Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

जय वैभवलक्ष्मी पुरस्कार

विलासराव-दिलीपराव आदर्श राम लक्ष्मणाची जोडी: केंद्रीय सहकार राज्यमंत्री

Jai Vaibhavalakshmi Award: महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी, दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख ही राजकारणासह सहकारातील आदर्श राम-लक्ष्मणाची जोडी


विलासराव-दिलीपराव आदर्श राम लक्ष्मणाची जोडी केंद्रीय सहकार राज्यमंत्री

Jai Vaibhavalakshmi Award |

 

दिलीपराव देशमुख यांना 'जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार प्रदान

लातूर (Jai Vaibhavalakshmi Award) : महाराष्ट्र ही सहकाराची पंढरी आहे आणि या पंढरीत लातूरचे योगदान अत्यंत मोलाचे असून राज्याचे दिवंगत मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि त्यांचे बंधू दिलीपराव देशमुख ही महाराष्ट्राच्या राजकारणासह सहकारातील आदर्श राम-लक्ष्मणाची जोडी आहे. (Jai Vaibhavalakshmi Award) दिलीपराव देशमुखांचे सहकार क्षेत्रातील काम उत्तुंग असून त्यांच्या गौरवामुळे पुणे आणि लातूरचा ऋणानुबंध अधिक समृद्ध झाला आहे,' असे प्रतिपादन केंद्रीय सहकार व नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले.

पुणे येथे जय वैभवलक्ष्मी फाउंडेशनच्यातर्फे बालगंधर्व रंगमंदिरात सोमवारी सायंकाळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांना (Jai Vaibhavalakshmi Award) 'जय वैभवलक्ष्मी सहकार भूषण पुरस्कार २०२६' केंद्रीय राज्यमंत्री मोहोळ यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी फाऊंडेशनचे अध्यक्ष उल्हास पवार तर प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, खासदार डॉ. शिवाजीराव काळगे, माजी आमदार संजय जगताप, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर, फाऊंडेशनचे संस्थापक प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील, जय वैभवलक्ष्मी ग्रुपचे अध्यक्ष ॲड. सौरभ अंकलकोटे पाटील, उपाध्यक्ष डॉ. शशिकांत पागे, ज्येष्ठ अभिनेत्री आशा काळे, भाग्यश्री अंकलकोटे पाटील, अभिजीत अंकलकोटे, डॉ. स्वरूप एकलुरे आणि ॲड. मिथुन गुरव आदी मान्यवर उपस्थित होते. 

याप्रसंगी मोहोळ यांच्या हस्ते तुळशीहार, जगदगुरू संत तुकाराम महाराजांची प्रतिकात्मक पगडी, मानाचे उपरणे, सन्मानचिन्ह, गौरवपत्र आणि एक लाख रुपयांचा धनादेश असे स्वरूप असलेला पुरस्कार दिलीपराव देशमुख यांना (Jai Vaibhavalakshmi Award) प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हास पवार यांनी स्वागतपर भाषणात दिलीपराव देशमुखांच्या अष्टपैलू व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. प्रा. डॉ. व्ही. एस. अंकलकोटे पाटील यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचलन केले. सौरभ अंकलकोटे पाटील यांनी आभार मानले.

यावेळी कार्यक्रमास मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, संभाजीनगर, पुणे येथील सहकार शिक्षण क्षेत्रातील मान्यवर तसेच मांजरा साखर परिवारातील संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते हितचिंतक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

माजी मंत्री दिलीपराव देशमुख झाले भावूक

सत्काराला उत्तर देताना सत्कारमूर्ती दिलीपराव देशमुख भावुक झाले. 'ज्या बालगंधर्व रंगमंदिरात अनेक नाटके आणि गाणी पाहिली, त्याच मोठ्या व्यासपीठावर झालेला हा सत्कार मला भारावून टाकणारा आहे. लातूर बँक पुढील ५ वर्षांत १५ हजार कोटींच्या उलाढालीचे उद्दिष्ट ठेवून कार्यरत असून, गेल्या दोन वर्षांत बँकेने १०० कोटींचा नफा मिळवला आहे. समाजाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे, रोजगार निर्मिती करणे आणि शेतकऱ्यांना योग्य दर देणे हेच सहकाराचे मुख्य ध्येय असले पाहिजे,' असे ते म्हणाले.

Related to this topic: