Breaking News
  • दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी
  • लखलख चमकणारा महाराष्ट्राचा एकमेव काचेचा गणपती पुण्यात!
  • धाराशिव मधील मराठा कार्यकर्ते मुंबईवर जाण्यावर ठाम
  • मराठा बांधवांचा मुंबईकडे ‘गनिमी कावा’; धाराशिवमधून 5 हजार कार्यकर्ते जाणार
  • शिरूरमध्ये कांदा लागवडीला वेग; महिलांनी पावसासाठी घातले साकडे
  • मनोज जरांगे पाटील यांचा पाटोदा येथे पहिला मुक्काम; सात लाख मराठा बांधवांसाठी जेवणाची व्यवस्था
  • सुरगाणा तालुक्यातील शासकीय रुग्णालयात सोनोग्राफी मशीन दाखल
  • अनेकांना कुणबी प्रमाणपत्र दिले - एकनाथ शिंदे
  • नांदेडच्या किनवट तालुक्यातील इस्लापूर शहर कडकडीत बंद

होम > महाराष्ट्र

Extortion Allegations

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

FDA मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता; संजय राऊतांच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर.


fda मधील 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची शक्यता खंडणीच्या आरोपांनंतर तुकाराम मुंढे अॅक्शन मोडवर

Extortion Allegations |

संजय राऊतांच्या आरोपांनंतर FDA आयुक्त तुकाराम मुंढेंनी कारवाईचा प्रस्ताव दिल्याची माहिती; कामचुकारपणा आणि नियमभंगाच्या प्रकरणांवर प्रस्ताव

महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासन अर्थात FDA मधील 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याचा प्रस्ताव आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सुमारे दोन महिन्यांपूर्वीच दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. कामचुकारपणा आणि नियमभंगाशी संबंधित प्रकरणांमध्ये हा प्रस्ताव देण्यात आल्याचे सांगितले जात आहे. प्रस्तावाची अंमलबजावणी झाल्यास 15 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ शकते.

दरम्यान, FDAच्या कारवाईच्या पद्धतीवरून सध्या आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. महाराष्ट्रातील अन्न व औषध प्रशासनातील काही अधिकारी खंडणी आणि वसुली करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)चे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत FDAविरोधात गंभीर आरोप केले. त्यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी या प्रकरणाची दखल घेत अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाणार असल्याचे सांगितले.

FDAकडून राज्यभरात अन्नभेसळ, अस्वच्छ हॉटेल किचन तसेच अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाई सुरू आहे. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली FDAच्या पथकांकडून विविध ठिकाणी तपासणी आणि कारवाई केली जात आहे. नियमांचे उल्लंघन आढळलेल्या अनेक आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.

मात्र, याच कारवायांच्या पार्श्वभूमीवर FDAच्या काही अधिकाऱ्यांकडून व्यावसायिकांकडून कथित वसुली केली जात असल्याचे आरोप समोर आले आहेत. कारवाईची भीती दाखवून पैसे मागितले जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे FDAच्या धडक मोहिमेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

संजय राऊत यांनी यासंदर्भात तुकाराम मुंढे यांना तीन पानी पत्रही लिहिले आहे. काही FDA अधिकारी हॉटेल, रेस्टॉरंट आणि क्विक-कॉमर्स क्षेत्रातील व्यावसायिकांना परवाना निलंबित करण्याची भीती दाखवत पैसे मागत असल्याचा दावा राऊत यांनी या पत्रातून केल्याचे सांगितले जाते.

एकीकडे अन्नभेसळ आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात FDAची कारवाई सुरू असताना दुसरीकडे प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरच गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाकडे लक्ष लागले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दोन महिन्यांपूर्वी दिलेल्या प्रस्तावावर पुढील कार्यवाही झाल्यास संबंधित 15 अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Related to this topic: