कृषी पर्यटन केंद्र

980 नव्या कृषी पर्यटन केंद्रांची घोषणा; जुन्या केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष?

Agri-tourism Centre: राज्यात नव्याने 980 कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देणार असल्याची बातमी समोर आली आहे. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे, हवामानाचे संकट कायम आहे...

980 नव्या कृषी पर्यटन केंद्रांची घोषणा; जुन्या केंद्रांकडे मात्र दुर्लक्ष?

Agri-tourism Centre

 

आधी उभारलेल्या केंद्रांचा आढावा न घेता नव्या 980 केंद्रांना आशेचे गाजर? 

दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांनी पुन्हा पैसा गुंतवायचा आणि धोका घ्यायचा का?

भाऊ न्यूज फायर
अकोला (Agri-tourism Centre) :
राज्यात नव्याने 980 कृषी पर्यटन केंद्रांना मंजुरी देणार असल्याची बातमी समोर आली आहे. शेतीतून पुरेसे उत्पन्न मिळत नाही, उत्पादन खर्च सातत्याने वाढतो आहे, हवामानाचे संकट कायम आहे आणि अशा परिस्थितीत शेतीला जोडधंद्याची गरज निर्माण झाली आहे. कृषी पर्यटन ही त्यासाठीची एक चांगली संकल्पना आहे. शेतातच पर्यटकांना आकर्षित करून निवास, भोजन, ग्रामीण जीवनाचा अनुभव, शेतीचे प्रात्यक्षिक, स्थानिक उत्पादनांची विक्री अशा माध्यमातून शेतकऱ्याला अतिरिक्त उत्पन्न मिळू शकते, मात्र प्रश्न कृषी पर्यटनाच्या संकल्पनेला विरोध करण्याचा नाही; प्रश्न आहे तो तिच्या अंमलबजावणीचा.

नव्याने 980 कृषी पर्यटन केंद्रांना (Agri-tourism Centre) मंजुरी ही संख्या पाहता ग्रामीण भागात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार आणि उत्पन्ननिर्मितीची मोठी संधी निर्माण होऊ शकते, असे प्रथमदर्शनी वाटते. परंतु या घोषणेच्या उत्साहापेक्षा त्यातील मूलभूत प्रश्न आणि त्याची उत्तरे हे अधिक महत्त्वाचे आहेत. राज्यात यापूर्वी शेतकऱ्यांनी स्वबळावर उभारलेली कृषी पर्यटन केंद्रे आज कोणत्या स्थितीत आहेत? तर त्यातील बहुतांश अत्यंत अडचणीत आहेत. त्यांचा व्यवसाय चालतो आहे का? फारसा नाही.. त्यांना पर्यटक मिळतात का? अत्यंत कमी.. त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाते का? अजिबात नाही...पर्यटन विभागाकडून त्यांचे प्रभावी प्रमोशन होते का? अजिबात नाही.

केंद्रापर्यंत रस्ता, वीज, इंटरनेट, घरगुती गॅस, सेवा कराचा परतवा यांसारख्या मूलभूत सुविधांची उपलब्धता सरकार तर्फे दिली जाते का? ह्याचे उत्तर सुद्धा नाही असेच आहे. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे या केंद्रांमुळे शेतकऱ्याच्या उत्पन्नात प्रत्यक्ष किती वाढ झाली? तर त्यातील बहुतेक तोट्यात आहेत. या प्रश्नांची जिल्हानिहाय, केंद्रनिहाय आणि आर्थिकदृष्ट्या पारदर्शक उत्तरे ह्यावर सरकारने आधी काम करायला हवे. (Agri-tourism Centre) कृषी पर्यटन धोरण आहे; पण त्याचा प्रत्यक्ष फायदा किती? ह्या प्रश्नाचे उत्तर म्हणजे बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात हेच द्यावे लागेल.. महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणात कृषी पर्यटनाला स्वतंत्र महत्त्व कागदावर देण्यात आले आहे.

