Gunj Gambling Raid: वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतात जुगार अड्डा चालविणाऱ्या चотиसारख्या चार व्यक्तींचा छापा मारून त्यांचे सव्वा लाख 21 हजार सहाशे रु.चा ऐवज जप्त
वसमत (Gunj Gambling Raid) : वसमत तालुक्यातील गुंज शिवारात वसमत व गुंज येथील काही जुगारी मिळून शेतातील तीन शेडमध्ये जुगार अड्डा चालवत होते. त्याची माहिती वसमत ग्रामीण पोलिसांना मिळाली त्यांनी छापा मारून चार झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळणाऱ्यांना ताब्यात घेतल्या असून त्यांच्याकडून एक लाख 21 हजार सहाशे रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. वसमत ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली.
अवैध व्यवसाय विरोधात कठोर कारवाई होत असतानाही गुंज येथील शेतात टीनशेड टाकून जुगार चालवण्याचा प्रकार समोर आला आहे. गुंज येथील ज्ञानेश्वर माखणे याच्या शेतात जुगार खेळला जात असल्याचे वसमत ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांना समजले सात जुलै रोजी सायंकाळी सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे व त्यांच्या पथकाने गुंज येथील शेतात छापा मारला चार जणांना ताब्यात घेतले त्यांच्याकडून नगदी 17 हजार 600 रू मोबाईल , मोटार सायकल व जुगाराचे साहित्यासह एकुण 1 लाख 21 हजार 600 रू जप्त करण्यात आले आहेत.
याप्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रामदास निरदोडे यांच्या तक्रारीवरून शेख फेरोज अब्दुल रौफ रा शुक्रवार पेठ वसमत,ज्ञानेश्वर संताजी माखणे रा.रूंज ता. वसमत, शेख रहीम शेख कलीम रा.गणेश पेठ वसमत ,नितीन हरिचंद्र जाधव राहणार ,सोमवार पेठ वसमत यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बालाजी मिराशे करत आहेत.
गुंज शिवारात वसमत येथील जुगारी
वसमत तालुक्यातील गुंज येथील शेतात चाललेल्या जुगार अड्ड्यावर ग्रामीण पोलिसांनी छापा मारला असता तेथे जुगार खेळण्यासाठी वसमत येथील जुगारी जमले होते असे समोर आले आहे. पोलीस अधीक्षकांकडून अवैध व्यवसाय विरोधात धडक कारवाई करण्याचे आदेश असतानाही ग्रामीण भागात जुगारी शेतात किंवा आडपेठला असलेल्या गावात अवैध व्यवसाय जुगार अड्डा चालवतात संबंधित बीट अंमलदार व त्या भागातील पोलीस कर्मचाऱ्यांनी वेळीच लक्ष दिले तर असे प्रकार होत नाहीत. मात्र बीट अंमलदार यांच्या दुर्लक्षामुळे ग्रामीण भागात असे प्रकार अधूनमधून घडत असतात त्याकडे प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.