सुनेत्रा पवार यांना डावलल्याचे वृत्त फेटाळले; भेट औपचारिक असल्याची भूमिका
उदगीर (MLA Sanjay Bansode) : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची झालेली भेट आणि त्यानंतर सुरू झालेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर माजी मंञी आमदार संजय बनसोडे यांनी फेसबुक पोस्टद्वारे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना डावलून ही भेट घेतल्याच्या वृत्तांचे त्यांनी खंडन केले आहे. ही भेट औपचारिक स्वरूपाची असून, त्याला वेगळे राजकीय स्वरूप देणे योग्य नसल्याचे त्यांनी पोष्टमध्ये म्हटले आहे.
अमित शाह यांच्यासोबतच्या भेटीदरम्यान प्रत्येक नेत्याने आपापल्या मतदारसंघाशी संबंधित विविध विषय मांडले. तसेच मित्रपक्षांमधील नेत्यांच्या भेटीत होणारी अनौपचारिक चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण यावेळी झाल्याचे माजी मंञी आ.संजय बनसोडे (MLA Sanjay Bansode) यांनी स्पष्ट केले.
माध्यमांनी बातम्या प्रसिद्ध करताना वस्तुस्थितीची पडताळणी करावी. काही शक्तींकडून पसरविल्या जाणाऱ्या माहितीच्या आधारे पक्षांतर्गत मतभेदांचे चित्र उभे करू नये, असे आवाहन बनसोडे (MLA Sanjay Bansode) यांनी केले आहे. प्रत्यक्षात घडलेल्या घटनांपेक्षा वेगळे चित्र निर्माण होणे दुर्दैवी असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. अमित शाह यांच्या भेटीवरून सुरू झालेल्या राजकीय चर्चांच्या पार्श्वभूमीवर माजी मंञी आ.संजय बनसोडे यांनी फेसबुक पोष्टच्यृ माध्यमातून भूमिका स्पष्ट केली असून, ही भेट पक्षांतर्गत संघर्षाचा विषय नसल्याचे त्यांनी अधोरेखित केले आहे.
पक्षांतर्गत मतभेदांच्या चर्चांचे खंडन
उपमुख्यमंञी सुनेञा पवार यांना डावलून अमित शाह यांची भेट घेतल्याच्या काही माध्यमांतील वृत्तांचा वस्तुस्थितीशी संबंध नसल्याचे बनसोडे (MLA Sanjay Bansode) यांनी म्हटले आहे. या भेटीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत मतभेद असून नेतृत्वामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे चित्र निर्माण केले जात असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. काही अदृश्य शक्तींकडून जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण केला जात असल्याचा आरोपही त्यांनी पोस्टमध्ये केला आहे.
मित्रपक्षांमधील संवाद राजकीय प्रक्रियेचा भाग
राष्ट्रवादी काँग्रेस हा महायुतीचा महत्त्वाचा घटक आहे. मित्रपक्षांमधील नेत्यांच्या भेटीगाठी, मतदारसंघांतील प्रश्नांवर चर्चा आणि विचारांची देवाणघेवाण हा राजकीय प्रक्रियेचा स्वाभाविक भाग असल्याचे बनसोडे यांनी नमूद केले. अशा भेटींना विनाकारण राजकीय संघर्षाचे स्वरूप देऊ नये, अशी भूमिका त्यांनी मांडली.