अभिषेक शर्माचा विश्वविक्रम

अभिषेक शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम! सूर्यकुमार यादवला टाकले मागे

Abhishek Sharma world record: वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा याला मोठी खेळी करता आली नसली, तरी त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला...

अभिषेक शर्माचा षटकारांचा विश्वविक्रम! सूर्यकुमार यादवला टाकले मागे

Abhishek Sharma world record

 

एका वर्षात सर्वाधिक षटकार ठोकणारा भारतीय फलंदाज

नवी दिल्ली (Abhishek Sharma world record) : वेस्ट इंडिजविरुद्धच्या चौथ्या टी-20 सामन्यात भारतीय फलंदाज अभिषेक शर्मा याला मोठी खेळी करता आली नसली, तरी त्याने आपल्या नावावर एक मोठा विक्रम नोंदवला आहे. एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा भारतीय फलंदाज बनण्याचा मान अभिषेकने मिळवला आहे. त्याने सूर्यकुमार यादवला मागे टाकत ही ऐतिहासिक कामगिरी केली.

चौथ्या टी-20 सामन्यातील नवव्या षटकात शमर स्प्रिंगरच्या गोलंदाजीवर षटकार ठोकत (Abhishek Sharma world record) अभिषेकने 2026 या वर्षातील आपल्या षटकारांची संख्या 69 वर नेली. यापूर्वी अभिषेक शर्मा आणि सूर्यकुमार यादव प्रत्येकी 68 षटकारांसह संयुक्तपणे अव्वल स्थानी होते. सूर्यकुमारने 2022 मध्ये 68 षटकार मारले होते, तर अभिषेकने 2025 मध्ये 54 षटकारांची नोंद केली होती. या यादीत (Ishan Kishan) ईशान किशन 2026 मध्ये 52 षटकारांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानने 2025 मध्ये 45 षटकार मारले होते.

टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही अभिषेकची दमदार कामगिरी

एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याबरोबरच (Abhishek Sharma world record) अभिषेक शर्माची टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील कामगिरीही उल्लेखनीय आहे. त्याने आतापर्यंत 65 डावांमध्ये 142 षटकार ठोकले आहेत. त्याची हीच आक्रमक फलंदाजी कायम राहिल्यास तो लवकरच रोहित शर्माच्या विक्रमालाही आव्हान देऊ शकतो.

विक्रम केला; पण चौथ्या टी-20 मध्ये फलंदाजी अपयशी

विक्रमाची नोंद करूनही (Abhishek Sharma world record) अभिषेकला चौथ्या टी-20 सामन्यात अपेक्षित कामगिरी करता आली नाही. तो 24 चेंडूंत 29 धावा करून बाद झाला. त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीच्या तुलनेत ही खेळी संथ ठरली. या सामन्यात भारताला 24 धावांनी पराभव स्वीकारावा लागला. वेस्ट इंडिजने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २४७ धावांचा डोंगर उभारला.

संजू सॅमसनची आक्रमक खेळी व्यर्थ

248 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना (Sanju Samson) संजू सॅमसनने अवघ्या 23 चेंडूंत 56 धावा ठोकत भारताला वेगवान सुरुवात करून दिली. त्याच्या खेळीत 6 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. भारताने पहिल्या चार षटकांतच 60 धावा केल्या होत्या. मात्र, अभिषेक शर्मा (Abhishek Sharma) बाद झाल्यानंतर भारतीय फलंदाज नियमित अंतराने बाद होत गेले. परिणामी, वेगवान सुरुवात करूनही भारतीय संघाला विजय मिळवता आला नाही.

संबंधित सामग्री

नागपुरातील भाजपच्या पराभवाने महायुतीत खळबळ; फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

नागपुरातील भाजपच्या पराभवाने महायुतीत खळबळ; फडणवीसांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह?

Maharashtra Legislative Council Election: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या नागपुरात काँग्रेसने विजय मिळवल्याने महायुतीमधील राजकीय..

Oct 29, 2026
अभिषेक शर्माने मोडला विराट कोहलीचा विक्रम!

अभिषेक शर्माने मोडला विराट कोहलीचा विक्रम!

Abhishek Sharma Vikram: भारतीय सलामीवीर अभिषेक शर्मा (Abhishek Sharma Vikram) याने न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात तुफानी फलंदाजी करत क्रिकेटविश्वाचे लक्ष वेधून घेतले...

Oct 28, 2026
शुभमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम! पाचव्यांदा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारावर मोहोर

शुभमन गिलचा ऐतिहासिक पराक्रम! पाचव्यांदा आयसीसी ‘प्लेअर ऑफ द मंथ’ पुरस्कारावर मोहोर

Player of the Month Award: भारतीय क्रिकेटसाठी आणखी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय पुरुष क्रिकेट संघाचा कर्णधार शुभमन गिल आणि महिला संघाची आक्रमक सलामीवीर शेफाली वर्मा

Oct 13, 2026
हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांवरच सरकारची दडपशाही! सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल

हक्कांसाठी आवाज उठवणाऱ्यांवरच सरकारची दडपशाही! सुप्रिया सुळे यांचा सरकारवर हल्लाबोल

Supriya Sule: शांततापूर्ण आंदोलनाच्या माध्यमातून मागण्या मांडणाऱ्या तरुणांना ताब्यात घेण्याच्या घटना. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा सरकारच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह ?...

Oct 12, 2026
अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम! रोहित-विराटसह सर्वांना टाकले मागे

अभिषेक शर्माचा ऐतिहासिक विक्रम! रोहित-विराटसह सर्वांना टाकले मागे

Abhishek Sharma: भारतीय संघाचा आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा याने आपल्या स्फोटक फलंदाजीच्या जोरावर टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नवा भारतीय विक्रम प्रस्थापित केला. वेस्ट इंडिजविरुद्ध इंदूर येथे..

Oct 12, 2026