Breaking News
  • माजलगावात अल्पवयीन विवाहितेचा नियमबाह्य गर्भपात? अतिरक्तस्रावानंतर तरुणी बेपत्ता
  • लातूर तुळजापूर महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर 17 जण जखमी
  • वाशिममध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस सुरू
  • सलग पाचव्या दिवशी भंडाऱ्यात मान्सूनपूर्व पावसाची जोरदार हजेरी
  • फसव्या कर्जमाफीविरोधात रविकांत तुपकरांचा एल्गार; उद्यापासून अन्नत्याग आंदोलन
  • FSSAI कंपनीची मोठी कारवाई, ८ फूड कंपन्याना पाठवली नोटीस
  • अण्णा हजारे यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या शुभेच्छा
  • पेरणीची घाई करू नका; दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते : मेघना बोर्डीकर
  • नांदेड जिल्ह्यात पाऊस वादळीवारासह पावसाची हजेरी

होम > क्राईम जगत

वसमत अवैध रेती वाहतूक

वसमत रोडवर अवैध रेतीसह टिप्पर पोलिसांनी पकडला; 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal sand transport: चिखली फाटा ते वसमत रोडवर विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा एक टिप्पर पोलिसांनी पकडला


वसमत रोडवर अवैध रेतीसह टिप्पर पोलिसांनी पकडला 20 लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal sand transport |

हट्टा (Illegal sand transport) : हिंगोली जिल्ह्यात अवैध रेती वाहतुकीवर पोलिसांनी पुन्हा एकदा कारवाईचा बडगा उगारला आहे. चिखली फाटा ते वसमत रोडवर विना परवाना अवैधरित्या रेतीची वाहतूक करणारा एक टिप्पर पोलिसांनी पकडला असून, या (Illegal sand transport) प्रकरणी चालकासह टिप्पर मालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

स्थानिक गुन्हे शाखा हिंगोली येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई रमजान प्यारवाले यांनी हट्टा पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ही (Illegal sand transport) कारवाई करण्यात आली आहे. 13 एप्रिल रोजी पोलीस निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि माधव जिव्हारे, कुंदनानी, किशोर सावंत व  विशाल खंडागळे यांचे पथक अवैध व्यवसायाची माहिती काढण्यासाठी रवाना झाले होते. पथक पेट्रोलिंग करत वसमत रोडने जात असताना चिखली फाटा येथे एम.एच. 38 एक्स 6619 क्रमांकाचा एक टिप्पर रेतीची वाहतूक करताना दिसून आला. पोलिसांनी दुपारी 12.20 वाजता सदर टिप्परला थांबवून चालकाकडे चौकशी केली असता त्याने त्याचे नाव संतोष चांगदेव नरवाडे, रा. ढऊळगाव ता. वसमत जि. हिंगोली असे सांगितले.

पोलिसांनी टिप्पर चालकाकडे रेती वाहतुकीचे परवाना, पावती व इनव्हाईस बाबत विचारपूस केली असता त्याच्याकडे कुठल्याही प्रकारची कागदपत्रे नसल्याचे निष्पन्न झाले. सदरची रेती ही (Illegal sand transport) टिप्पर मालक उद्धव जगताप रा. हट्टा यांच्या सांगण्यावरून पिंपळगाव कुटे येथील पूर्णा नदीपात्रातून आणली असल्याचे चालकाने सांगितले. यानंतर पोलिसांनी तहसील कार्यालयातील मंडळ अधिकारी सज्जा हयातनगर यांना बोलावून टिप्परमधील रेतीबाबत माहिती घेतली असता त्यांनी सदरची रेती ही अवैध रित्या वाहतूक होत असल्याचे स्पष्ट केले. 

चालक व मालक यांनी शासनाचा कर बुडवण्याचे हेतूने विनापरवाना बेकायदेशीररित्या गौण खनिजाची वाहतूक केल्याचे निष्पन्न झाल्याने पोलिसांनी टिप्पर व रेती जप्त केली. जप्त केलेल्या मालामध्ये अंदाजे 5 ब्रास रेती, ज्याची किंमत 25 हजार रुपये, व टिप्पर, ज्याची किंमत 20 लाख रुपये, असा एकूण 20 लाख 25 हजार रुपयांचा मुद्देमाल आहे. या प्रकरणी आरोपी चालक संतोष चांगदेव नरवाडे व टिप्पर मालक उद्धव जगताप रा. हट्टा यांच्या विरोधात  महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम प्रमाणे हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास टी.पी. कासले हे करत आहेत.