लातूर (MLA Sambhajirao Patil Nilangekar) : लातूर जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती आहे. अलनिनो चा प्रभाव पडणार, हे एक दोन वर्षांपूर्वीच ठाऊक होते. त्यामुळेच आपण त्यावेळी पाण्याच्या प्रश्नासाठी जिल्हाभर काम करण्यास सुरुवात केली, मात्र त्यावेळी आपल्यावर टीका झाली. आजची परिस्थिती उद्भवली आहे त्यावर मात करायची असेल तर आपण सर्वांनी एक होऊन पाण्याच्या प्रश्नासाठी काम करणे गरजेचे आहे, असे सांगत माजी मंत्री आमदार संभाजीराव पाटील निलंगेकर (MLA Sambhajirao Patil Nilangekar) यांनी उद्यापासून आपण व आपले सहकारी पाण्याच्या प्रश्नावर काम सुरू करणार आहोत, अशी घोषणा केली.
सोमवारी लातूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलताना निलंगेकर यांनी लातूर जिल्ह्यात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले. या प्रश्नावर सर्वांनी एकत्र येणे आवश्यक असल्याचे मतही त्यांनी आवर्जून नोंदविले. जमिनीखाली निर्वात पोकळी निर्माण झाली असून पाणी पातळी चार साडेचार मीटरने हा लावली आहे. कोणत्याही क्षणी एकाच दिवसात हजारो कुपनलिका बंद पडतील, अशी परिस्थिती आहे. याचे गांभीर्य सर्वांनी ओळखले पाहिजे. सध्या ऑक्टोबर महिना आहे.

डिसेंबर महिन्यात उष्णतेची लाट येईल, त्याला सामोरे जाण्याची वेळ आपल्यावर आली आहे. कदाचित पुढच्या वर्षी 300 मिमीपर्यंत पाऊस झाला तर त्या परिस्थितीला कसे सामोरे जायचे, याचे नियोजन आपल्याकडे हवे. या विषयावर सध्या काम करणे आवश्यक असल्याचे निलंगेकर म्हणाले. त्यामुळेच या अडचणीच्या परिस्थितीत आपण व आपले सहकारी पाण्याच्या प्रश्नासाठी स्वतःला समर्पित करणार आहोत, असेही (MLA Sambhajirao Patil Nilangekar) आ. संभाजीराव पाटील निलंगेकर म्हणाले.