अभिजित वंजारी विजयी

नागपूर पदवीधर मतदारसंघातील अभिजित वंजारी यांचा ऐतिहासिक विजय; मेडिकल चौकात जल्लोष

Abhijit Wanjari Wins: नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी यांनी सलग दुसऱ्यांदा विजय

नागपूर पदवीधर मतदारसंघातील अभिजित वंजारी यांचा ऐतिहासिक विजय; मेडिकल चौकात जल्लोष

Abhijit Wanjari Wins

नागपूर (Abhijit Wanjari Wins) : नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी Abhijit Wanjari Wins) यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवल्याबद्दल मेडिकल चौक परिसरात जल्लोष करण्यात आला.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव गिरीश कृष्णराव पांडव यांच्या पुढाकाराने मेडिकल चौकातील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात विजय जल्लोषाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला नवनिर्वाचित आमदार ॲड. अभिजित गोविंदराव वंजारी (Abhijit Wanjari Wins) यांची प्रमुख उपस्थिती होती. या विजय सोहळ्यात काँग्रेसचे आजी-माजी नगरसेवक, प्रदेश पदाधिकारी, युवक काँग्रेस आणि एनएसयूआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच महाविकास आघाडीचे सहकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त करत वंजारी यांच्या विजयाचे स्वागत केले.

पदवीधर मतदारांचा विश्वास आणि कार्यकर्त्यांच्या मेहनतीचे फलित

पदवीधर मतदारांनी दाखविलेला विश्वास, कार्यकर्त्यांनी घेतलेली मेहनत आणि महाविकास आघाडीची एकजूट यांचे प्रतीक म्हणून या विजयाकडे पाहिले जात असल्याचे गिरीश कृष्णराव पांडव यांनी सांगितले. या विजयामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, मेडिकल चौकातील कार्यक्रमात कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आनंदोत्सव साजरा केला.

टैग्स: Abhijit Wanjari Wins