Breaking News
  • ३१ जिल्ह्यांना पावसाचा इशारा; मान्सून राज्याच्या दारात.
  • पुणेकरांसाठी आनंदाची बातमी – हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोच्या पहिल्या टप्प्याच्या उद्घाटनाची तयारी सुरू झाली आहे.
  • अमरावती मनपाची मोठी कारवाई – थकीत कर वसुलीसाठी दोन मालमत्ता सील करण्यात आल्या. प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे.
  • मुंबईतील विकासकामांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आढावा घेणार – पावसाळ्यापूर्वी महापालिकेच्या विविध प्रकल्पांची पाहणी होणार आहे.
  • पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळ अटकेत – राजस्थानमधून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तो अनेक महिन्यांपासून फरार होता.
  • अकरावी प्रवेश प्रक्रिया (FYJC) – दुसऱ्या नियमित प्रवेश फेरीचे वेळापत्रक जाहीर; ६ जूनपासून विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलण्याची संधी मिळणार.
  • महाराष्ट्रातील पावसाचा अंदाज – हवामान विभागाच्या प्राथमिक अंदाजानुसार राज्यातील बहुतांश भागात यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता व्यक्त.
  • कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कमकुवत रुपया आणि पावसाच्या अनिश्चिततेमुळे RBI ने महागाईचा अंदाज वाढवला.
  • नैर्ऋत्य मान्सून केरळमध्ये दाखल; महाराष्ट्रात पुढील काही दिवसांत प्रगतीची शक्यता, मात्र एल निनोचा प्रभाव चिंतेचा विषय.

होम > क्राईम जगत

वाहन धडक मृत्यू

भरधाव वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Vehicle collision death: शहरालगत सोमाणी पेट्रोलपंपाजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या दुचाकीच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला असून अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे.


भरधाव वाहनाच्या धडकेत युवकाचा मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

Vehicle collision death |

कळमनुरी (Vehicle collision death) : शहरालगत सोमाणी पेट्रोलपंपाजवळ भरधाव व निष्काळजीपणे चालविण्यात आलेल्या दुचाकीच्या धडकेत एका युवकाचा मृत्यू झाला असून अल्पवयीन मुलगा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना १६ मे रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास घडली.

याप्रकरणी सम्राट बालाजी पाटील (वय १५, रा. मोरगव्हाण ता. कळमनुरी) यांनी कळमनुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, एमएच १३ बीयू ७७१७ क्रमांकाच्या दुचाकीच्या अज्ञात चालकाने भरधाव वेगात व निष्काळजीपणे वाहन चालवत फिर्यादीच्या एमएच ३८ एजे ०६२९ क्रमांकाच्या दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली.

या (Vehicle collision death) अपघातात फिर्यादी सम्राट पाटील यांच्या उजव्या पायाच्या पंज्यास व करंगळी जवळील बोटाला गंभीर दुखापत होऊन बोट तुटले आहे. तसेच त्यांच्यासोबत असलेले तेजस नारायण मस्के (रा. तिरुपती नगर, कळमनुरी) यांचा मृत्यू झाला. अपघातात दोन्ही दुचाकींचेही नुकसान झाले आहे. या प्रकरणी कळमनुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. अद्याप आरोपी चालकास अटक करण्यात आलेली नाही.