हिंगोली (Dr. Pratapsingh Patil) : 28 ऑक्टोबर रोजी शहरातील महात्मा गांधी चौक येथे मराठवाडा पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रतापसिंह वेदप्रकाश पाटील यांचा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी शहरातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून फटाके फोडुन व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी काॅंग्रेस पक्षाचे नेते माजी नगराध्यक्ष सुधिरआप्पा सराफ, हिंगोली शहर काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष मिलिंद उबाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) माजी जि.प.सदस्य मनिष आखरे पहेलवान, माजी जि.प.सदस्य माधवराव कोरडे, शहराध्यक्ष मुजिब पठाण, ॲड.रवि शिंदे, शेतकरी नेते डॉ.रमेश शिंदे, बंडू मुटकुळे, युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव बंटी नागरे, महासचिव जुबेर मामु, बाजीराव इंगोले पाटील, ओबीसी जिल्हाध्यक्ष भास्करराव पोले, बापुराव पाटील वडदकर, चंदु प्यारेवाले, चेतन उबाळे, अनुप नायक, दत्तराव जाधव कडतीकर, विक्की सराफ, शेख अमन, नागेश मुदिराज, धिरज काकडे, गजानन गव्हाणे, डॉ.वेदांत मरळे, शंकर शिंदे, बंडू आठरे, ईश्वर उरेवार, नर्सिंग अण्णा देशमुख, पोपलाईत यांच्यासह महाविकास आघाडीचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.