मात्र कृषी पर्यटन व्यवसायाला (Agri-tourism Centre) कृषी व्यवसायाच्या स्वरूपात मान्यता, शेतकऱ्यांना दहा वर्षांचा परवाना, कौशल्यविकास व प्रशिक्षण, कृषी व स्थानिक उत्पादनांची पर्यटकांना विक्री, कृषी पर्यटनातील होमस्टेसाठी घरगुती दराने वीज, घरगुती दराने गॅस तसेच बिगर-कृषी परवानगीची आवश्यकता नसणे अशा तरतुदी आहेत, इतकेच नव्हे तर पर्यटन धोरणात कृषी पर्यटनासाठी पायाभूत सुविधा, उद्योगाचा दर्जा आणि पर्यटनाशी संबंधित विविध प्रोत्साहनांचा व्यापक आराखडा आहे मात्र धोरणातील या सवलती आणि प्रोत्साहने या संदर्भात स्वतंत्र जीआर नसल्यामुळे त्या सवलती प्रत्यक्ष शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पोहोचलेल्याच नाहीत, त्यामुळे कागदावर असलेली सुविधा आणि शेतकऱ्याला प्रत्यक्ष मिळणारी मदत यामध्ये जमीन-अस्मानाचा फरक असेल तर नवीन 980 केंद्रांची घोषणा किती उपयोगी ठरणार?

कृषी पर्यटन केंद्र उभारणे म्हणजे केवळ एखादा फलक लावून पर्यटकांना बोलावणे नव्हे.
सरकारने फक्त घोषणा द्यायची?शेतकऱ्याने जमीन, पैसा आणि कर्ज लावायचे;

निवास व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, स्वयंपाकघर, भोजनव्यवस्था, सुरक्षा, पार्किंग, मनोरंजनाच्या सुविधा, शेतीतील अनुभव, स्थानिक उत्पादनांची विक्री, डिजिटल प्रचार, ऑनलाइन बुकिंग या सर्वांसाठी भांडवल लागते. शेतकऱ्याने स्वतःची बचत खर्च करायची, कर्ज काढायचे किंवा शेतीतील पैसा वळवायचा आणि केंद्र उभारायचे. पण त्यानंतर पर्यटक आले नाहीत तर?

कर्जाची परतफेड कोण करणार? दुष्काळी किंवा पाणीटंचाईच्या वर्षात शेतीचे उत्पन्नच अनिश्चित असताना शेतकऱ्याला आणखी एका व्यवसायात गुंतवणूक करण्यास सांगणे म्हणजे त्याच्यासमोर नवी संधी उभी करणे की नवा आर्थिक धोका? हा प्रश्न सरकारला गांभीर्याने विचारला पाहिजे.

कृषी पर्यटन केंद्रांचे स्वतंत्र ऑडिट करावे
सरकारने नव्या 980 केंद्रांना मंजुरी (Agri-tourism Centre) देण्यापूर्वी किंवा त्यांची अंमलबजावणी करण्यापूर्वी राज्यातील विद्यमान कृषी पर्यटन केंद्रांचे स्वतंत्र कार्यप्रदर्शन ऑडिट करावे. कृषी पर्यटन केंद्राला मंजुरी देणे हा या व्यवसायाचा पहिला टप्पा आहे; शेवट नाही. शेतकऱ्याला पर्यटक मिळवून देणे हा त्याहून मोठा प्रश्न आहे. सरकारने कृषी पर्यटन केंद्रांना एकत्रित डिजिटल प्लॅटफॉर्मवर आणावे. प्रत्येक केंद्राची माहिती, उपलब्ध सुविधा, दर, शेतीतील अनुभव, स्थानिक खाद्यपदार्थ, आसपासची पर्यटनस्थळे आणि ऑनलाइन बुकिंगची सुविधा, आणि ज्या घोषणा केल्यात त्यानुसार जीआर काढून त्या सोयी प्रत्यक्षात उपलब्ध करून द्याव्यात, असे कृषी पर्यटन केंद्र उभारणाऱ्या अनेक संचालकांचे म्हणणे आहे.

