Student Death: कळमनुरी तालुक्यातील असोला येथील विद्यार्थी विषारी औषधाचे प्राशन करून मृत्यू पावला. तणावामुळे उचलले टोकाचे पाऊल.
कळमनुरी तालुक्यातील असोला येथील घटना;
आ. बाळापूर पोलिसात आकस्मात मृत्यूची नोंद
आखाडा बाळापूर (Student Death) : कळमनुरी तालुक्यातील असोला येथील एका विद्यार्थ्याने अभ्यासाच्या तणावातून विषारी औषध प्राशन केल्याने उपचारादरम्यान त्याचा (Student Death) मृत्यू झाला. या प्रकरणी ४ मे रोजी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, असोला येथील विशाल कुंडलीक कांबळे, वय २४ वर्षे, याने अकरावीचे पेपर नीट गेले नाहीत. काही पेपर त्याने दिले नव्हते. बारावीचा अभ्यासक्रम आपल्याला झेपणार नाही या तणावाखाली त्याने २४ एप्रिल रोजी विषारी औषध प्राशन केले. हा (Student Death) प्रकार लक्षात येताच त्याला तातडीने हिंगोली येथे व नंतर नांदेड येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना २५ एप्रिल रोजी रात्री त्याचे निधन झाले. कुंडलीक लिंबाजी कांबळे यांनी दिलेल्या माहितीवरून ४ मे रोजी आखाडा बाळापूर पोलीस स्थानकात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुठ्ठे आणि बिटप्रमुख शेख अनसार या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.