कुटुंब मुलाचा मृत्यू

एकाच कुटुंबातील ४ मुलांचा १० दिवसांमध्ये अकस्मात मृत्यू

Family Boys Death: एकाच कुटुंबातील ४ मुलांचा १० दिवसांमध्ये अकस्मात मृत्यू झाल्याने कुटुंबावर शोककळा पसरली आहे. मृतांमध्ये तीन सख्खे भाऊ आणि एका नातेवाईकाच्या मुलाचा समावेश आहे

एकाच कुटुंबातील ४ मुलांचा १० दिवसांमध्ये अकस्मात मृत्यू

Family Boys Death

भोपाळ (Family Boys Death) : मध्य प्रदेशातील शिवपुरी येथे एकाच कुटुंबातील चार मुलांचा अवघ्या १० दिवसांत अकस्मात मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये तीन सख्खे भाऊ आणि एका नातेवाईकाच्या मुलाचा समावेश आहे. तसेच कुटुंबातील तीन मुलींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासन सतर्क झाले आहे. शिवपुरीतील फिजिकल पोलीस ठाण्याच्या समोर राहणाऱ्या तन्वीर अहमद यांच्या कुटुंबात ही धक्कादायक घटना घडली. कुटुंबातील सदस्य आणि नातेवाईक असे एकूण १६ जण १६ ऑगस्ट रोजी गोरा टिला परिसरातील धबधब्यावर अंघोळीसाठी गेले होते. काही तासांनी सर्वजण घरी परतले. मात्र, त्यानंतर काही सदस्यांची प्रकृती अचानक बिघडू लागली.

ताप, पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास

कुटुंबातील मुलांना अचानक ताप, पोटदुखी आणि अतिसाराचा त्रास सुरू झाला. (Family Boys Death) प्रकृती अधिक बिघडल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान चार मुलांचा मृत्यू झाला. सर्वप्रथम १४ वर्षीय ताहिर याची प्रकृती बिघडली. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर १९ वर्षीय अयाजसह अन्य मुलांचीही प्रकृती खालावत गेली. पुढील १० दिवसांत एकामागून एक चार मुलांचा मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

आरोग्य विभागाकडून तपास सुरू

चार मुलांच्या मृत्यूनंतर आरोग्य विभाग आणि जिल्हा प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. आरोग्य विभागाचे पथक कुटुंबाच्या घरी पोहोचले असून, आजाराचे नेमके कारण शोधण्यासाठी कुटुंबीय तसेच परिसरातील नागरिकांकडून विविध नमुने घेतले जात आहेत. मात्र, चारही मुलांच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

धबधब्याच्या पाण्यामुळे मृत्यू झाल्याचा पुरावा नाही

कुटुंबातील सदस्य धबधब्यावर अंघोळ करून आल्यानंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने धबधब्याच्या पाण्यामुळेच हा प्रकार घडला असावा, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, आरोग्य विभागाला सध्या तरी धबधब्याच्या पाण्यामुळे मृत्यू झाल्याचे कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत. (Family Boys Death) घटनेचे नेमके कारण शोधण्यासाठी आरोग्य विभागाकडून तपासणी आणि नमुना चाचण्यांची प्रक्रिया सुरू आहे.

टैग्स: Family Boys Death