धम्मकुटी थुगाव येथे धम्म प्रशिक्षण केंद्रांची उभारणी
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक बुद्धिष्ट बहुउद्देशीय संस्थेचा उद्घाटन सोहळा
अमरावती (Dhamma Training Center) : बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार व्यापक करण्यासाठी प्रशिक्षित कार्यकर्त्यांची फळी उभारणे, बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्रे (सेमिनरीज) स्थापन करणे आणि समाजाला धम्माच्या विचारांशी जोडणे आवश्यक आहे. विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेला संकल्प पूर्ण करण्यासाठी संपूर्ण समाजाने एकत्र येऊन संघटितपणे कार्य केल्यास निश्चितच सामाजिक परिवर्तनाची क्रांती घडेल, असे प्रतिपादन डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक बुद्धिष्ट बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष भन्ते धम्मसार यांनी केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक बुद्धिष्ट बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने बौद्ध धम्माच्या प्रचार-प्रसारासाठी कार्यकर्ते तयार करण्याच्या उद्देशाने बौद्ध धम्म प्रशिक्षण केंद्रे (सेमिनरीज) स्थापन करण्याच्या उपक्रमांतर्गत आजीवन सभासद उद्घाटन सोहळ्याचे आयोजन धम्मकुटी, थुगाव येथे रविवार (ता.25) रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भन्ते धम्मसार होते तर प्रमुख अतिथी म्हणून मुंबई येथील बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनचे राजाभाऊ कदम, संस्थेचे सचिव बाळासाहेब वानखडे संस्थेचे उपाध्यक्ष राहुल कडू, प्रभाकर गवई, दानदाते रंगराव भालेराव, ट्रस्टी सदस्य नयन मोंढे,अजय बरडे, बुद्धिस्ट मायनॉरिटी मिशनचे अध्यक्ष संतोष रंगारी, नर्सिंग स्कूलच्या प्राचार्य नीता रामटेके सामाजिक कार्यकर्ते देवेंद्र रामटेके उद्योजक राहुल मेश्राम,संजय मोखडे, मुख्य आयोजक विजय उके यांच्यासह अन्य मान्यवर धम्मपिठावर विराजमान होते.संस्थेचे अध्यक्ष भंते धम्मसार यांनी उपस्थितांना धम्मदेशना दिली.
भन्ते धम्मसार म्हणाले की, संस्थेच्या माध्यमातून बौद्ध धम्माच्या प्रसाराला गती देणे, धम्म उपासनेसाठी बौद्ध विहारांची स्थापना करणे, धम्मिक व वैज्ञानिक विषयांच्या शिक्षणासाठी शाळा-महाविद्यालये उभारणे, अनाथालये, दवाखाने आणि मदत केंद्रे सुरू करणे, तसेच धम्मप्रचारासाठी समर्पित कार्यकर्ते घडविणे अशी उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.याशिवाय बौद्ध धम्माच्या तुलनात्मक अध्ययनाला प्रोत्साहन देणे, सर्वसामान्य जनतेला बौद्ध धम्माचा खरा अर्थ समजावून सांगण्यासाठी साहित्य प्रकाशित करणे, हस्तपत्रके व लघुपुस्तिकांचे वितरण करणे आणि धम्मविचार समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचविणे यावर संस्थेचा भर राहणार आहे.
आजीवन सभासद अभियानातून संघटनबळ वाढविण्याचा निर्धार
बौद्ध धम्माची शिकवण केवळ उपासने पुरती मर्यादित न ठेवता ती शिक्षण, विज्ञान, सामाजिक समता आणि मानवकल्याणाशी जोडण्याची गरज या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आली. आजीवन सभासद अभियानाच्या माध्यमातून समाजातील अधिकाधिक नागरिकांनी संस्थेच्या कार्यात सहभागी व्हावे आणि बाबासाहेबांचा धम्मप्रसाराचा संकल्प पूर्ण करण्यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन भन्त्ते धम्म सार यांनी केले.
बौद्ध धम्माचे तत्त्वज्ञान, सामाजिक बांधिलकी आणि संघटित कार्य यांच्या माध्यमातून प्रबुद्ध समाजनिर्मितीचा मार्ग अधिक व्यापक करण्याचा संकल्प या सोहळ्यात धम्मपिठावर विराजमान अतिथींनी व्यक्त केला.
कार्यक्रमाचे संचालन व आभार संस्थेचे सहसचिव विजय उके यांनी मानले. प्रास्ताविक संस्थेचे सचिव बाळासाहेब वानखडे यांनी केले. कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक बुद्धिष्ट बहुउद्देशीय संस्थेचे प्रभाकर गवई सुनील गजभिये रवींद्र उमाळे राजू डोंगरे उमेश कडू आकाश शंकरपाळे भास्कर वानखडे अजय वानखडे सुलोचना मेश्राम रंजना गोवर्धन हंसराज रामटेके राजकुमार सर्वटकर अरुण इंगळे हर्षा ओके मंगेश वाहने सुनील सवाई भारती दामोधरे सत्य पुला वैद्य नरेंद्र जवंजाळ रोशन बागडे किसन लोणारे सदानंद जोशी बाळासाहेब घोगरे विलास गायकवाड यांच्यासह थुगाव येथील बौद्ध उपासक उपासिकांनी सहकार्य केले.
विजय उके यांनी दिले एक लाख दहा रुपये धम्मदान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर आधुनिक बुद्धिष्ट बहुउद्देशीय संस्था विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्म चळवळीला गती देण्याकरिता प्रशिक्षित प्रचारक प्रसारक निर्माण करणार आहे याशिवाय धम्म चळवळ गतिमान व्हावी म्हणून विविध सामाजिक धम्माचे उपक्रम राबविण्यात येणार आहे याकरिता संस्थेचे सहसचिव विजय उके यांनी स्वतःपासून सुरुवात म्हणून संस्था अध्यक्ष भंते धम्मसार यांना एक लाख दहा हजार रुपयांचा धनादेश दिला.