Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

वसमत दरोडा कारवाई

वसमत मध्ये दरोड्याचा डाव उधळला; पाच गुन्ह्यांतील पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Wasmat Robbery Action: वसमत शहरात पोलिसांनी दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच आरोपींना अटक केली, ज्यांच्याकडून पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला.


वसमत मध्ये दरोड्याचा डाव उधळला पाच गुन्ह्यांतील पाच लाखांचा मुद्देमाल जप्त

Wasmat Robbery Action |

 

घातक शस्त्रासह तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पकडले

हिंगोली (Wasmat Robbery Action) : जिल्ह्यातील वसमत शहरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच अट्टल दरोडेखोरांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शिताफीने जेरबंद केले आहे. या कारवाईत सुमारे पाच लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले असून यामुळे वसमत आणि परिसरातील एकूण पाच घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. 

पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा आणि सायबर सेलचे पथक जिल्ह्यातील मालाविरुद्धच्या गुन्ह्यांवर कारवाई करत आहे. वसमत शहरात एका दुकानाचे शटर फोडून शेतकऱ्याची हळद चोरीला गेली होती. त्याच रात्री एक चारचाकी पिकअप वाहनही चोरीस गेले होते. या घटनेची गंभीर दखल घेत सपोनि शिवसांब घेवारे यांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन तपास सुरू केला. 

तपासादरम्यान गोपनीय माहितीच्या आधारे वसमत- परभणी महामार्गावर काटेरी फांद्यांचा अडथळा टाकून (Wasmat Robbery Action( दरोडा टाकण्याच्या तयारीत पाच जण थांबल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार स्थागुशा पथकाने सापळा रचून छापा टाकला असता आरोपींना खंजीर, मिरचीपूड, दोरखंड आणि लोखंडी रॉड यांसारख्या हत्यारांसह जागीच पकडण्यात आले. 

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये जसविंदर सिंग उर्फ जस्सू रघुवीरसिंग चव्हाण, बादलसिंग रणजितसिंग चव्हाण , दिलीपसिंग चव्हाण, अजयसिंग सुरेशपाल चावरीया आणि एक विधी संघर्षग्रस्त बालक यांचा समावेश आहे. हे सर्वजण रेल्वे स्टेशन रोड, शिकलगरी वस्ती, वसमत येथील रहिवासी आहेत. चौकशी दरम्यान आरोपींनी वसमत शहरातील तीन आणि आखाडा बाळापूर येथील एक अशा एकूण चार घरफोड्या केल्याची कबुली दिली. तसेच पिकअप वाहन चोरल्याचेही मान्य केले. 

या गुन्ह्यांमध्ये चोरलेली अंदाजे तीन लाख रुपयांची हळद, रोख रक्कम, सोन्याचे दागिने आणि पिकअप वाहन असा एकूण पाच लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. विशेष म्हणजे सर्व आरोपी रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आहेत. कारवाई दरम्यान दोन आरोपींनी  अंधाराचा फायदा घेत पळ काढला, मात्र उर्वरित तिघांना आणि एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध वसमत शहर पोलीस ठाण्यात दरोड्याच्या तयारीसह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

ही (Wasmat Robbery Action) यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन, अप्पर पोलीस अधीक्षक कमलेश मीना व पो.नि. मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, ज्ञानेश्वर गोरे, आकाश टापरे, नरेंद्र साळवे, शिवाजी जालमोरे व हरिभाऊ गुंजकर यांच्या पथकाने केली. गुन्हे उघड करून संपूर्ण मुद्देमाल हस्तगत केल्याबद्दल पोलीस अधीक्षकांनी पथकाचे अभिनंदन केले आहे. आरोपी सराईत असल्याने आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

Related to this topic: