Breaking News
  • अमरावती विद्यापीठातील एफडीएची तिसऱ्यांदा कारवाई
  • भुताच्या अफवेमुळे घाबरलेल्या डोमा आश्रमशाळेत जिल्हाधिकाऱ्यांचा मुक्काम
  • अकोला शहरातील कंवर नगर येथील 'मे. ब्लिंकिट कॉमर्स प्रायव्हेट लिमिटेड' या ऑनलाइन किराणा व अन्नपदार्थ पुरवठा करणाऱ्या पेढीचा अन्न परवाना अन्न व औषध प्रशासनाने निलंबित केला
  • नवी मुंबई मनपा राबविणार लखपती दीदी योजना, देशातील पहिली महापालिका ठरणार
  • पिकअप जीपच्या धडकेत 20 वर्षीय युवतीचा दुर्दैवी मृत्यू
  • लातूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाय; कृत्रिम पाऊस पाडण्याची उपाययोजना करावी; माजी आमदार धीरज देशमुख यांची शासनाकडे विनंती
  • राहुल गांधी यांचं नाशिकमध्ये आगमन, भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन
  • पालघर आश्रमशाळेतील दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूने खळबळ; निलेश सांबरे यांच्यासह संस्थेच्या सदस्यांवर गुन्हा दाखल
  • मनोज जरांगे पाटील यांचे प्रकृती खालावली; मराठा बांधव रस्त्यावर

होम > महाराष्ट्र

प्रकाश पोहरे

माझ्या शेतकरी आंदोलनाचे खरे श्रेय ॲड. मोतीसिंह मोहता यांनाच: प्रकाश पोहरे

Prakash Pohare: वीज रोको आंदोलन, कापूस सीमा पार आंदोलन, देशी दारू दुकान बंदी आंदोलन, अशा अनेक आंदोलनांमध्ये झालेल्या सर्व केसेस आम्ही केवळ मोतीसिंह मोहता यांचे पाठबळ असल्यामुळेच यशस्वी करू शकलो


माझ्या शेतकरी आंदोलनाचे खरे श्रेय ॲड मोतीसिंह मोहता यांनाच प्रकाश पोहरे

Prakash Pohare |

 

ॲड. मोतीसिंह मोहता यांच्या सत्काराला चाहत्यांची गर्दी

अकोला (Prakash Pohare) : १९८० ते १९९४ या काळातील शेतकरी संघटनेतील आंदोलनाचा झंजावात हा ॲड. मोतीसिंह मोहता यांच्यासारखे सहकारी पाठीशी खंबीरपणे उभे असल्यामुळेच शक्य झाला. वीज रोको आंदोलन, कापूस सीमा पार आंदोलन, देशी दारू दुकान बंदी आंदोलन, अशा अनेक आंदोलनांमध्ये झालेल्या सर्व केसेस आम्ही केवळ मोतीसिंह मोहता यांचे पाठबळ असल्यामुळेच यशस्वी करू शकलो, आज त्यांच्या कार्यक्रमाला लाभलेली उपस्थिती ही त्यांच्या लोकाभिमुख व्यक्तिमत्त्वाला मिळालेली पावती आहे, अशा गौरवपूर्ण शब्दात प्रकाश पोहरे (Prakash Pohare) यांनी ॲड. मोहता (Adv. Motisinh Mohta) यांचा उल्लेख केला.

स्थानिक आरएलटी विज्ञान महाविद्यालयाच्या सभागृहात ज्येष्ठ विधिज्ञ तथा बीजीई सोसायटीचे अध्यक्ष ॲड. मोतीसिंह मोहता यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित सत्कार सोहळा नुकताच संपन्न झाला. यावेळी ते कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते.

कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून किसान ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष तथा शेतकरी नेते प्रकाश पोहरे, अध्यक्षस्थानी पालकमंत्री ना. आकाश फुंडकर होते. यावेळी आमदार किरण सरनाईक, माजी राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, शिवाजी शिक्षण संस्थेचे सदस्य हेमंत काळमेघ, माजी आमदार गजानन दाळू गुरुजी, नारायणराव गव्हाणकर, बबनराव चौधरी, हरिभाऊ भदे, बळीराम सिरस्कार, जनता बँकेचे अध्यक्ष रमाकांत खेतान, डॉ. आर. बी. हेडा, विदर्भ साहित्य संघाचे अकोला जिल्हाध्यक्ष विजय कौसल, अर्बन बँकेचे माजी अध्यक्ष रामेश्वर फुंडकर, नगरसेवक हरीश अलीमचंदानी, कृष्णा अंधारे, डॉ. गजानन नारे उपस्थित होते.

