पालकमंत्री नरहरी झिरवाळ

हाताळ्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली दुष्काळी परिस्थिती पाहणी; विकास कामांसाठी निधीचे आश्वासन 

Minister Narhari Zirwal: पालकमंत्र्यांनी गावाची पाहणी करत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याअभावी सोयाबीन पीक वाळत असल्याची माहिती घेत कोरड्या दुष्काळामुळे हवालदिल

हाताळ्यात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली दुष्काळी परिस्थिती पाहणी; विकास कामांसाठी निधीचे आश्वासन 

Minister Narhari Zirwal

हाताळा (Minister Narhari Zirwal) : सेनगाव तालुक्यातील हाताळा गावाला पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी १६ सप्टेंबर बुधवार रोजी भेट दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल पतंगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिलीप चव्हाण, सरपंच सरपंच शोभाबाई श्रीरंग धामणकर व घनश्याम श्रीरंग धामणकर तसेच जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी लेझीमच्या निनादात पालकमंत्र्यांचे जल्लोषात स्वागत केले.

पालकमंत्र्यांनी गावाची पाहणी करत दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेतला. पाण्याअभावी सोयाबीन पीक वाळत असल्याची माहिती घेत कोरड्या दुष्काळामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांच्या हस्ते नवीन ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सरकारी दवाखाना, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदर्श जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाताळा, अंगणवाडी, गावातील रस्ते व स्वच्छता या सर्व विभागांची त्यांनी पाहणी करून माहिती घेतली.

गावच्या स्मशानभूमीसाठी स्वतःच्या शेतजमिनीतून जागा देणारे सेवानिवृत्त मुख्याध्यापक शेषराव काळे  यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानांतर्गत सेनगाव तालुकास्तरावर तृतीय क्रमांक मिळवल्याबद्दल जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षकांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी सरपंच शोभाबाई श्रीरंग धामणकर व घनश्याम श्रीरंग धामणकर यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत हाताळा गाव खूप छान आहे" असे गौरवोद्गार पालकमंत्र्यांनी काढले. तसेच गावातील उर्वरित विकासकामांसाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

या कार्यक्रमासाठी ग्रामसेवक मेनकुदळे, शिक्षक वर्ग, अंगणवाडी सुपरवायझर वाढवे, सरकारी दवाखान्याचे कर्मचारी, गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमासाठी नवयुवक विकास एकता पॅनलचे पदाधिकारी व युवक वर्गाने  पुढाकार घेतला.

टैग्स: Minister Narhari Zirwal

संबंधित सामग्री

तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ

तरुणाने व्यसनापासून दूर राहून शिक्षणाकडे लक्ष द्यावे: पालकमंत्री नरहरी झिरवळ

Minister Narhari Zirwal: तालुक्यातील  गुंडलवाडी येथे गुरुवारी अन्न व औषध प्रशासन मंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या उपस्थितीत आदिवासी मेळावा उत्साहात पार पडला.

Sep 17, 2026
शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

शेतकरी, महिला-बालकांसह अन्नसुरक्षेला प्राधान्य: पालकमंत्री नरहरी झिरवाळ

Minister Narhari Zirwal: देशातील १२ ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेले औंढा नागनाथ मंदिर हिंगोली जिल्ह्याचे धार्मिक व ऐतिहासिक वैभव आहे. या मंदिराच्या विकास आराखड्यास दोन टप्प्यात..

Sep 17, 2026
पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत 

पालकमंत्र्याच्या हस्ते पाच वनपट्टेधारकांना सात बारा वितरीत 

Minister Narhari Zirwal: वनहक्काच्या दाव्यांना गती देत मंजूर वनपट्टेधारकांना हक्काचे दस्तऐवज मिळवून देण्यासाठी ‘सेवा संकल्प अभियानात’विविध सेवा देण्यात येणार आहेत. यासोबत विविध उपक्रम राबविण्यात येते.

Sep 17, 2026
गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

गोजेगाव येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबाची पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी घेतली सांत्वनपर भेट

Minister Narhari Zirwal: औंढा नागनाथ तालुक्यातील मौजे गोजेगाव येथील कमलाबाई सोपान कांदे (वय ६०) यांच्या आत्महत्येनंतर पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेऊन कुटुंबाची

Sep 17, 2026
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथे भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले

पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी पुसेगाव येथे भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले

Minister Narhari Zirwal: श्री १००८ भगवान बाहुबली सर्वज्ञ तीर्थक्षेत्र, पुसेगाव येथे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी 16 फेब्रुवारीला भगवान बाहुबली सर्वज्ञ यांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी बळीराजा सुखी..

Sep 16, 2026