कॉकरोच जनता पार्टी आंदोलन

CJP आंदोलनात अभिजीत दीपके यांच्यासोबत ध्रुव राठींची एन्ट्री!

Cockroach Janata Party Andolan: मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेविरोधात बंगळुरूत आंदोलन

CJP आंदोलनात अभिजीत दीपके यांच्यासोबत ध्रुव राठींची एन्ट्री!

Cockroach Janata Party Andolan

 

‘चप्पल प्रोटेस्ट’ मध्ये SIRविरोधात 3 प्रमुख मागण्या

बंगळुरू (Cockroach Janata Party Andolan) : मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार (CEC Dyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याची मागणी आणि मतदार याद्यांच्या ‘स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन’ (SIR) प्रक्रियेविरोधात बंगळुरूत गुरुवारी, 8 ऑक्टोबर रोजी आंदोलन करण्यात आले. कॉकरोच जनता पार्टी (CJP) तसेच विविध युवा आणि नागरी संघटनांच्या सहभागातून फ्रीडम पार्क येथे ‘पीपल्स ट्रिब्युनल’ आयोजित करण्यात आले. त्यानंतर महिलांच्या समर्थनार्थ ‘चप्पल प्रोटेस्ट’ करण्यात आला.

या (Cockroach Janata Party) आंदोलनात CJPचे संस्थापक अभिजीत दीपके (CJP, Abhijeet Dipke) , सहसंयोजक आशुतोष रांका, यूट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) आणि अभिनेते-कार्यकर्ते प्रकाश राज (Prakash Raj) सहभागी झाले. कर्नाटकातील विविध भागांतील नागरिकांनी SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून नावे वगळल्याचा दावा करत आपले म्हणणे ‘पीपल्स ट्रिब्युनल’समोर मांडले.

‘चप्पल प्रोटेस्ट’ म्हणजे काय?

CJPच्या म्हणण्यानुसार, ‘पीपल्स ट्रिब्युनल’नंतर करण्यात आलेला ‘चप्पल प्रोटेस्ट’ हा महिलांशी एकजूट व्यक्त करण्यासाठी आयोजित प्रतीकात्मक निषेध आहे. या आंदोलनातून SIR प्रक्रियेविषयीच्या आक्षेपांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला. CJPचे सहसंयोजक आशुतोष रांका यांनी नागरिकांना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या म्हणण्यानुसार, आधी SIR प्रक्रियेमुळे मतदार यादीतून नावे वगळल्याचा दावा करणाऱ्या नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले जाणार होते आणि त्यानंतर महिलांच्या समर्थनार्थ ‘चप्पल प्रोटेस्ट’ करण्यात येणार होता.

ध्रुव राठींचाही सहभाग

यूट्यूबर ध्रुव राठी (Dhruv Rathee) यांनी सोशल मीडियावर व्हिडिओद्वारे बंगळुरूतील कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची पुष्टी केली. त्यानंतर ते बंगळुरूत दाखल झाले. त्यांच्या सहभागामुळे या आंदोलनाकडे सोशल मीडियाचेही लक्ष वेधले गेले.

प्रकाश राज यांचेही समर्थन

अभिनेते आणि कार्यकर्ते प्रकाश राज (Prakash Raj) यांनीही या आंदोलनाला समर्थन दिले. त्यांनी नागरिकांना फ्रीडम पार्क येथे सहभागी होण्याचे आवाहन केले. SIR प्रक्रियेमुळे मतदार यादीतून नावे वगळल्याचा दावा करणाऱ्या नागरिकांच्या मुद्द्यांवर आवाज उठवण्याची भूमिका त्यांनी मांडली.

CJPच्या प्रमुख मागण्या कोणत्या?

या (Cockroach Janata Party) आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर CJPकडून प्रामुख्याने पुढील मागण्या मांडण्यात आल्या आहेत :

  1. SIR प्रक्रियेदरम्यान मतदार यादीतून करण्यात आलेली कथित चुकीची वगळणी रद्द करावी.
  2. SIRपूर्वीची मतदार यादी कायम ठेवावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आली आहे.
  3. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी CJPने केली आहे.

आंदोलनस्थळी ‘Error 404 – Name Not Found’, ‘Don’t erase us, hear us’ अशा घोषणा असलेले फलकही झळकवण्यात आले. SIR प्रक्रियेविरोधात नागरिक आणि विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी केली.

10 ऑक्टोबरला दिल्लीकडे मोर्चा

बंगळुरूतील आंदोलनानंतर CJPकडून 10 ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे आंदोलन करण्याची घोषणा करण्यात आली आहे. CEC ज्ञानेश कुमार (CEC Dyanesh Kumar) यांच्या राजीनाम्याची मागणी पुढेही कायम ठेवण्याचे CJPने म्हटले आहे. दरम्यान, SIR प्रक्रियेबाबत निवडणूक आयोगाची भूमिका आणि मतदार यादीतील बदलांवरून राजकीय व सामाजिक स्तरावर चर्चा सुरू आहे. बंगळुरूतील ‘पीपल्स ट्रिब्युनल’ आणि ‘चप्पल प्रोटेस्ट’मुळे हा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे.

संबंधित सामग्री

शेख, खान, पाटील आडनावांची किती नावे गायब? महाराष्ट्राच्या SIR रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

शेख, खान, पाटील आडनावांची किती नावे गायब? महाराष्ट्राच्या SIR रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

महाराष्ट्र SIR रिपोर्टमध्ये 2.07 कोटी मतदारांची नावे ड्राफ्ट लिस्टमध्ये नसल्याचा दावा. पुणे, ठाणे, मुंबईसह 190 मतदारसंघांवर परिणाम?

Nov 09, 2026
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढल्या! २० वर्षांपूर्वीच्या २ कोटींच्या लाचखोरी प्रकरणाची चौकशी होणार

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या अडचणी वाढल्या! २० वर्षांपूर्वीच्या २ कोटींच्या लाचखोरी प्रकरणाची चौकशी होणार

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधातील दोन कोटींच्या कथित लाचखोरी प्रकरणाची केरळमध्ये चौकशी होणार. गृहमंत्री रमेश चेन्निथला यांचे VACB ला आदेश.

Nov 04, 2026
INDIA आघाडीची रामलीला मैदानावर भव्य महारॅली; राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांसह अनेक दिग्गज नेते सहभागी

INDIA आघाडीची रामलीला मैदानावर भव्य महारॅली; राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादवांसह अनेक दिग्गज नेते सहभागी

INDIA Ramlila Maidan Rally: मतदार यादीतील कथित अनियमितता आणि विशेष सखोल मतदार पुनरीक्षण (SIR) प्रक्रियेच्या विरोधात काँग्रेसप्रणीत INDIA आघाडीने आज रविवारी (1 नोव्हेंबर) दिल्लीत शक्तिप्रदर्शन केले.

Nov 01, 2026
ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा ‘जन महाभियोग’

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा ‘जन महाभियोग’

ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात इंडिया आघाडीचा ‘जन महाभियोग’; खर्गेंची पदावरून हटवण्याची मागणी, महाराष्ट्रातील ४० लाख नव्या मतदारांचा उल्लेख.

Oct 31, 2026
पदवीधर, शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपुष्टात; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आदेश जारी

पदवीधर, शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपुष्टात; मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे आदेश जारी

पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांची आचारसंहिता संपली. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने 29 ऑक्टोबर रोजी आदेश जारी केला.

Oct 30, 2026