्गे यांनी केला.
#WATCH | INDIA bloc mega rally | Delhi: Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "Listen to me. What I say always turns out to be true, doesn't it? I am telling every citizen and every youth of India: Gyanesh Kumar will be removed from the post of Chief Election Commissioner. Gyanesh Kumar will go to jail." "Without Gyanesh Kumar, neither Narendra Modi would have become Prime Minister nor Amit Shah would have become Home Minister." "The farmer is not getting his rights. The youth are not getting employment. The labourer is not getting his rights, and the entire wealth has gone into the hands of two or three people. We do not want such an India, and we will not accept such an India." (Source: ANI/Congress)
— ANI (@ANI) November 1, 2026
राहुल गांधींसह नेत्यांचा भव्य मोर्चा
रविवारी दुपारी (INDIA Bloc Rally) मिंटो रोड-कनॉट प्लेस परिसरातून INDIA आघाडीच्या नेत्यांनी रामलीला मैदानाच्या दिशेने मोर्चाला सुरुवात केली. नेते खुल्या वाहनातून प्रवास करत असताना मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि समर्थक त्यांच्या सोबत सहभागी झाले. हातात पक्षांचे झेंडे, फलक आणि ‘व्होट बचाओ, देश बचाओ’चे संदेश देणारे पोस्टर घेऊन कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात राहुल गांधी (Rahul Gandhi), प्रियंका गांधी, अखिलेश यादव, ममता बॅनर्जी, अभिषेक बॅनर्जी, फारुख अब्दुल्ला, मेहबूबा मुफ्ती यांच्यासह डाव्या पक्षांचे नेतेही सहभागी झाले. दुपारी दीडच्या सुमारास रामलीला मैदानावर कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याचे वृत्त आहे.
‘मतचोरी’ आणि SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला घेरले
विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेमुळे मोठ्या संख्येने मतदारांची नावे यादीतून वगळली गेल्याचा INDIA आघाडीचा आरोप आहे. या (INDIA Bloc Rally) प्रक्रियेमुळे पात्र मतदार मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे विरोधकांचे म्हणणे आहे. SIR प्रक्रिया रद्द करावी, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकता सुनिश्चित करावी, अशा प्रमुख मागण्या विरोधकांनी केल्या आहेत. तसेच मतपत्रिकेद्वारे निवडणुका घेण्याची मागणीही आघाडीकडून करण्यात आली आहे.
#WATCH | Delhi: Lok Sabha LoP Rahul Gandhi, Congress MP Priyanka Gandhi Vadra, National Conference MP Farooq Abdullah, Samajwadi Party Chief Akhilesh Yadav, NCP-SCP MP Supriya Sule, TMC leader Mamata Banerjee, RJD leader Tejashwi Yadav, and others reach Connaught Place. INDIA bloc leaders will start their march from Minto Road to Ramlila Maidan, where a mega rally will begin shortly.
— ANI (@ANI) November 1, 2026
अखिलेश यादवांचा भाजपवर हल्लाबोल
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनीही सभेत भाजपवर जोरदार टीका केली. उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमधील निवडणुकांमध्ये मतदारांची नावे वगळण्यात आल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप त्यांनी केला. लोकशाहीच्या रक्षणासाठी INDIA आघाडी एकत्र आली असून विरोधकांचा आवाज दाबता येणार नाही, असा दावा त्यांनी केला. रामलीला मैदान हे लोकशाहीच्या लढ्याचे नवे केंद्र बनले असल्याचेही ते म्हणाले.
#WATCH | INDIA bloc mega rally | Delhi: Samajwadi Party president Akhilesh Yadav says, "Those who claimed to be an 'unmovable foot of Angad' now have no ground left beneath them. The people of Kashi have given them a double zero. You and I have seen that the BJP is continuously plotting conspiracies because they know they cannot win among the public. So they have chosen their path through the Election Commission..." (Source: ANI/Congress)
— ANI (@ANI) November 1, 2026
भाजपकडून INDIA आघाडीच्या आंदोलनावर टीका
दरम्यान, INDIA आघाडीच्या आंदोलनावर भाजपनेही जोरदार टीका केली आहे. केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा यांनी या (INDIA Bloc Rally) आंदोलनाला लोकशाहीच्या नावाखाली देशात अस्थिरता निर्माण करण्याचा नियोजित प्रयत्न असल्याचे म्हटले. आंदोलनामुळे दिल्लीतील व्यापारी आणि दुकानदारांचे नुकसान होण्याची शक्यताही भाजपकडून व्यक्त करण्यात आली.
विशेष म्हणजे, 1 नोव्हेंबर हा 1984 मधील शीखविरोधी दंगलींच्या स्मृतिदिनाशी संबंधित असल्याने या (INDIA Bloc Rally) दिवशी आंदोलन आयोजित केल्याबद्दल भाजपने काँग्रेसवर टीका केली. दुसरीकडे, भाजपकडून पश्चिम दिल्लीत 1984 च्या दंगलींच्या मुद्द्यावर स्वतंत्र मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
#WATCH | INDIA bloc mega rally | Delhi: Lok Sabha LoP Rahul Gandhi says, "For years, vote theft has been happening in this country. Madhya Pradesh, Haryana, Chhattisgarh, Maharashtra, Karnataka and the 2024 Lok Sabha elections, in all these elections, vote theft has occurred. Votes have been stolen through EVMs and by deleting and adding names to voter lists." (Source: ANI/Congress)
— ANI (@ANI) November 1, 2026
दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था
INDIA आघाडीच्या महारॅलीच्या पार्श्वभूमीवर दिल्ली पोलिसांनी राजधानीत कडेकोट सुरक्षा व्यवस्था केली आहे. रामलीला मैदान आणि मोर्चाच्या मार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मैदान परिसरात 200 ते 250 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून लक्ष ठेवण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तसेच मध्य दिल्लीतील अनेक मार्गांवर वाहतूक निर्बंध आणि पर्यायी मार्गांची व्यवस्था करण्यात आली आहे.
दरम्यान, INDIA आघाडीच्या या महारॅलीमुळे केंद्र सरकार आणि विरोधी पक्षांमधील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा तीव्र झाला आहे. मतदार यादी, निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदानाचा अधिकार या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.