डिजिटल मदतीची सरकारणे जबाबदारी घ्यावी
पर्यटन विभागाने या केंद्रांचे राज्य, देश आणि परदेशातील पर्यटकांसाठी मार्केटिंग करावे, कारण शेतकऱ्याला फक्त परवाना नको; ग्राहक हवा आहे. फक्त केंद्र उभारण्याची परवानगी देऊन उपयोग नाही, पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी डिजिटल मदत करण्याची जबाबदारीही व्यवस्थेने स्वीकारली पाहिजे. आज ग्रामीण अर्थव्यवस्था अनेक संकटांतून जात आहे. अशा वेळी शेतकऱ्याला “आणखी एक व्यवसाय करा” असे सांगणे सोपे आहे; पण त्या व्यवसायासाठी लागणारे भांडवल, बाजारपेठ आणि जोखीम व्यवस्थापनाची जबाबदारी कोणाची, हा खरा प्रश्न आहे.

पर्यटन केंद्रांचा क्ष्वेतपत्रिका स्वरूपात आढावा घ्यावा: प्रकाश पोहरे
शेतकऱ्याने धडपड करावी, स्वतःच्या पैशातून केंद्र उभे करावे, त्यानंतर पर्यटक येण्याची वाट पाहावी आणि सरकारने मात्र नवीन केंद्रांची संख्या मोजत बसावे अशी व्यवस्था कृषी पर्यटनाला बळ देणारी ठरणार नाही. म्हणूनच नवीन 980 केंद्रांना मंजुरी देताना सरकारने प्रथम राज्यातील विद्यमान (Agri-tourism Centre) कृषी पर्यटन केंद्रांचा श्वेतपत्रिका स्वरूपात आढावा घ्यावा, त्यातील अडचणी दूर कराव्यात, प्रत्यक्ष आर्थिक व पायाभूत मदतीची स्पष्ट यंत्रणा जाहीर करावी आणि त्यानंतरच नव्या केंद्रांचा विस्तार करावा, अशी मागणी वेदनंदिनी कृषी पर्यटन केंद्राचे निर्माते तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी केली आहे.

संबंधित सामग्री

उसाला प्रति मे. टन 4200 रुपये अंतिम दर द्या!

उसाला प्रति मे. टन 4200 रुपये अंतिम दर द्या!

Latur Farmers' Organization: पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उसाला प्रति मेट्रिक टन 4200 रुपये अंतिम दर मिळावा, दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्याचा ऊस चाऱ्यासाठी 4000 रु

Nov 12, 2026
‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

‘विलिनीकरण ठरले तर आम्हाला सांगतील’; राष्ट्रवादीच्या चर्चांवर फडणवीसांचे भाष्य

NCP विलिनीकरणावर देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान. शरद पवार, सुनेत्रा पवार, गोकुळ वाद आणि बिश्नोई टोळीवरही मुख्यमंत्र्यांनी भाष्य केले.

Nov 10, 2026
'गोकुळात कृष्ण वाढतो, मंत्रालयात कंस बोटं मोडतो'; विवेकानंद पाटलांचा टोला!

'गोकुळात कृष्ण वाढतो, मंत्रालयात कंस बोटं मोडतो'; विवेकानंद पाटलांचा टोला!

गोकुळ संघर्ष मोर्चात विवेकानंद पाटलांचा फडणवीस सरकारवर हल्लाबोल. शासकीय संचालकांच्या मतदानाच्या अधिकारावरून उपस्थित केले सवाल.

Nov 09, 2026
गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन! सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट संघर्ष मोर्चा

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात रणकंदन! सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांचा विराट संघर्ष मोर्चा

गोकुळच्या सत्तासंघर्षावरून कोल्हापुरात सतेज पाटलांच्या नेतृत्वाखाली विराट मोर्चा. महायुतीच्या पाच तज्ज्ञ संचालक नियुक्तींविरोधात शेतकरी आक्रमक.

Nov 09, 2026
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेसाठी ११६ कोटींचा निधी मंजूर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी सरकारचा मोठा निर्णय! मातोश्री ग्रामसमृद्धी योजनेसाठी ११६ कोटींचा निधी मंजूर

दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा! मातोश्री ग्रामसमृद्धी शेत पाणंद रस्ते योजनेसाठी ११६ कोटींचा निधी वितरित.

Nov 07, 2026