काँग्रेस नेते राहुल गांधी हल्लाबोल

‘मोगॅम्बो मोदी’ म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; सीजेपी आंदोलनात काँग्रेसही सहभागी होणार

Rahul Gandhi: दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

‘मोगॅम्बो मोदी’ म्हणत राहुल गांधींचा हल्लाबोल; सीजेपी आंदोलनात काँग्रेसही सहभागी होणार

Rahul Gandhi

नवी दिल्ली (Rahul Gandhi) : दिल्लीतील कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनावरून राजकीय वातावरण तापले असून, काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. आंदोलकांवरील कारवाईचा निषेध करत त्यांनी तरुणांच्या (CJP Protest) आंदोलनाला पाठिंबा दर्शवला. तसेच, येत्या 12 ऑक्टोबर रोजी काँग्रेसचे कार्यकर्तेही या आंदोलनात सहभागी होणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी समाजमाध्यमांवरील पोस्टमधून दिल्ली पोलीस आणि भारतीय जनता पक्षाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित केले. आंदोलनादरम्यान तरुणांना मारहाण होत असल्याचा आरोप त्यांनी केला. महिला आणि तरुणींवरील पोलिसांच्या कारवाईचाही त्यांनी उल्लेख केला. ‘मोगॅम्बो मोदी’ असा उपरोधिक उल्लेख करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर टीकास्त्र सोडले.

दडपशाहीला तरुणांकडून प्रत्युत्तर देण्याचा इशारा

सरकारकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न झाला, तरी तरुणांचा आवाज थांबणार नाही, असा दावा राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केला. देशातील तरुण मोठ्या संख्येने आंदोलनात उतरतील आणि आपली भूमिका अधिक ठामपणे मांडतील, असेही त्यांनी म्हटले. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांना उद्देशून आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

संविधानाच्या संरक्षणाचा मुद्दा उपस्थित

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संविधानाच्या अधिकारांचा मुद्दाही राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी उपस्थित केला. सरकारकडून संविधानाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप करत त्यांनी न्यायव्यवस्थेने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, असे आवाहन केले. तसेच, सरन्यायाधीशांची भेट घेण्याबाबतही त्यांनी पोस्टमध्ये उल्लेख केला.

जंतर-मंतरवर पोलिसांचा कडक बंदोबस्त

दरम्यान, दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात सीजेपीचे आंदोलन (CJP Protest) दुसऱ्या दिवशीही सुरू ठेवण्यावर आंदोलक ठाम असल्याची माहिती आहे. अजिंक्य शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू असून, अभिजित दीपके (Abhijit Deepke) यांना पोलिसांनी प्रतिबंधात्मक ताब्यात घेतल्यानंतर सशर्त सुटका केल्याची माहिती समोर आली आहे.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने 37 ठिकाणे बंद करण्यात आल्याची माहिती असून, (CJP Protest) आंदोलकांना ताब्यात घेण्यासाठी राखीव बसेसही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

सीजेपीच्या आंदोलनाला काँग्रेसने दिलेला पाठिंबा आणि राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र सरकारवर केलेली टीका यामुळे या प्रकरणाला राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. आता 12 ऑक्टोबरच्या मोर्चात काँग्रेसची भूमिका काय असेल आणि आंदोलनाला किती प्रतिसाद मिळेल, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित सामग्री

नक्षलवादातून मुक्तीकडे; आदिवासी भागांत विकासाची नवी पहाट!

नक्षलवादातून मुक्तीकडे; आदिवासी भागांत विकासाची नवी पहाट!

Prime Minister Narendra Modi: नक्षलवादी हिंसाचाराच्या प्रभावातून बाहेर पडत देशातील आदिवासीबहुल भाग आता विकासाच्या नव्या पर्वाकडे वाटचाल करीत आहेत. दुर्गम गावांपर्यंत शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत

Nov 15, 2026
'माझा फोन टॅप केला जातोय'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

'माझा फोन टॅप केला जातोय'; राहुल गांधींचा खळबळजनक दावा

Rahul Gandhi: काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्राम

Nov 13, 2026
मोदींकडून राहुल गांधींचा फोन टॅपिंग? म्हणाले, माझ्याकडे पुरावे!

मोदींकडून राहुल गांधींचा फोन टॅपिंग? म्हणाले, माझ्याकडे पुरावे!

राहुल गांधींचा मोदींवर फोन टॅपिंगचा गंभीर आरोप! माझ्याकडे पुरावे असल्याचा दावा करत पंतप्रधानांना दिले जाहीर चर्चेचे आव्हान.

Nov 13, 2026
एका न्यूड फोटोसाठी देशाची गुपितं पाकिस्तानला विकली!

एका न्यूड फोटोसाठी देशाची गुपितं पाकिस्तानला विकली!

न्यूड फोटोच्या आमिषाने भारतीय हवाई दलातील विंग कमांडरने पाकिस्तानला गोपनीय माहिती दिल्याचा आरोप. 3,008 व्हॉट्सॲप मेसेजचा चार्जशीटमध्ये खुलासा.

Nov 13, 2026
अजित पवार भाजपविरोधात मोठा निर्णय घेणार होते? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

अजित पवार भाजपविरोधात मोठा निर्णय घेणार होते? संजय राऊतांचा खळबळजनक दावा

अजित पवार भाजपविरोधात संघर्ष करणार होते? संजय राऊतांचा मोठा दावा. विमान अपघातावरून सुनेत्रा आणि पार्थ पवारांना थेट सवाल.

Nov 13, 2026