‘ऑर्नब’ चक्रीवादळ संकट

देशात चक्रीवादळाचे संकट; किनारपट्टी भागांत हाय अलर्ट, पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा

Arnab Cyclone Crisis: भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 12 तासांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबरच्या सकाळी हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ.

देशात चक्रीवादळाचे संकट; किनारपट्टी भागांत हाय अलर्ट, पाच राज्यांना सतर्कतेचा इशारा

Cyclone Arnab Alert

 

बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळाची तीव्रता वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली/ भुवनेश्वर (Cyclone Arnab Alert) : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘ऑर्नब’ चक्रीवादळाचा धोका वाढला असून, ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टी भागांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अंदाजानुसार, या चक्रीवादळाची तीव्रता पुढील 12 तासांत आणखी वाढण्याची शक्यता आहे. 28 ऑक्टोबरच्या सकाळी हे वादळ आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन आंध्र प्रदेश, ओडिशा, तेलंगणा, छत्तीसगड आणि पुद्दुचेरी या पाच राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून रेल्वे प्रशासनाने 27 आणि 28 ऑक्टोबर रोजी धावणाऱ्या 53 रेल्वेगाड्या रद्द केल्या आहेत.

दरम्यान, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड आणि पूर्व उत्तर प्रदेशातही पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे (Cyclone Arnab Alert) किनारपट्टी भागातील नागरिकांसह रेल्वे प्रवाशांनीही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

वाऱ्याचा वेग ताशी 125 किमीपर्यंत जाण्याची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘ऑर्नब’ चक्रीवादळाने (Cyclone Arnab Alert) तीव्र चक्रीवादळाचे स्वरूप धारण केले होते. हे वादळ ताशी सुमारे 17 किलोमीटर वेगाने पश्चिमेकडे सरकत होते. त्यावेळी वादळाचे केंद्र विशाखापट्टणमपासून सुमारे 490 किलोमीटर, काकीनाडापासून 560 किलोमीटर आणि बापटला येथून 730 किलोमीटर अंतरावर होते.

पुढील 12 तासांत वादळाचे रूपांतर अतितीव्र चक्रीवादळात होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. 28 ऑक्टोबरच्या सकाळी आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीजवळ वादळ पोहोचण्याचा अंदाज आहे. बापटला आणि विशाखापट्टणमदरम्यान यानम परिसराच्या आसपास वादळाचा संभाव्य परिणाम होऊ शकतो. वादळ किनारपट्टीजवळ पोहोचताना वाऱ्याचा वेग ताशी 115 ते 125 किलोमीटरपर्यंत जाण्याची शक्यता असून, वाऱ्याचे जोरदार झोत ताशी 140 किलोमीटर वेगाने वाहू शकतात. मात्र, (Cyclone Arnab Alert) वादळाची दिशा आणि तीव्रतेत बदल होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी हवामान विभागाच्या अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

ओडिशातील सहा जिल्ह्यांमध्ये विशेष खबरदारी

चक्रीवादळाचा (Cyclone Arnab Alert) संभाव्य धोका लक्षात घेऊन ओडिशा सरकारने दक्षिणेकडील सहा जिल्ह्यांमध्ये विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश दिले आहेत. यामध्ये गंजाम, गजपती, रायगडा, मलकानगिरी, कोरापुट आणि नबरंगपूर या जिल्ह्यांचा समावेश आहे. मुख्यमंत्री मोहन चरण माझी (CM Mohan Charan Majhi) यांनी आपत्ती व्यवस्थापन आणि तयारीवर देखरेख ठेवण्यासाठी आठ मंत्र्यांवर जबाबदारी सोपवली आहे. गंजाम जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून 27, 28 आणि 29 ऑक्टोबर रोजी सर्व अंगणवाडी केंद्रांना सुटी जाहीर केली आहे. खराब हवामानामुळे लहान मुले आणि कर्मचाऱ्यांना संभाव्य धोक्यापासून सुरक्षित ठेवणे हा यामागील उद्देश आहे.

