निवडणूक आयोग मतदार ओळखपत्रे

राजकीय वर्तुळात खळबळ: नर्मदा नदीत आढळली 343 मतदार ओळखपत्रे; निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Election Commission Voter ID Cards: मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मंडलेश्वर येथे नर्मदा नदीच्या घाटावर स्वच्छता मोहीम राबविताना तब्बल 343 मतदार ओळखपत्रे आढळून आली आहेत, राजकीय वर्तुळात खळबळ..

राजकीय वर्तुळात खळबळ: नर्मदा नदीत आढळली 343 मतदार ओळखपत्रे; निवडणूक यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

Election Commission Voter ID Cards

 

काँग्रेसकडून निष्पक्ष चौकशीची मागणी

भोपाळ (Election Commission Voter ID Cards) : मध्य प्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील मंडलेश्वर येथे नर्मदा नदीच्या घाटावर स्वच्छता मोहीम राबविताना तब्बल 343 मतदार ओळखपत्रे आढळून आली आहेत. या घटनेमुळे राज्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, यातील बहुतांश ओळखपत्रे इंदूर जिल्ह्यातील राऊ विधानसभा मतदारसंघातील मतदारांची असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ही ओळखपत्रे नदीकाठी किंवा पाण्यात कशी आली, ती कोणी टाकली आणि त्यामागे नेमके काय कारण आहे, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. या प्रकरणाची चौकशी सुरू असून काँग्रेसने निष्पक्ष तपास करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्वच्छता मोहिमेदरम्यान प्रकार उघड

मंडलेश्वर येथील नर्मदा घाटावर एका सामाजिक संस्थेच्या कार्यकर्त्यांकडून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत होती. यावेळी नदीकाठी तसेच पाण्यात मतदार ओळखपत्रे आढळून आली. या (Election Commission Voter ID Cards) घटनेचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर हे प्रकरण चर्चेत आले. घटनेची माहिती मिळताच महसूल विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पथकाने पंचनामा करून आढळलेली ओळखपत्रे जप्त केली.

काँग्रेसकडून गुन्हा दाखल करण्याची मागणी

या प्रकरणी खरगोन जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष रवी नाईक यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. एवढ्या मोठ्या संख्येने मतदार ओळखपत्रे एकाच ठिकाणी कशी आढळली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच या (Election Commission Voter ID Cards) प्रकरणात निवडणूक यंत्रणेशी संबंधित व्यक्तींचा सहभाग असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, या आरोपांना अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

तपासातून सत्य समोर येणार?

मतदार ओळखपत्रे नदीच्या घाटावर कशी पोहोचली, ती कोणाची आहेत आणि ती तेथे कोणी आणून टाकली, याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे. या (Election Commission Voter ID Cards) प्रकरणामुळे मतदार ओळखपत्रांच्या सुरक्षिततेबाबतही प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित यंत्रणांच्या चौकशीनंतरच या घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

संबंधित सामग्री

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

विद्यार्थी आत्महत्यांमध्ये महाराष्ट्र देशात अव्वल; वर्षभरात 1,909 आत्महत्यांची नोंद

Maharashtra Student Suicides: देशातील विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर असल्याचे राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाच्या (एनसीआरबी) 2024 च्या अहवालातील आकडेवारीवरून समोर आल

Nov 12, 2026
विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील’; सुनील तटकरेंच्या विधानाने राजकीय चर्चांना वेग

विलिनीकरणाचा निर्णय सुनेत्रा वहिनी घेतील’; सुनील तटकरेंच्या विधानाने राजकीय चर्चांना वेग

NCP विलिनीकरणावर सुनील तटकरे यांचे सूचक विधान. पुण्यात सुनेत्रा पवारांची भेट घेणार असून राष्ट्रवादीच्या अर्थखात्याचीही केली मागणी.

Nov 10, 2026
शेख, खान, पाटील आडनावांची किती नावे गायब? महाराष्ट्राच्या SIR रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

शेख, खान, पाटील आडनावांची किती नावे गायब? महाराष्ट्राच्या SIR रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

महाराष्ट्र SIR रिपोर्टमध्ये 2.07 कोटी मतदारांची नावे ड्राफ्ट लिस्टमध्ये नसल्याचा दावा. पुणे, ठाणे, मुंबईसह 190 मतदारसंघांवर परिणाम?

Nov 09, 2026
माकडाने बॅग हिसकावली, परत मिळवताना शिक्षकाचा १५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

माकडाने बॅग हिसकावली, परत मिळवताना शिक्षकाचा १५० फूट खोल दरीत पडून मृत्यू!

पचमढीत माकडाने हिसकावलेली बॅग परत मिळवताना नागपूरच्या ४४ वर्षीय शिक्षकाचा १५० फूट खोल दरीत पडून मृत्यू. वडिलांसमोरच घडली दुर्घटना.

Nov 07, 2026
धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

Punjab Karmabhoomi Express Fire: धनतेरसच्या दिवशी पंजाबमध्ये अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सराय बंजारा रेल्वे स्थानक घटना.

Nov 06, 2026