Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

प्रा. अनिल धामोडे गौरव पुरस्कार

दै. देशोन्नतीचे आवृती प्रमुख प्रा. अनिल धामोडे  गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित

Prof. Anil Dhamode Felicitation Award: ‘नवी दिशा, नवा गडचिरोली’ या संकल्पनेतून विकसित गडचिरोलीचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७


दै देशोन्नतीचे आवृती प्रमुख प्रा अनिल धामोडे  गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने सन्मानित 

Prof. Anil Dhamode Felicitation Award |

 

जिल्हा वर्धापन दिनानिमित्य आकांक्षीत जिल्हा ते विकसित जिल्हा कृती समितीचा उपक्रम 

गडचिरोली (Prof. Anil Dhamode Felicitation Award) : ‘नवी दिशा, नवा गडचिरोली’ या संकल्पनेतून विकसित गडचिरोलीचे स्वप्न साकार करण्याच्या उद्देशाने गडचिरोली जिल्हा वर्धापन दिनानिमित्त ‘विकसित गडचिरोली व्हिजन २०४७ या विषयावर सादरीकरण, संबोधन तसेच जिल्हा गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन आज 26 ऑगस्ट रोजी येथील राजीव गांधी सभागृहात करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य संयोजक तथा महाराष्ट्र राज्य भाजपा अनुसूचित जनजाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष  माजी आमदार डॉ. देवराव होळी होते. त्यांच्या हस्ते जिल्ह्याच्या विकासात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांचा जिल्हा गौरव पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनतेच्या विविध प्रश्नांना वाचा फोडणारे, समस्यांबाबत स्पष्ट भूमिका मांडणारे तसेच शेतकरी, शेतमजूर, कामगार, बेरोजगार, शिक्षण व आरोग्य व्यवस्था, रस्ते आणि नागरिकांच्या मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठविणारे दैनिक देशोन्नतीचे जिल्हा आवृत्तीप्रमुख प्रा. अनिल धामोडे Prof. Anil Dhamode) यांचा हस्ते डॉ. देवराव होळी यांच्या हस्ते शाल, स्मृतिचिन्ह  व पुष्पगुच्छ देऊन गडचिरोली जिल्हा गौरव पुरस्काराने (Felicitation Award) सन्मानित करण्यात आले.

गडचिरोली जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध क्षेत्रांतील योगदानाची दखल घेणे आणि विकासाची सकारात्मक दिशा निश्चित करणे हा या कार्यक्रमामागील प्रमुख उद्देश होता.
यावेळी शैक्षणिक सामाजिक व राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.