दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्याने अंत्यविधीला पोहोचता आले नाही..
हिंगोली (CJP President Abhijit Deepke) : सीजेपीचे अध्यक्ष अभिजीत दिपके कालपासून दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असल्यामुळे त्यांना आपल्या आजीच्या अंत्यविधीला पोहोचता आले नव्हते. दिल्ली पोलिसांनी जामीनावर सुटका केल्यानंतर अभिजीत दिपके यांनी दिल्लीहून थेट विमानाने नागपूर गाठले आणि तेथून वाहनाने मध्यरात्री उशिरा हिंगोली जिल्ह्यातील त्यांचे मूळ गाव असलेल्या संतुकपिंपरी गावात दाखल झाले.
संतुकपिंपरीत घरी पोहोचताच अभिजीत दिपके (CJP President Abhijit Deepke) यांनी थेट मध्यरात्री स्मशानभूमी गाठली. आजीच्या चितेच्या ठिकाणी पोहोचताच त्यांच्या अश्रूंचा बांध फुटला. आजीच्या आठवणीने ढसाढसा रडणाऱ्या दिपके यांना अश्रू अनावर झाले होते. मध्यरात्री स्मशानभूमीत अभिजीत दिपके यांनी आजीला अखेरची श्रद्धांजली वाहिली. यावेळी कुटुंबीय आणि गावातील नागरिक उपस्थित होते. आंदोलना दरम्यान दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्यामुळे अंत्यसंस्काराला मुकावे लागल्याची भावना यावेळी व्यक्त होत होती.