आंध्र प्रदेशात एनडीआरएफची 10 पथके तैनात

आंध्र प्रदेशमध्ये चक्रीवादळाचा (Cyclone Arnab Alert) सामना करण्यासाठी प्रशासनाने तयारी वेगाने सुरू केली आहे. मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अधिकाऱ्यांना चोवीस तास सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करणे आणि किनारपट्टीवरील गावांमधील नागरिकांना नियमित सूचना देण्यावर भर देण्यात आला आहे. मच्छीमारांना समुद्रातून परतण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, प्रसूतीची तारीख जवळ आलेल्या गर्भवती महिलांना वेळेत रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली जात आहे. राज्यात राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची (NDRF) 10 पथके तैनात करण्यात आली असून, देशभरातील आणखी 16 पथके गरज भासल्यास मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

नऊ बंदरांवर चक्रीवादळाचा इशारा

बंगालच्या उपसागरातील वादळाची तीव्रता वाढत असल्याने तमिळनाडू आणि पुद्दुचेरीतील नऊ बंदरांवर चक्रीवादळविषयक इशारा संकेत लावण्यात आले आहेत. चेन्नई, नागपट्टणम, कुड्डालोर, कराईकल, पंबन आणि तूतीकोरीन यांसारख्या बंदरांचा त्यामध्ये समावेश आहे. बंदर प्रशासन, जहाजचालक आणि सागरी वाहतुकीशी संबंधित कर्मचाऱ्यांना सावध करण्यासाठी हे संकेत लावण्यात आले आहेत. मच्छीमारांना 26 ते 29 ऑक्टोबरदरम्यान समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (Cyclone Arnab Alert) चक्रीवादळाच्या संभाव्य मार्गावरील नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी राहावे, समुद्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

संबंधित सामग्री

मराठी साहित्यविश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे निधन

मराठी साहित्यविश्वावर शोककळा! मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे निधन

मेहता पब्लिशिंग हाऊसचे संस्थापक अनिल मेहता यांचे कोल्हापुरात निधन. वयाच्या ८६व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. मराठी साहित्यविश्वात शोककळा.

Nov 07, 2026
धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

धनतेरसच्या दिवशी कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग; चार डबे जळून खाक

Punjab Karmabhoomi Express Fire: धनतेरसच्या दिवशी पंजाबमध्ये अमृतसरहून न्यू जलपाईगुडीकडे जाणाऱ्या कर्मभूमी एक्स्प्रेसला भीषण आग लागल्याची घटना आज शुक्रवारी दुपारी घडली. सराय बंजारा रेल्वे स्थानक घटना.

Nov 06, 2026
राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येणार? पवार-पटेल भेटीने राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चेला उधाण

Nationalist Congress Party: राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गट पुन्हा एकत्र येणार का, या चर्चेला ज्येष्ठ नेते शरद पवार आणि अजित पवार गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांच्या भेटीमुळे पुन्हा उधाण आले...

Nov 06, 2026
'हातात राज्यघटना, कृती मात्र विरोधात'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

'हातात राज्यघटना, कृती मात्र विरोधात'; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा राहुल गांधींवर निशाणा

Save Democracy, Remove Anarchy: राज्यघटनेच्या रक्षणाचा दावा करणाऱ्या काँग्रेसची कृती मात्र घटनात्मक तत्त्वांच्या विरोधात असल्याचा आरोप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी

Nov 05, 2026
फटाके फोडण्यास, आकाशकंदील उडविण्यास बंदी; दुष्काळाचे भान ठेवा, साधेपणाने दिवाळी साजरी करा!

फटाके फोडण्यास, आकाशकंदील उडविण्यास बंदी; दुष्काळाचे भान ठेवा, साधेपणाने दिवाळी साजरी करा!

Maharashtra Diwali Safety Rules: शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशा परिस्थितीत दिवाळी साजरी करताना सामाजिक भान राखून अनावश्यक खर्च टाळण्याची गरज आहे...

Nov 05, 2026