याप्रसंगी ॲड. मोहता (Adv. Motisinh Mohta) व सौ. इंदुमती मोहता यांचा शाल व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. या सन्मानपत्राचे लेखन व वाचन प्रदीप खाडे यांनी केले. प्रास्ताविक सत्कार समितीचे अध्यक्ष नगरसेवक ॲड. गिरीश गोखले यांनी केले. यावेळी ॲड. मोहता यांनी आपल्या सत्कारास उत्तर देताना आपला जीवन प्रवास कथन केला. सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष ॲड. गिरीश गोखले, सोहळा समितीचे संयोजक तथा अकोला बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. हेमसिंह मोहता, सत्कार समितीचे मुख्य आयोजक अण्णाभाऊ टाले, समितीचे सदस्य प्रा. राहुल खंडारे, ओमप्रकाश दाळू, मुकेश गव्हाणकर, विनोद अंबूसकर, ॲड. प्रवीण मुरूमकर, सोनू देशमुख, ॲड. राहुल इंगळे, ऋषीकेश ढोरे यांनी अतिथींचे स्वागत केले. सौ. इंदुमती मोहता यांचा सत्कार रेखा राऊत यांनी केला.

कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. राजेश चंद्रवंशी, प्राचार्या मनीषा आरज, प्राचार्य डॉ. आर.डी. सिकची, ठाणेदार मनोज केदारे, ठाणेदार मालती कायटे, अनिरुद्ध देशमुख, जयंत सरदेशपांडे, किशोर खत्री, कृष्णा शर्मा, गोपाळराव देशमुख, मोहन गद्रे, नगरसेविका उषा विरक, प्रशांत गावंडे, भानुदास कराळे, विनायकराव पांडे, नगरसेवक सागर भारुका, कपिल रावदेव, ॲड. सत्यनारायण जोशी, विजय ठोकळ, प्राचार्य अंबादास कुलट, मनोज देशमुख, किशोर पाटील, रमेश गायकवाड, जीवन देशमुख, अविनाश पाटील, गोपी ठाकरे, मनीष हिवराळे, ॲड. पप्पू मोरवाल, चंद्रशेखर चिंचोळकर, रमेश गायकवाड, नगरसेवक पराग गवई, नगरसेवक आशिष पवित्रकार, डॉ. सुनील चव्हाण, संजय राऊत, नगरसेवक विजय इंगळे, डॉ. अमोल रावणकर, डॉ. चंद्रकांत पनपालिया, ॲड. दीपाली जानोरकर, प्रा. शारदा बियाणी, राधा मोहता, रमण, दीपक गावंडे, श्रीकांत दांदळे, रवी वानखडे, संजय पारधी, दिवाकर जोशी, आदित्य केणे, गोपी चाकर यांच्यासह बीजीई सोसायटी अंतर्गत प्राचार्य, प्राध्यापक वृंद, कर्मचाऱ्यांसह गणमान्य नागरिक उपस्थित होते.
संचलन प्रदीप खाडे तर आभार प्रदर्शन ॲड. गिरीश गोखले यांनी केले.

अॅड. मोहता यांचे विधी व्यवसायाचा सन्मान वाढविणारे कार्य - पालकमंत्री

प्रत्येक क्षेत्रात चांगली कामगिरी करणारे लोक असतात. अशा व्यक्तींच्या कार्यामुळे त्या क्षेत्राचा अथवा व्यवसायाचा सन्मान वाढत असतो. ॲड. मोतीसिंह मोहता (Adv. Motisinh Mohta) असाच सन्मान वाढविणारे एक व्यक्तिमत्त्व आहे. विधीक्षेत्रातील त्यांच्या सुमारे 50 वर्षांच्या कारकिर्दीतील विविध कामांमुळे वकिलीक्षेत्राचा सन्मान वाढविण्याचे कार्य ॲड. मोहता यांनी केले आहे, असे गौरवोदगार पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी यावेळी काढले.