Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

भाजप कंगना रणौत

कंगनाचा पुन्हा निशाणा; अभिजीत दिपकेंच्या इंग्रजीवर अप्रत्यक्ष टोला

BJP Kangana Ranaut: जप खासदार कंगना रणौतने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे दिसून येत आहे.


कंगनाचा पुन्हा निशाणा अभिजीत दिपकेंच्या इंग्रजीवर अप्रत्यक्ष टोला

BJP Kangana Ranaut |

नवी दिल्ली/ मुंबई (BJP Kangana Ranaut) : अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत पुन्हा एकदा समाजमाध्यमांवरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे. कंगनाने कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजीत दिपके (Abhijit Dipke) यांच्या इंग्रजी बोलण्याच्या शैलीवर अप्रत्यक्षपणे टीका केल्याचे दिसून येत आहे.

कंगनाने समाजमाध्यमांवर एक चित्रफीत शेअर केली आहे. या चित्रफितीत अभिजीत दिपके इंग्रजीत वक्तव्य करताना, तर (BJP Kangana Ranaut) कंगना रणौत इंग्रजीत भाषण करताना दिसत आहे. चित्रफितीवर ‘12वी पास कंगना रणौत विरुद्ध बोस्टन युनिव्हर्सिटीचे अभिजीत दिपके’ (Abhijit Dipke) अशा आशयाचा उल्लेख करण्यात आला आहे. या तुलनेतून कंगनाने दिपकेंच्या इंग्रजी बोलण्याच्या पद्धतीवर निशाणा साधल्याचे स्पष्ट होत आहे.

कंगनाने (BJP Kangana Ranaut) यापूर्वीही आपल्या चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या काळातील अनुभव सांगताना इंग्रजी भाषेमुळे आपली खिल्ली उडवली जात असल्याचा उल्लेख केला होता. या जुन्या अनुभवाचा संदर्भ देत तिने आपल्या नव्या पोस्टमधून स्वतःच्या संघर्षाची आठवण करून दिल्याचे मानले जात आहे.

दरम्यान, अभिजीत दिपके( Abhijit Dipke) यांनीही कॅमेऱ्यासमोर इंग्रजी बोलताना संकोच का वाटतो, याबाबत समाजमाध्यमांवरील प्रश्नाला उत्तर दिले होते. कॅमेऱ्यासमोर बोलताना आपण जाणीवपूर्वक अधिक सजग होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. (BJP Kangana Ranaut) कंगनाच्या या पोस्टनंतर दोघांमधील समाजमाध्यमांवरील वाद पुन्हा चर्चेत आला आहे. आता अभिजीत दिपके (Abhijit Dipke) या पोस्टवर काय प्रतिक्रिया देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related to this topic: