Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

वर्धा नगरपालिका एसीबी कारवाई

लाचखोर नगर अभियंता अटकेत; वर्धा नगरपालिकेत एसीबीची कारवाई, परिसरात खळबळ

Wardha Municipality ACB action: लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) नागपूरच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी वर्धा नगरपालिकेचे नगर अभियंता संदीप डोईजड (वय ३८) यांना लाच प्रकरणात रंगेहात अटक केली.


लाचखोर नगर अभियंता अटकेत वर्धा नगरपालिकेत एसीबीची कारवाई परिसरात खळबळ

Wardha Municipality ACB action |

वर्धा (Wardha Municipality ACB action) : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग (ACB) नागपूरच्या पथकाने मंगळवारी सायंकाळी वर्धा नगरपालिकेचे नगर अभियंता संदीप डोईजड (वय ३८) यांना लाच प्रकरणात रंगेहात अटक केली. या कारवाईमुळे नगरपालिकेच्या परिसरात मोठी खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, एका ५० वर्षीय कंत्राटदाराने एसीबी नागपूरकडे तक्रार दाखल केली होती. (Wardha Municipality ACB action) संबंधित कंत्राटदाराचे सुमारे ९ लाख रुपयांचे प्रलंबित बिल मंजूर करून देण्यासाठी नगर अभियंत्याने २ लाख ५० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार करण्यात आली होती. तसेच गेल्या दोन वर्षांपासून बिलाच्या देयकासाठी वारंवार त्रास दिला जात असल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला होता.

एसीबीने तक्रारीची पडताळणी केली असता लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पथकाने सापळा रचला. नियोजनानुसार मंगळवारी तक्रारदार नगर अभियंत्यांच्या कार्यालयात पोहोचला. त्यावेळी (Wardha Municipality ACB action) एसीबीचे अधिकारी साध्या वेशात नगरपालिकेच्या परिसरात तैनात होते. नगर अभियंत्याने तक्रारदाराला २ लाख रुपये रोख रक्कम कार्यालयालगतच्या बाथरूममध्ये ठेवण्यास सांगितले. तक्रारदाराने रक्कम ठेवल्यानंतर आरोपीने बाथरूमला कुलूप लावले. याचवेळी एसीबीच्या पथकाने तातडीने कारवाई करत त्याला ताब्यात घेतले. उशिरापर्यंत पंचनामा व अन्य कायदेशीर प्रक्रिया सुरू होती. प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.