Breaking News
  • हिंगोलीत आरोग्य प्रशासनाचा अनास्थेपना, जिल्ह्यात दाखल झालेल्या तीन शववाहिका धूळखात पडून
  • अमरावती पोलिस अंमलदारच निघाला गुटखा तस्कर; शहर पोलिस दलात खळबळ
  • दुपारी २.३० वाजता पुण्यातील पत्रकार संघात अभिजित दिबके यांची पत्रकार परिषद
  • बुलढाण्यात खडकपूर्णा धरणाच्या पाणीपुरवठा लाईनला गळती, लाखो लिटर पाणी वाया
  • पुण्यातील महापौर कार्यालय उडवून देण्याची धमकी
  • बीडच्या माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तमपुरमध्ये दर्शनासाठी गेलेल्या भाविकांचा अपघात
  • सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात उद्या दुपारी चार वाजता कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन
  • पुण्यात उद्या होणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला विद्यापीठाकडून परवानगी
  • पुण्यात बीडीडीएस कडून संपूर्ण पालिका इमारतीचा तपास पूर्ण; बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून महापौर कार्यालय, आयुक्त कार्यालय यासह सगळ्या कार्यालयांची तपासणी

होम > क्राईम जगत

अवैध दारू जप्त

रेगडी येथे अवैध दारूसाठ्यावर पोलिसांचा छापा; १.८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal liquor seized:रेगडी पोलिसांनी एका पडक्या घरात अवैध देशी व विदेशी दारू साठवलेले दिसले. १ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गुन्हा महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत दाखल करण्यात आला.


रेगडी येथे अवैध दारूसाठ्यावर पोलिसांचा छापा १८५ लाखांचा मुद्देमाल जप्त

Illegal liquor seized |

घोट (Illegal liquor seized) : रेगडी पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीच्या पथकासह संयुक्त कारवाई करत अवैध दारू साठवणुकीच्या अड्ड्यावर छापा टाकून तब्बल १ लाख ८५ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई ३० मेच्या रात्री ते ३१ मेच्या पहाटे दरम्यान करण्यात आली. पोलीसांना गोपनीय माहितीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली असता रेगडी येथील एका पडक्या घरात अवैधरित्या देशी व विदेशी दारू विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात साठवून ठेवण्यात आले होते. सदर कार्यावही ही वरिष्ठ अधिकरी याच्या मार्गदर्शनाखाली रेगडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक कुणाल इंगळे यांच्या नेतृत्वाखाली पथक रवाना झाले.

शासकीय पंचांच्या उपस्थितीत संबंधित पडक्या घराची झडती घेण्यासाठी पोचले असता, त्यावेळी स्थानिक गुन्हे शाखा गडचिरोलीचे पथकही घटनास्थळी दाखल झाले. संयुक्तरीत्या करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा जप्त (Illegal liquor seized) करण्यात आला. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालामध्ये रॉकेट देशी दारू संत्रा कंपनीचे ९० मि.ली.चे १९ बॉक्स व ९० नग बाटल्या (किंमत १,५९,२०० रुपये), हायवर्ड ५००० कंपनीच्या ५०० मि.ली.च्या २४ बाटल्या (किंमत ७,२०० रुपये) तसेच रॉयल स्टॅग कंपनीच्या १८० मि.ली.च्या ४८ निप (किंमत १९,२०० रुपये) यांचा समावेश आहे. एकूण जप्त मुद्देमालाची किंमत १,८५,६०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या प्रकरणी दारू विक्रेत्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी नितीन मंडल वय ४२, रा . रेगडी हा सध्या फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

या (Illegal liquor seized) कारवाईत रेगडी पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पीएसआय कुणाल इंगळे, पोलीस उपनिरीक्षक माधुरी शेलार मॅडम, पोलीस हवालदार शेवंता सरवर, पोलीस शिपाई संदीप खेडकर, प्रेम बोडावर, संदेश मडावी, सुनील मडावी, संजय पाल तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे प्रेमानंद नंदेश्वर, निशिकांत अलोणे, राजकुमार खोब्रागडे आणि चालक रामदास कुईनवार यांनी सहभाग घेतला. पोलिसांनी पुढील तपास सुरू केला असून अवैध दारू विक्रीविरोधातील मोहिम अधिक तीव्र करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे.

Related to this topic: