Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

सोयाबीन भाव वाढ

जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या भावाला सुगी; सोयापेंडची मोठी मागणी

Soybean Prices Rise: जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या भावाला सुगी आल्याचे संकेत मिळाले आहेत.त्याचवेळी चीनने सोयाबीनची आयात वाढविली आहे. सोयापेंडची मागणीही वाढली आहे.


जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या भावाला सुगी सोयापेंडची मोठी मागणी

Soybean Prices Rise |

वर्धा (Soybean Prices Rise) : जागतिक बाजारपेठेत सोयाबीनच्या भावाला सुगी आल्याचे संकेत मिळाले आहेत.त्याचवेळी चीनने सोयाबीनची आयात वाढविली आहे. सोयापेंडची मागणीही वाढली आहे. बाजारपेठेतील या हालचालीत (Soybean Prices Rise) सोयाबीनचे जागतिक बाजारपेठेतील भाव मागील ३ वर्षांच्या तुलनेत सध्या विक्रम नोंदविते झाले आहे. भारतातील शेतकर्‍यांनाही हा शुभसंकेत आहे. अमेरिकेच्या कृषी विभागानेही या हालचालीची नोंद घेतली आहे.

सोयाबीनच्या जागतिक उत्पादनाची माहिती घेता, या हंगामात सोयाबीनचे उत्पादन ४ हजार २२२ लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज अमेरिकेचा कृषी विभाग (यूडीएस) म्हणत आहे. ही उत्पादनवाढ मागील वर्षीच्या तुलनेत ३ टक्क्यांनी जास्त आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे उत्पादन ७ टक्क्यांनी तर ब्राझिलमधील उत्पादन ३ टक्क्यांनी वाढून ते १८६० लाख टनांवर पोहोचण्याचा अंदाज व्यक्त केला गेला आहे. अर्जेंटिनासोबत भारतातील उत्पादन वाढण्याचाही अंदाज आहे.

भारतातील सोयाबीनचा (Soybean Prices Rise) वापर ७१ लाख टनांपर्यंत पोहोचू शकतो. ऑगस्ट महिन्यातच सीबॉटवर सोयाबीनचा भाव जागतिक बाजारात भाव प्रतिक्विंटल ४५०० रुपयांवर गेला आहे. भारतातील हमीभाव ५,३२८ रुपये आहे. त्यामुळे येथील सोया उद्योजकांच्या दबावात सोयाबीनची आयात करून येथील बाजारपेठेतील भाव पाडण्याच्या धोका राहू शकतो. पण सध्या तरी जागतिक भावाने भारतातील सोयाबीनच्या भावाला आधार दिला आहे. त्यातच सध्या सोयापेंडची मागणीही वाढली आहे.

अमेरिकेतील सोयाबीनचे उत्पादन (Soybean Prices Rise) पुढील महिन्यात बाजारात येऊ शकते. पण त्याला निर्यातीकरीता मागणी राहिल. चीनमधील सोयाबीन उत्पादनाला अल- निनोचा फटका बसला आहे. एरव्ही चीन हा सोयाबीनचा मोठा खरेदीदार देश असून चीनने २१ ऑगस्टपर्यंत सोयाबीनची आयात करण्याकरीता ६५ लाख टनांचे सौदे केले आहेत.इतर देशांनीही अमेरिकेच्या सोयाबीन खरेदीचे सुमारे ४६ लाख टनांचे सौदे केले असल्याचे यूडीएसचे म्हणणे आहे. मागील वर्षी अमेरिकेतील सोयाबीनचा वापर ७५२ लाख टनांचा होता, त्यात साडेचार टक्क्यांची वाढ होईल, असे यूडीएसचे म्हणणे आहे.