गुळ व्यापारी जीवघेणा हल्ला

गुळाच्या व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; भरदिवसा थरारक घटना

Jaggery Trader Deadly Attack: निलंगा तालुक्यातील केदारपूर शिवारात भरदिवसा एका गुळाच्या व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली...

गुळाच्या व्यापाऱ्यावर धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला; भरदिवसा थरारक घटना

Jaggery Trader Deadly Attack

निलंगा ( Jaggery Trader Deadly Attack) : निलंगा तालुक्यातील केदारपूर शिवारात भरदिवसा एका गुळाच्या व्यापाऱ्यावर अज्ञात हल्लेखोराने धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात व्यापारी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर निलंगा येथील श्वास हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, देवणी तालुक्यातील बोंबळी खुर्द येथील गुळाचे व्यापारी परमेश्वर बाबुराव पाटील हे गुळाची गुणवत्ता तपासून खरेदी करण्याच्या उद्देशाने काटेजवळगा येथील अनंत रकटे यांच्या गुऱ्हाळावर आले होते. गुळाची पाहणी करून मित्र अनंत रकटे यांची भेट घेतल्यानंतर ते केदारपूर मार्गे परत जात असताना दुपारी सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास अज्ञात व्यक्तीने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.

हल्लेखोराने धारदार शस्त्राने पाटील यांच्या हातावर, पोटावर आणि पाठीवर वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात घबराट पसरली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. जखमी अवस्थेतील परमेश्वर पाटील यांना तातडीने निलंगा येथील श्वास हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

दरम्यान, या (Jaggery Trader Deadly Attack) हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. भरदिवसा घडलेल्या या गंभीर घटनेमुळे व्यापारी वर्गासह नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हल्लेखोर कोण, हल्ल्याचे कारण काय आणि या घटनेमागे पूर्ववैमनस्य आहे की अन्य काही कारण, याबाबत विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. फरार हल्लेखोराचा शोध घेऊन घटनेचा छडा लावण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.