Actress Deepika Padukone: अभिनेत्री दीपिका पादुकोणचा बहुचर्चित ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचे बंधू आणि चित्रपटाचे निर्माते..
मुंबई (Actress Deepika Padukone) : अभिनेत्री दीपिका पादुकोणचा बहुचर्चित ‘स्पिरिट’ चित्रपटातून बाहेर पडण्याचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिग्दर्शक संदीप रेड्डी वंगा यांचे बंधू आणि चित्रपटाचे निर्माते प्रणय रेड्डी वंगा यांनी दीपिकाच्या एक्झिटमागील कारणांबाबत नवे दावे केले आहेत. यापूर्वी मानधन आणि चित्रीकरणाच्या वेळापत्रकावरून मतभेद झाल्याची चर्चा होती. मात्र, आता नफ्यातील हिस्सा आणि चित्रपटाशी संबंधित माहिती लीक केल्याचा आरोपही समोर आला आहे.
प्रणय रेड्डी वंगा यांच्या दाव्यानुसार, दीपिकाने मानधनाव्यतिरिक्त चित्रपटाच्या नफ्यातील १० टक्के हिस्सा मागितला होता. हा हिस्सा देणे निर्मात्यांसाठी आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, चित्रीकरणाच्या वेळेबाबतही मतभेद असल्याचे सांगण्यात आले. जवळपास दीड वर्ष (Actress Deepika Padukone) दीपिकासोबत या चित्रपटाबाबत चर्चा सुरू होती, असा दावाही प्रणय यांनी केला आहे.
दरम्यान, चित्रपटाची कथा आणि व्यक्तिरेखेबाबत झालेल्या अंतर्गत चर्चेतील काही माहिती बाहेर गेल्याचा आरोपही प्रणय रेड्डी वंगा यांनी केला आहे. त्यामुळे (Actress Deepika Padukone) दीपिकाच्या ‘स्पिरिट’मधून बाहेर पडण्याच्या चर्चेला आता नवे वळण मिळाले आहे. मात्र, नफ्यातील १० टक्के हिस्स्याची मागणी आणि माहिती लीक केल्याचे आरोप हे निर्मात्यांकडून करण्यात आलेले दावे असून, दीपिकाने या विशिष्ट आरोपांना सार्वजनिकरित्या दुजोरा दिलेला नाही.
दीपिकाच्या (Actress Deepika Padukone) एक्झिटनंतर तिच्या जागी अभिनेत्री तृप्ती डिमरीची निवड करण्यात आली आहे. प्रभास प्रमुख भूमिकेत असलेल्या ‘स्पिरिट’कडे चाहत्यांचे लक्ष लागले असून, चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच दीपिकाच्या एक्झिटवरून त्याची चर्चा चांगलीच रंगली आहे.