Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

अंबिका अर्बन सोसायटी

सुरक्षित कर्जवाटप हेच अंबिका अर्बनच्या यशाचे गमक

Ambika Urban Society: सुरक्षित कर्जवाटप हेच अंबिका अर्बनच्या यशाचे खरे गमक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे परिवारप्रमुख तथा अध्यक्ष ॲड. विजय कोठारी यांनी केले.


सुरक्षित कर्जवाटप हेच अंबिका अर्बनच्या यशाचे गमक

Ambika Urban Society |

३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत परिवारप्रमुख ॲड. विजय कोठारी यांचे प्रतिपादन

समाधान गाडेकर
चिखली (Ambika Urban Society) :
आर्थिक संस्थेची प्रगती ही केवळ मोठ्या प्रमाणात कर्जवाटप करण्यावर अवलंबून नसून, सुरक्षित आणि परतफेडीची हमी असलेल्या कर्जवाटपावर तिची खरी आर्थिक भक्कमता अवलंबून असते. श्री अंबिका अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने सुरुवातीपासूनच सुरक्षित कर्जवाटपाचे धोरण स्वीकारल्यामुळे संस्थेची आर्थिक प्रगती सातत्याने होत असून, एकूण कर्जवाटपापैकी तब्बल ६२ टक्के वाटा वेअरहाऊस व सोनेतारण कर्जाचा झाला आहे. सुरक्षित कर्जवाटप हेच अंबिका अर्बनच्या यशाचे खरे गमक असल्याचे प्रतिपादन संस्थेचे परिवारप्रमुख तथा अध्यक्ष ॲड. विजय कोठारी यांनी केले.

श्री अंबिका अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची (Ambika Urban Society) ३८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवारी, दि. ३० ऑगस्ट रोजी परमहंस रामकृष्ण मौनीबाबा संस्थान येथे उत्साहात पार पडली. सभेच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर चालू आर्थिक वर्षात निधन झालेल्या व्यक्तींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पुढे सभेच्या विषयपत्रिकेचे वाचन करून कामकाजाला सुरुवात करण्यात आली.

यावेळी संस्थेच्या माजी अध्यक्षा डॉ. संध्याताई कोठारी यांनी संस्थेच्या प्रगतीसाठी सहकार्य करणारे सभासद, ठेवीदार, हितचिंतक तसेच व्यासपीठावरील मान्यवरांचे स्वागत केले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव विद्याधर महाले यांनी आपल्या मनोगतात पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे विदर्भातही सहकार चळवळ अधिक व्यापक होणे आवश्यक असल्याचे सांगितले. पतसंस्था क्षेत्रातील विविध संस्थांनी एकमेकांना सहकार्य केल्यास सहकार क्षेत्र अधिक मजबूत होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. अंबिका अर्बनची नेत्रदीपक प्रगती ही इतर सहकारी संस्थांसाठी दीपस्तंभाप्रमाणे असल्याचेही ते म्हणाले. त्यांच्या वाढदिवसानिमित्त संस्थेच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.

चिखली नगरपालिकेचे नगराध्यक्ष पंडितराव देशमुख यांनी (Ambika Urban Society) अंबिका अर्बनच्या सातत्यपूर्ण प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले. संस्थेचा प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावत असून, संस्थेच्या कामकाजाविषयी विश्वासार्हता निर्माण झाल्याचे त्यांनी नमूद केले. संस्थेच्या वतीने करण्यात आलेल्या सत्काराबद्दल त्यांनी अंबिका अर्बन परिवाराचे आभार मानले. यावेळी आमदार श्वेताताई महाले यांनीही संस्थेच्या प्रगतीबद्दल अभिनंदन केले. सहकारी पतसंस्थेचे आर्थिक व्यवस्थापन करणे ही तारेवरची कसरत असते; मात्र अंबिका अर्बनने अत्यंत सक्षमपणे आणि विश्वासार्हतेने ही जबाबदारी पार पाडत उल्लेखनीय प्रगती साधल्याचे त्यांनी सांगितले.

