माजी आमदार धीरज देशमुख

सहकार मंत्री तर आमचे मार्गदर्शकच: धिरज देशमुख

Dheeraj Deshmukh: सहकार मंत्री तर आमच्या बँकेचे सहकारी संचालक आहेत, शिवाय ते आमचे मार्गदर्शक आहेत, असे सांगत सहकार निवडणुकीचा आणि राजकीय पक्षाचा थेट संबंध नसतो, अशी भूमिका माजी आमदार धीरज देशमुख..

सहकार मंत्री तर आमचे मार्गदर्शकच: धिरज देशमुख

Dheeraj Deshmukh

 

सहकार निवडणुकीचा आणि राजकीय पक्षाचा थेट संबंध नसतो!

लातूर (Dheeraj Deshmukh) : सहकार मंत्री तर आमच्या बँकेचे सहकारी संचालक आहेत, शिवाय ते आमचे मार्गदर्शक आहेत, असे सांगत सहकार निवडणुकीचा आणि राजकीय पक्षाचा थेट संबंध नसतो, अशी भूमिका माजी आमदार धीरज देशमुख यांनी मांडली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राहिलेले माजी आमदार धीरज देशमुख यांनी गुरुवारी लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.

आमच्या पाठीशी सर्वांचेच आशीर्वाद आहेत, असे त्यांनी सांगितले. तसेच आमच्या पक्षाच्या नेत्यांची अधिकृत ताकद तर सोबत आहेच, पण त्याच सोबतीला  अन्य पक्षाच्या नेत्यांची 'अदृश्य' ताकद आणि आशीर्वादही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत, असा दावा त्यांनी केला. "सहकार मंत्री आपल्यासोबत आहेत का?" या प्रश्नावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की, आमच्यासोबत त्यांनी चांगल्या प्रकारे काम केले आहे, त्यांनी नेहमीच लातूर जिल्हा बँकेचे कौतुक केले असून ते आमच्या बँकेचे सहकारी संचालक व मार्गदर्शक आहेत. इतर जिल्ह्यांतही सहकार क्षेत्रातील निवडणुका राजकारण विरहित होतात, त्यामुळे लातूरचे राजकारणही विकासाचेच राहिले पाहिजे, असेही ते म्हणाले.

 उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी आणि सर्वसामान्यांचा विकास साधण्याचा संकल्प व्यक्त केला. ते म्हणाले की, सहकार क्षेत्राच्या माध्यमातून शेतकरी, सभासद आणि सर्वसामान्यांच्या विश्वासाला पात्र ठरत बँकेच्या प्रगतीचा हा प्रवास असाच पुढे सुरू ठेवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही ते म्हणाले.

विरोधकांनी त्यांचे मुद्दे घेऊन लोकांसमोर यावे!
विरोधकांनी केवळ टीका करण्यापेक्षा निवडणुकीला सामोरे जावे. मतदार नेहमीच काम करणाऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत. आम्ही आमचे मागील ५ वर्षांचे रिपोर्ट कार्ड आणि कामाचे मुद्दे घेऊन लोकांसमोर जात आहोत; विरोधकांनीही त्यांचे मुद्दे घेऊन लोकांसमोर यावे. यावेळीही लातूरचे सुजाण मतदार आमच्याच पाठीशी राहतील, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला.

टैग्स: Dheeraj Deshmukh

संबंधित सामग्री

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

संभाजीराव का बोलतात अमित देशमुखांविरोधात? लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून भाजपसमोर सवाल

लातूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून संभाजीराव पाटील निलंगेकरांची आक्रमक भूमिका चर्चेत. बँकेच्या कारभारावरून अमित देशमुखांवर आरोप आणि भाजपसमोर सवाल.

Sep 23, 2026