Wasmat Accident: वसमत येथे कार आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोन युवकांचा मृत्यू झाला आहे तर पाच जण गंभीर जखमी आहेत. शहरात शोककळा पसरला आहे.
वसमत शहरावर शोककळा
हिंगोली (Wasmat Accident) : जिंतूर औंढा नागनाथ रस्त्यावरील भोगाव मानधानी रस्त्यावर कार दुचाकी भिषण अपघातात दुचाकीवरील दोघांचा मृत्यू व पाच जन गंभीर जख्मी झाल्याची घटना ५ एप्रिल दुपारी १ च्या सुमारास घडली या मधील दोन्ही मयत झालेले युवक हे वसमत शहरातील रहिवासी आहेत. या दोघांच्या मृत्यूमुळे सराफा व सुवर्णकार असोसिएशनने प्रतिष्ठाने बंद ठेऊन जिंतूर येथे धाव घेतली होती.
या बाबत मिळालेली माहिती अशी की, (Wasmat Accident) वसमत येथील दुचाकीवरील दोन जन ५ एप्रिल रोजी जिंतूरकडे येत होते तर संभाजीनगर येथील कार हि जिंतूर होत औंढा नागनाथकडे जात होती. दरम्यान भोगाव मानधानी मध्य रस्त्यावर दोन्ही वाहनांची समोरासमोर भिषण अपघात झाल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते नागेश आकात,चालक विजय राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली तर १०८ रुग्णवाहिका चालक महेश कांगणे, डॉ.कृष्णा घुगे हे गरोदर मातेला घेण्यासाठी जात होते त्यांनाही अपघाताची माहिती मिळताच दोन्ही वाहनाच्या मदतीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहीनी श्रृंगारे, सिस्टर घातगीने, दराडे,सिमा कांगणे, शेख सलमान, गंगाधर पालवे, आदींच्या पथकाने जखमींवर उपचार सुरु केले.
या दरम्यान मयुर रत्नाकर शहाणे (३०) रा.सुवर्णकार कॉलनी वसमत यास डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले तर दुसर्या गंभीर जखमीपैकी रितेश विष्णुपंत टाक (४०) रा.शहरपेठ वसमत याला परभणी रुग्णालयात नेले असता त्याचाही मृत्यू झाला. या अपघातात इतर जखमीपैकी तबसुम चाँद पाशा शेख वय ३० वर्षे,मुनीराबी शेख खलील वय ६० वर्षे, शेख माजीद कादर वय ५० वर्षे, शेख सलमान माजीद, शेख शाहीदा माजीद,वय ४० वर्षे सर्व रा.छत्रपती संभाजीनगर यांना पुढील उपचारासाठी परभणी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले.
घटनस्थळी (Wasmat Accident) सहाय्यक पोलिस निरीक्षक विजय जाधव,परभणी गोपीनीय शाखेचे हवालदार जिया खान पठाण,महामार्ग पोलीस जमादार नेतम,पो.का.नरवाडे,पो का केदारी यांनी मदत करत वाहतूक सुरळीत केली. दरम्यान वसमत शहरातील दोन्ही युवकाचा अपघाताची मृत्यू झाल्याची वार्ता शहरात कळताच सराफा व सुवर्णकार असोसिएशनने तात्काळ आपले प्रतिष्ठाने बंद करून जिंतूर येथे धाव घेतली. या घटनेमुळे वसमत शहरात शोककळा पसरली आहे.