परिवारप्रमुख ॲड. विजय कोठारी यांनी संस्थेच्या आर्थिक वाटचालीचा आढावा घेताना सांगितले की, संस्थेची प्रगती ही सभासद, ठेवीदार, हितचिंतक आणि कर्मचाऱ्यांच्या विश्वासामुळे शक्य झाली आहे. संस्थेने सुरक्षित कर्जवाटपाचे धोरण स्वीकारल्यानंतर आर्थिक स्थैर्य अधिक मजबूत झाले आहे. आज संस्थेच्या एकूण कर्जवाटपामध्ये ६२ टक्के वाटा वेअरहाऊस व सोनेतारण कर्जाचा आहे. त्यामुळे सहकारी संस्थांनी जोखमीच्या कर्जवाटपाऐवजी सोनेतारण व वेअरहाऊससारख्या सुरक्षित कर्जप्ठेवीदारांनी केवळ जास्त व्याजदराच्या आमिषाला बळी न पडता, संस्थेची विश्वासार्हता, आर्थिक स्थैर्य आणि सुरक्षितता तपासूनच आपल्या कष्टाच्या ठेवी ठेवाव्यात, असे आवाहनही कोठारी यांनी केले. आर्थिक साक्षर समाजनिर्मितीसाठी अंबिका अर्बन सातत्याने कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी संस्थेच्या सामाजिक बांधिलकीची नवी दिशा जाहीर करण्यात आली. गरजू रुग्णांसाठी घरगुती वापराकरिता पलंग, वॉटर बेड, बेडपॅन, वॉकर, टॉयलेट चेअर, व्हीलचेअर, कमोड चेअर, ऑक्सिजन सिलिंडर आदी आवश्यक वैद्यकीय साहित्याची सेवा संस्थेच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची घोषणा ॲड. विजय कोठारी यांनी केली. या उपक्रमाचे लोकार्पणही यावेळी करण्यात आले. तसेच आमदार श्वेताताई महाले आणि अमडापूर परिसरातील नागरिकांच्या मागणीनुसार येत्या काळात अमडापूर परिसरातील जनतेसाठी स्वर्गरथ व शवपेटी सेवा सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.

सभेत विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. गिर्यारोहण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारी कु. सिद्धी सोनुने तसेच तलवारबाजीमध्ये यश मिळविलेल्या कु. अर्णवी लंबे यांचा यथोचित सत्कार करून प्रत्येकी ५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच चिखली नगरपालिकेच्या उपाध्यक्षा वैशाली खेडेकर यांचाही संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.

या वार्षिक सर्वसाधारण सभेला आमदार श्वेताताई महाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सचिव विद्याधर महाले, शि. प्र. मंडळाचे अध्यक्ष रामकृष्णदादा शेटे, विद्यानिकेतनचे अध्यक्ष सतीश गुप्ता, श्रीराम अर्बनचे अध्यक्ष तथा नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, संस्थेच्या माजी अध्यक्षा डॉ. संध्याताई कोठारी, विद्यमान अध्यक्ष तथा परिवारप्रमुख ॲड. विजय कोठारी, उपाध्यक्ष भगवान नागवाणी यांच्यासह संचालक प्रेमराज भाला, श्रीराम कुटे, हनुमंत भवर, सुरेंद्र पांडे, तुणकरण डागा, अशोक कोटेचा, अर्चना पांडे, संध्याताई माहेश्वरी, गजानन पवार, आनंदराव हिवाळे, डॉ. गजानन गांधी, नवीन मंत्री, डॉ. सौरभ कोठारी, अरविंद असोलकर, भीष्म गुरुदासानी, प्रल्हाद पवार तसेच संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सभेचे सूत्रसंचालन सुरेंद्र पांडे आणि वैशाली बावस्कर यांनी केले. संस्थेचा अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन राऊत यांनी सादर केला. उपाध्यक्ष भगवान नागवाणी यांनी आभार प्रदर्शन केले. सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या सर्व संचालक, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related to this topic: